पत्नीच्या त्रासाला कंटाळून सुशिक्षित तरुणाची आत्महत्या, तू सुधारली नाही मग मीच सोडून जातो, पत्नीवर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (अकोले) :-
पत्नी वारंवार भांडते, किरकोळ कारणातून वादंग घालते, एकच भांडण केव्हरही लावून धरते, नको नको तसे आरोप करते या सर्व प्रकाराला कंटाळून एका सुशिक्षित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवार दि. 2 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. यात संदिप दिलीप मंडलिक ( वय 32 रा. माळेझाप, ता. अकोले, जि. अ. नगर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. संदिप हा एका राजूर येथील एका पतसंस्थेत लिपीक पदावर कार्यरत होता. पोटचं लेकरु गेल्यानंतर आईने एकच टाहो फोडला, सुनेच्या त्रासाला कंटाळलेला मुलगा सांगत होता, हीने फक्त सुधरुन घ्यावे हिला टाकून देणे किंवा हिला सोडून जगणे मला मान्य नाही पण हिने समजून घेणे अपेक्षित होते अशा आशयाची चिठ्ठी लिहून त्याने आपली जीवनयात्रा संपविली आहे.
याबाबत मयत मुलाच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. की, संदिप व त्याची पत्नी रुपाली यांचे घरगुती किरकोळ कारणावरुन नेहमी वाद होत होते. दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी संदिप व त्याची पत्नी रुपाली या दोघांचे भांडण झाले होते. त्यानंतर संदिप हा सकाळी 9 वाजता घरातुन निघुन गेला होता. तो सायंकाळी 7:00 वाजे पर्यंत घरी आला नाही. त्यानंतर घरच्यांनी त्याला नातेवाईकांकडे, मित्र परिवार आणि गावात जाऊन पाहिले पण तो मिळुन आला नाही. त्यानंतर दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संदिपच्या बहिनीने अकोले पोलीस स्टेशन येथे संदिप मिसींग झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर संदिप हा दि. 27 एप्रिल 2025 रोजी घरी परत आला होता. तो घरी आल्यावर घरच्यांनी त्याला तु असे घर सोडुन का गेला होता? असे विचारले. तेव्हा तो म्हणाला की, मला माझी पत्नी रुपाली हिचा खुप त्रास आहे, ही बाई किरकोळ कारणावरुन मला नेहमी भांडत राहते, मला सारखे टॉर्चर करते, मी तिच्या नेहमीच्या भांडणाला व त्रासाला कंटाळलो आहे, तिच्या सोबत राहणे मला असहाय्य झाले आहे. मला त्रास सहन होत नाही म्हणुन मी घरातुन निघुन गेलो होतो, मी आत्महत्या करणार होतो पण मला वाटले आज ना उद्या ती सुधारेल, म्हणून मी माझा टोकाचा निर्णय रद्द करुन पुन्हा आलोय असे त्याने सांगीतले. तेंव्हा घरचे त्याला म्हणाले तु त्रास करुन घेवु नको आपण तिच्या आई वडीलांना, भावांना, नातेवाईकांना बोलावुन घेवु आणि एक बैठक लावून काहीतरी मार्ग काढू अशी समझ संदिपची काढली होती.
दरम्यान, दि. 28 एप्रिल 2025 रोजी संदिपचे वडिल दिलीप यांनी त्यांची सुन रुपाली हिचे वडीलांना घडलेला सर्व प्रकार सांगीतला होता. त्यानंतर त्यांच्या घरी बैठक घेवु व चर्चा करु असे ठरले होते. दि. 28 एप्रिल 2025 रोजी पासुन दिलीप मंडलिक यांनी रुपाली हिच्या वडीलांना फोन केला होता, तुम्ही घरी येवुन रुपाली हिला समजावुन सांगा ती संदिपला खुप त्रास देत, असे सांगितले होतो. तेंव्हा रुपाली हिचे वडील म्हणाले की, आम्ही येतो आणि तिला समजून सांगतो. मात्र, त्यांनी मनावर घेतले नाही, आज येतो उदया येतो असे म्हणत फक्त उडवा-उडवी केली, त्यानंतर म्हणाले की, आम्ही दि. 02 मे 2025 रोजी तो, तेव्हा आपण बैठक घेऊ आणि योग्यतो निर्माण घेऊ.त्यानंतर आज शुक्रवार दि. 02 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासुन रुपाली संदिपशी भांडत होती. तु माझ्या आई वडिलांना कशाला बोलवले असे म्हणत वाद घालत होती. तेव्हा सासू सासरे हे रुपालीला समजावुन सांगत होते. की, ते येतील आणि दोघांना समजून सांगतील. पण, रुपाली शांत बसत नव्हती. तेव्हा संदिप भांडण चालु असतांना रुपाली आ म्हणाला, तु मला खुप त्रास दिला आहे, तु सुधारणार नाहीस, मला तुझा त्रास सहन होत नाही, मी माझ्या जिवाचे काहीतरी बरेवाईट करुन घेतो, तेंव्हाच तुझ्या मनाला शांती मिळेल असे बोलला. तेंव्हा घरातील सर्वांनी त्याला समजावले होते. पण त्याच्या डोक्यातून पत्नीचा त्रास जात नव्हता, दरम्यान, आज दुपारी 01 वाजण्याच्या सुमारास रुपाली हिचे वडील शंकर ढोले, भाऊ सागर ढोले व अमोल ढोले व त्यांचे काही नातेवाईक हा वाद मिटविण्यासाठी घरी आले होते. तेंव्हा चहापाणी होऊन चर्चा चालु होणार होती तेवढ्यात संदिपची बहिन उज्वला ही घराच्या मागे असलेल्या गोठ्याकडे गेली होती, ती अचानक मोठ्याने ओरडली तेंव्हा सर्वजण घराच्या मागे गोठ्याकडे पळाले, तेथे जाऊन पाहिले तर संदिप याने गोठ्यातील लाकडाला दोरीने गळफास घेतला होता.
दरम्यान, एकच गदारोळ झाला, पत्नीच्या त्रासाने कंटाळलेल्या लेकरांचा लटकलेला मृतदेह पाहून त्याच्या आई आणि बहिणीने एकच टाहो फोडला, नंगाट सुनेच्या जाचापाई लेकरु गमविल्याच्या गगनभेदी किंकाळ्यांनी माळेझाप परिसर गलबलून गेला होता. अतिशय शांत, संयमी व हुशार संदिप कायमचा सगळ्यांना सोडून गेला. त्यानंतर स्थानिकांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे साहेब व टिम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी संदिप याचा मृतदेह खाली घेतले तेंव्हा त्याच्या पॅन्टच्या खिशात पोलीसांना एक चिठठी मिळाली. त्यात असे लिहिले होते. की, "एवढे सर्व होऊनही बायको सुधारली नाही, त्यामुळे मी जिवन संपवत आहे. बैठका घेवुन काही उपयोग नाही. कारण मला तिला सोडायचे नव्हते, ती सुधरावी ही अपेक्षा होती" असा मजकुर लिहीलेला होता. संदिप याने पत्नी रुपाली हिच्या भांडणाला व त्रासाला कंटाळुनच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी रूपाली संदिप मंडलिक हिच्यावर अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली हिला पोलिसांनी अटक केली आहे.