बेकायदा गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला तिघींचा जीव, तीन बाळ मयत, सहा जणांच्या जीवाशी खेळ, चौकशी सुरु, गुन्हे नोंद होणार.!
सार्वभौम (संगमनेर) :-
अकोले तालुक्यातील एका महिलेने ऍबॉर्शनच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने घेतल्याने महिलेच्या अंगाहून जाऊ लागले. गोळ्या खाल्यानंतर देखील गर्भात अवशेष शिल्लक राहिले. त्यामुळे, जोर्वे येथील एका दवाखान्यात उपचार घेतला. तेथे देखील महिलेची प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तेथुन ताजने मळ्यातील एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये महिलेला दाखल केले. त्यांनी अर्धवट राहिलेला गर्भ काढला. मात्र, महिलेची तब्यत अधिकच खालावत गेली. तिला पुढील उपचारासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना 12 एप्रिल 2025 रोजी घडली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाने चौकशीचे आदेश दिले. यामध्ये अशा अनेक घटना आता समोर येत आहे. खरंतर, गर्भपात हा शासनमान्य गर्भपात केंद्रातच व्हायला हवा होता. परंतु, तसे न होता डॉक्टरांनी प्रियंका घुले या महिलेच्या जीवाशी खेळ खेळला. आता या महिलेला गोळ्या दिल्या कोणी? त्यांना आशा प्रकारच्या गोळ्या देण्याचा अधिकार आहे का? ज्या डॉक्टरांनी अर्धवट गर्भाचे ऑपरेशन केले त्यांना परवानगी होती का? असे एक ना अनेक प्रश्न आणोत्तरीत असुन या डॉक्टरांना प्रशासन पाठीशी घालणार की कारवाई करणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे.तर अकोले तालुक्यातील देवठाण येथील आशा सेविका असणारी सुष्मिता प्रशांत गायकवाड यांचा देखील माता होण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. तसेच अश्विन गोरख व्हडघर (रा. पारगाव, ता. संगमनेर) ही महिला देखील माता होण्यापूर्वीच मयत झाली असून या तिन्ही महिलेच्या मृत्युची आता चौकशी लागली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील प्रियंका विशाल घुले या मुलीचे अकोले तालुक्यातील धामणगाव पाठ येथील विशाल घुले या तरुणासोबत काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर यांना एक आपत्य झाले होते. काही दिवसांपूर्वी पुन्हा या महिलेला दिवस गेले असता मुलं ठेवायचे की नाही. यावर महिलेची घरात चर्चा सुरू झाली होती. जेव्हा गर्भ ठेवायचा नाही असे ठरले तेव्हा साधारणतः तीन महिन्यांचा गर्भ होता. जेव्हा गर्भ ठेवायचा नाही असे ठरले तेव्हा यांनी अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्या उपलब्ध केल्या. मुळात याबाबत महिलेसपुर्ण माहिती देणे, पहिली सोनोग्राफी करणे, किती आठवडे झाले ते तपासणे, रक्त तपासणी करणे,गोळ्या कधी व कशा घेणे याची माहिती देणे आणि हे सर्व झाल्यानंतर शेवटी पुन्हा सोनोग्राफी करणे. ही काळजी घेणे अपेक्षित होते.
दरम्यान, महिलेने गोळ्या उपलब्ध करून त्या घेतल्या. दुर्दैवाने गर्भपाताच्या गोळ्या घेऊन देखील हवा तसा गर्भ बाहेर पडला नाही. जे काही भ्रुण गर्भात होते. ते काही अंशी गर्भातच राहिले. आणि महिलेला प्रचंड त्रास होऊ लागला. काही दिवस उलटले तरी पोट दुःखतच होते. म्हणुन अन्य काही गोळ्या खाण्याचे काम सुरू होते. ते जोर्वे गावातील एका दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांनी तीन दिवस जोर्वे गावात उपचार घेतले. आता या गर्भाच्या गोळ्या याच डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या तर नाही ना? तेथे देखील महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होईना. त्यामुळे, डॉक्टर क्षेत्रात प्रवीण असलेला एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये या महिलेला नेले. त्यांनी अर्धवट राहिलेला गर्भ काढला. मात्र, महिलेची तब्यत अधिकच खालावत गेली. तिला पुढील उपचारासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु रक्तश्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.
खरंतर, गर्भपात हा शासन मान्य गर्भपात केंद्रातच होयला हवा. मात्र, तसे होताना दिसत नाही. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 व सुधारित 2023 या मधील तरतुदी नुसार कोणताही गर्भवती महिलेचा गर्भपात करायचा असेल तर 24 आठवड्यात पर्यंत शासन मान्य गर्भपात केंद्र व नोंदणीकृत प्रशिक्षण धारकाकडूनच करणे अपेक्षित आहे. जर कायद्याचा भंग केल्यास तो अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असताना संगमनेरात मेडीकल स्टोअर मधुन तसेच काही खाचगी डॉक्टरांकडुन असे गर्भपाताच्या गोळ्या अवैधरित्या विकल्या जातात. त्यानंतर, संपूर्ण गर्भ बाहेर पडला नाही. तर डॉक्टर अनधिकृतपणे डॉक्टर ऑपरेशन करतात. त्यामुळे, महिलांच्या जीवाला धोका निर्माण होतो. आता तक्रादार समोर आला नाहीतर गुन्हा दडपला जातो. त्यामुळे, प्रशासन डॉक्टरांवर कारवाई करणार. की, पाठीशी घालणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे.
तर अकोले तालुक्यातील देवठाण येथील सुष्मिता प्रशांत गायकवाड ही महिला स्वत: आशा सेविका होती. त्या गरोदर राहिल्यानंतर माहेरी जवळे कडलग येथे गेल्या होत्या. तेथे अचानक पोट दुखत असल्यामुळे स्थानिक ठिकाणी दवाखाना केला. मात्र, बरे वाटले नाही. त्यानंतर प्रशांत यांनी तिला पुन्हा देवठाण येथे आणले तेथे देखील उपचार केले. मात्र, तरी बरे वाटले नाही. सुष्मिता यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तांच्या गाठी झाल्या होत्या, नाळ तुटल्या होत्या, अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे, अकोल्यात आरोग्याची सुविधा नसल्याने त्यांना लोणी येथे हलविण्यात आले होते. मात्र, तेथे पोटातील बाळ मयत झाले होते तर काही वेळाने सुष्मिता गायकवाड यांनी देखील अखेरचा श्वास घेतला. ही घटना ३० मार्च २०२५ रोजी घडली होती. मात्र, या घटनेची आता चौकशी लागली आहे.