"मुख्यमंत्र्यांचा" अकोले-संगमनेर "दौरा निष्फळ" !! "गाजराची पुंगी" वाजत गेली.!!

साहेब ! अभ्यास कमी वाटला !!

अकोले (प्रतिनिधी) :-
                      काल-परवा "मुख्यमंत्री" देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यात सभा संपन्न झाली. या निमित्ताने वैभव पिचड यांच्या "उमेदवारीवर मोहर" लागली. पिचड पिता-पुत्रांनी असे अनेकदा बोलून दाखविले आहे. की; "विकासाच्या मुद्यावर" मी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय अकोल्याला भरगोस आश्वासने देतील. असे वाटले होते. कारण, तसेही ही यात्रा म्हणजे "महाजनादेश" नाही. तर "गाजर" दाखविणारी यात्रा आहे. अशा टिका विरोधकांकडून मीडियाच्या माध्यमातून झाल्याचे पहावयास मिळत आहे. पण, आश्वासने का होईना.! पण, ती देखील "मोजून-मापून" दिल्याचे पहावयास मिळाले. इतकेच काय खूप ठिकाणी त्यांच्या भाषणात विसंगती आढळून आली. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी अकोल्यात येऊन काय साध्य केले.? "काय हवे होते आणि काय नको" तसेच पिचड साहेब यांच्यासमोरील "आव्हाने" आणि "अश्वासने" यांचा "परामर्श" घेणारा हा "रोखठोक सार्वभौमचा" जनसंवादातून मांडलेला स्पेशल रिपोर्ट".!

सोशल मीडियाची प्रतिक्रिया !!!


             मुख्यमंत्री महोदय यांना कदाचित "विसर" पडला असावा. कि, त्यांच्याच पक्षात असणारे अशोक भांगरे, सौ. सुनिता भांगरे व डॉ. किरण लहामटे यांनी पिचड साहेबांच्या विरोधात दंड थोपटून मागिल निवडणुक आपल्याच मार्गदर्शनाने पार पाडली होती. ती पराभूत झाली. तो भाग वेगळा. मात्र, बिगर आदिवासी पत्नीचा बनावट दाखला तयार करून कोट्यावधींचा मलिदा जमा केला. असे अनेक आरोप सिद्ध करण्यासाठी भाजपचाच पुढाकार होता. काल, पिचड पिता-पुत्रांवर आरोप करणारे महोदय आज अचानक म्हणू लागले. कोणाच्या नव्हे इतके मधुकर पिचडांच्या भाजप प्रवेशाने आमची ताकद वाढली आहे. ते ही चक्क गिरीष महाजन ज्यांनी मेघा भरतीत सचिवाची भुमिका बजावली. आणि दुसरीकडे ना. विखे पाटील. ज्यांनी पिचडांच्या हातातील घड्याळ काढून वजीराची भुमिका बजावली. या दोघांपेक्षा मधुकर पिचडांना मोठेपणा देण्यात आला आणि पहिल्यांदाच "फुग्यात हावा भरल्यासारखे" बोलून साहेब आम्हाला खूश करत आहेत. असे जनतेला वाटू लागले. ज्या साहेबांवर आदिवाशांची फसवणुक केली. असे आरोप आज भाजपचे नेते पत्रकार परिषदा घेऊन करत आहेत. त्यांनी उभी हयात आदिवासी समाजाच्या सेवेसाठी घातली. यावर जनतेने आक्षेप घेतला. उलट, अशा बनावट आदिवासी दाखल्यांमुळे खऱ्या आदिवासी लोकांना दाखले मिळण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. त्याचा तोटा विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. काल पित्याचे छत्र हरपलेली मुलगी "शिवानी मरवट" (एसी) ही मेडिकलला (७८%) मेरिटमध्ये येऊनही आदिवासी दाखला मिळवू शकला नाही म्हणून तीचा प्रवेश झाला नाही. तर ओपन मधून पैसे भरु न शकल्याने ती आज एका दुकानात हतबल होऊन काम करत आहे. पैसे साचवून पुढील शिक्षण घेण्यासाठी पै-पै जमा करत आहे. तर असे अनेक कॉलेज आहेत. जेथे आदिवासी मुले मुली शिकतात. मात्र, कॉलेजचे नाव होस्टेलच्या यादित नाही. म्हणून अंजली भांगरे नावाची मुलगी एकीकडे शिक्षणासाठी तडफडते तर दुसरीकडे दोन वेळच्या अन्नासाठी. गेली ४५ वर्षात अकोल्यात सुसज्ज शाळा, महाविद्यालये, उच्चशिक्षण सुविधा होऊ शकल्या नाहीत. ही अधोगती म्हणायची की प्रगती ? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे होते. असे जनतेला वाटते.

हात जोडले आता या विकासाला

             मुख्यमंत्री म्हणाले वैभव पिचड अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत. त्यांनी त्यांचे सर्व प्रश्नांचे शांतपणे मांडून ते मुद्दे पदरी पाडून घेतले. पण, राज्यातून पाच वर्षात अकोल्याच्या पदरात काय पडले याची यादी दिली असती तर आमच्या माहितीत भर पडली असती. विरोधक डॉ. लहामटे सांगतात, पाच वर्षात फक्त तीन किलोमिटर रस्ता केला. यावरही मीडियात चर्चेला उधान आले आहे.
         एक महत्वाची गाेष्ट म्हणजे, गेली अनेक विधानसभा पिचड साहेबांनी "मुळा-आढळा बारमाही" होणार. या मुद्यावर राजकारण केले. पण, मुख्यमंत्री महोदय म्हणाले. येथे होणाऱ्या पाऊसाचे पाणी आडवून नगर जिल्हा दुष्काळमुक्त करायचा आहे. पण, साहेब ! जरा अभ्यास करा. तुम्ही एकाच वेळी अनेक मंत्रीपदे स्वत:कडे ठेऊन घेतलीत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याला स्वतंत्र ग्रुहमंत्री पाहिजे. अशा मागण्या होऊनही आपण हे महत्वाचे खाते सोडले नाही. सांगायचं तात्पर्य असे की, स्वत:कडे जे आहे. ते दुसऱ्याला देण्याची मानसिकता नसते. हा मानवी नैसर्गिक स्वभावगुण आहे. तेथे स्वार्थ जागा होतो. तसेच, आमच्या निस्वार्थी आणि प्रांजळ आदिवासी बांधवांच्या पोटावर पाय देऊ नका. जे पाणी तालुक्यातील आदिवासी भागात पडते. त्याला बाहेर नेण्यापेेक्षा तेथील शेती पिकती करा. ऊस, टोमॅटो आणि अन्य भाजिपाला पिकेल असे नियोजन करा. हे पाणी खाली नेऊन दुष्काळ दुर करण्यापेक्षा आमच्या आदिवासी बांधवांचा विचार करा. कारण, १० ते २० एकर शेती प्रति कुटुंबात आहे. मात्र, त्या सातबारा-आठ ने पोट भरत नाही. याचाही विचार व्हावा.

तोलार खिड,  एक विकास मार्ग

          साहेब, जर तुम्ही "तोलार खिंड" तोडली तर अहमदनगर हे जिल्ह्याचे ठिकाण असून आमचे बांधव येथील माल मुंबईला काही तासात घेऊन जाऊ शकतील. जिल्हा "विभाजन" करायला तुम्ही धजेना. पण, मोठ्या गावांच्या विकासांना देखील तुम्ही हात देईना. अशी परिस्थिती दिसत आहे.
       तुम्ही अकोल्यात आले. पण, स्थानिक प्रश्नांवर तुम्ही बोलायलाच तयार नाही. अगदी पाठांतर केलेल्या भाषणाप्रमाणे तुमची शब्दफेक अगदी कोठेच बदलली नाही. जे अकोल्यात बोलले. तेच संगमनेरला. फक्त "निळवंडे पाणीविस्तार" व "न्यायालय निधी" असे मापक मुद्दे वगळता अगदी भाषणात काहीच मर्म जाणविला नाही. आम्हाला तर लहानपणी "अध्यक्ष महोदय आणि गुरूजन वर्ग" याचीच आठवण झाली. असे जनतेतून स्वर उमटताना दिसले.
          तुम्ही शिक्षण, आरोग्य आणि शेती यावर भाष्य केले. मात्र,  साहेब ! जरा माहिती घ्या. की; २००८ पासून शिष्यव्रुत्ती मिळाली नाही. म्हणून कॉलेजने विद्यार्थ्यांचे कागदपत्रे अडकून ठेवले आहेत. "जातीचे दाखले तर अवाजवी फी" यामुळे मुलांच्या शिक्षणावर जाळे पडले आहे. आरोग्याचा प्रश्न कराल.  तर ते राज्यात ७ हुन ३ नंबरला कसे आले माहित नाही. मात्र, आता सरकारी रुग्णालयातून पेशन्ट खाजगी रुग्णालयात टक्केवारीेने पाठविले जातात. सरकारी डॉ. सुट्टीवर तर नर्स पेशन्ट स्ट्रेचरवरच तपासते आहे. औषधे शिल्लक नाहीत. म्हणून जवळच्या मेडिकल किंवा डॉक्टर सजेस्ट केला जाऊ लागला आहे. सरकारी दवाखानेच "व्हेंटीलेटरवर" असल्याचे दिसते आहे. 
         बाकी राहिले शेती हा विषय. तर सरकारने "कर्जमाफी" केली. त्याची "आकडेवारी" समोर येतच आहे. गेली अनेक दिवस शेतकरी "खरिपाचे अनुदान" मागत होता. पण, ते मिळता मिळाले नाही. शेवटी "चिरीमिरी" पदरात पडली. त्यामुळेच तर गेल्या पाच वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत. नशिब आमच्या तालुक्यात "व्याजाने पैसे" देणारे सावकार "बाहुबली" झालेत. त्यामुळे शेती म्हणून नाही. तर, व्याजदर भरूनच लोकं मरु लागले आहेत.

शब्द झाले मुके !!

            साहेब ! तुम्ही म्हणालात कोण्या राज्यात नव्हे असे ३० हजार किलोमिटरचे रस्ते महाराष्ट्रातील ग्रामीण मागात केले. त्यापैकी आमच्या तालुक्यात किती किलोमिटर झाला.? जरा याचीही अकडेवारी सांगा.!!, तुम्ही कोल्हार-घोटी प्रवास केला आणि अंगमोडी दिली. वरुन कबूलही केले. की, होय खरं आहे. रस्ता थोडा खराबच आहे. साहेब ! नशिब ! तुम्ही येणार म्हणून तात्पुरती थिगळं लावण्याचे काम प्रशासनाने केले. नाहीतर जगातील सर्वात महागड्या युरोपीयन "एसयुव्ही" गाडी जरी आपण अकोले-संगमनेर प्रवास केला असता. तरी पुन्हा उभ्या आयुष्यात अकोल्याचा चेहरा पाहु वाटला नसता. या ही पलिकडे नशिब तुमचे तुम्हाला भंडारदरा दौरा करून आणला नाही. पण, कौतुक तुमचे की, त्यापुर्वी तुम्ही म्हणालात. येणाऱ्या दोन वर्षात, वाड्या वस्तीपासून तर शहरापर्यंत सर्व रस्त्यांचा प्रश्न सुटलेला असेल. ही सर्वात मोठी घोषणा होती. पण हो..! रस्त्यात खड्डे दाखवा आणि पैसे कमवा. हे चंद्रकांत दादा यांचे बोल जनता विसरली नाही. हे ही तुम्ही विसरु नका.

पवारांनी जामखेडवर पाणी फिरविले !!

         तुम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ओठांवर आणला म्हणून आठवले. की, १८ हजार गावांना पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देऊन, तो प्रश्न सोडविला. पण, नगरचे पालकमंत्री यांच्याच मतदारसंघातच बारामतीहुन रोहित पवार हे पिण्याचे पाणी पुरवितात. हे विसरुन कसे चालेल ! साहेब ! एक गोष्ट नमुद करावीशी वाटते. तुम्ही नेहमी म्हणता, जागा देऊन घरे देतो, निधी देतो. पण, साहेब ! संगमनेर तालुक्यात वाघापूर गावात विनोद आणि संदिप घोलप या व्यक्तींनी घरे बांधण्यासाठी आपण सहाय्य केेले. पण, पाया घेतला आणि वर्षे उलटून गेले, पाया बूजून गेला. तरी दुसरा हाप्ता मिळाला नाही आणि शासन दरबारीची पायपिट बंद झाली नाही. अखेर घर नको. पण, टाकलेली दगडे घेऊन जा. असा निरोप त्यांनी पंतप्रधान महोदयांना पाठवून, पुढची तयारी त्यांनी सुरू केली आहे.  त्यामुळे तुमची अश्वासने आणि सामान्य मानसांचे जगणे. यात जमीन आसमानचा फरक आहे. हे तुम्ही नाही समजू शकत. असे जनतेला वाटते आहे.

हम करे सो निहाल !!

         साहेब ! हे गणित मलाच काय अगदी कोणालाच उलगडले नाही. की; नोटाबंदी झाली तसा कंपन्यांना झटका बसला. आर्थिक मंदीची झळ बाजारपेठेवर पडली. परिणामी निव्वळ महाराष्ट्रात अडिच लाख तर देशात ६ लाख २५ हजार कंपन्या बंद पडल्या आणि लाखो तरुणांचा रोजगार गेला. हे खुद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. की; राज्यात तंत्रद्न्यान वाढल्याने रोजगार अतिशय कमी झाला आहे. तर तुम्ही अकोले- संगमनेरात म्हणाले, महाराष्ट्र रोजगार देण्यात एक नंबरवर आहे. हे सुत्र आम्हाला काही उलगडले नाही. भरती नाही, शेती नाही, पाणी नाही, डिगऱ्या डिप्लोमांच्या कागदांचा ढिग लागलाय तरी योग्य पगारी नोकरी नाही. अशिक्षितांना रोजगार नाही. त्यामुळे आमचा आदिवासी बांधव रोज, नारायनगाव, चाकण, पुणे, मुंबईला जाऊ लागला आहे. जरा ही पायपिट एकदा पहा. आणि तुम्हीच सांगा. रोजगार देण्यात आपण किती नंबरला आहोत. !!

जाहिरात...

"सह्याद्री भूषण" सार्वभौम पोर्टलचा सन्मान


           साहेब !! तुम्हाला एमआयडीसी करू वाटली नाही, उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये उभारु वाटले नाही, भारताचे जम्मु कश्मिरवर तुम्ही बोलले. मात्र, अकोल्यातील पर्यटन जम्मु कश्मिर पेक्षा कमी नाही. त्याचा विकास तुम्हाला करू वाटला नाही. येथील आदिवासी लोकांच्या मुलभूत गरजांवर आपण हात घातला नाही. येथील टाकेद, अगस्ति महाराज, आम्रुतेश्वर, राममाळ, सिद्धेश्वर, सातारा, पेमगिरी वड यांचा ऐतिहासिक ठेवा आणि त्यांचा विकास करण्यासाठी कोणताही अभ्यास करून यावासा वाटला नाही. रस्ता सोडून तुमचे ठोस असे एकही अश्वासन अकोलेकरांना भावले नाही. त्यामुळे सभा मोठी झाली खरी. मात्र, त्यात जीव आणि रुबाब दिसून आला नाही. गाडी-भाडं अन् जेवणाने लोकं येतील खरे. मात्र, विकास करायला अजून काय काय पहायला लागणार आहे. देव जाणे. असे मतदारांना वाटत आहे.

-- सागर शिंदे

 ====================

             "सार्वभाैम संपादक"

                 

      - सागर शशिकांत शिंदे 

              8888782010

           -------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६१ दिवसात ११५ लेखांचे ६ लाख २ हजार वाचक)

----------------------