संगमनेरात" मुख्यमंत्र्यांचे, भाषण" निळवंडे धरणाच्या पाण्याचा विस्तार तळेगाव पर्यंत...
संगमनेर (प्रतिनिधी) :-
आज संगमनेरने जे स्वागत केले. ते म्हणजे "हवाओंमे रुख बदल रहा हैं". असेच काहीसे आहे. संगमनेरात परिवर्तनाची झलक पहायला मिळाली आहे. आपण महाजनादेश यात्रेचे भव्यदिव्य स्वागत केले. हाच आमच्यासाठी जनाधार आहे. त्यामुळे संगमनेरात आमची ताकद वाढली आहे. यात शंकाच नाही. तुम्ही सगळे मोठ्या प्रमाणावर सभेला आलात हाच आमचा जनादेश आहे. ही यात्रा, जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी काढली आहे. जनता हेच आपले दैवत आहे. मोदी साहेबांनी सांगितले आहे की, जनतेचा आशिर्वाद होता म्हणून लोकसभेत काँग्रेसचे पैलवान "चारी मुढ्या चित" करू शकलो. जे कोणी नडले त्यांना धडा शिकवायचा ही बीजेपीची परंपरा आहे. आता लोकसभा झाली. त्यात जनतेच्या ज्या समस्या आहेत. त्या समजून घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत. आमच्या नंतर काँग्रेस राष्ट्रवादी यांनी यात्रा काढायला सुरूवात केली. मात्र, त्यांच्या यात्रांना मंगलकार्यालये भरत नाहीत. आणि आमच्या सभांना मैदान पुरत नाहीत. आता २५ वर्षे तुम्हाला सत्ता नाही. मात्र, १० ते १२ वर्षे निट राहिले तर ठिक. किमान विरोधीपक्ष होण्याइतके तरी किमान प्रतिनिधी निवडून येतील. नाहीतर अवघड परिस्थिती होईल. आज काँग्रेस नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी कारणे सांगत आहे. जसे विद्यार्थी परिक्षेला जातो, पेपर देतो, लिहीतो, तरी नापास होतो. पालक विचारतात. का रे बाबा नापास झाला. त्यावर तो म्हणतो. बाबा मी मिरीटमध्ये आलो असतो. मात्र, माझा पेन चांगला नव्हता. तसेच काँग्रेस करत आहे. निवडणुकीत हारते आहे. आणि ईव्हीएम वर त्याचे खापर फोडते.
गेली अनेक वर्षे आम्ही कठीण परिस्थितीचा सामना केला आणि जनतेचा विश्वास संपादन केला. ५० वर्षे काँग्रेसचे सरकार होते. त्यांनी २० हजार कोटी निधी उपलब्ध केला. तर आम्ही ५ वर्षात १० हजार कोटींचा निधी खर्च केला. जेव्हा-जेव्हा शेतकऱ्यांवर बला आली. तेव्हा आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ऊभे राहिले आहे. त्यांना पिक विमा, कर्जमाफी, दुष्काळ, कापूस, रोगराई याबाबत निर्माण होणाऱ्या समस्यांवर हल काढले. जलयुक्त शिवाराची कामे चांगल्या प्रमाणावर केली. पाणी अडविले, जिरविले. शेतकऱ्यांचे हित साधले. आज हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून जलसिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्याचे काम सुरू आहे.
१२ शे कोटी रुपये निळवंडे धरणासाठी दिले आहेत. दिड वर्षात त्याचे सर्व काम पुर्ण करण्यास मी शब्दबद्ध आहे. त्यासाठी राम शिंदे, ना. विखे पाटील व गिरीश महाजन हे तुमच्या सोबत आहे. तसेच निळवंड्याच्या पाण्याचा तळेगावपर्यंत विस्तार व्हावा असे आदेश मी आजच देतो. लगेच त्याचा सर्वे करायला सांगतो. जसे कोकणात पडणारे पाणी आपण नियोजन आखून नगरच्या उत्तर, दक्षिण जिल्ह्यासाठी आणून येथील दुष्काळ दुर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री निधीतून ३० हजार किलोमिटर रस्ते तयार करण्यात आले आहे. देशाच्या कोणत्याही राज्यात ३० हजार सोडा १० हजार किलोमिटरचे रस्ते तयार झालेले दिसणार नाही. ही शास्वती देतो. गेल्या ५ वर्षात १८ हजार गावात पिण्याच्या पाण्याची योजना केली आहे. ७ लाख घरे बांधली आहेत. मोदी साहेब म्हणाले २०२२ मध्ये प्रत्येक व्यक्तीला घरे मिळालेली असेल. देशात घर, शौचालय व गॅस, पाणी यांचा प्रश्न सोडवायचा आहे. आपल्या सरकारात गरिबांचे कल्याण हाच अजेंडा असला पाहिजे. असे मोदीजी म्हणतात. मोदींनी आर्थिक विकासाचा वेग वाढविला आहे. आता जो कोणी देश नादाला लागेल, त्यांच्यावर "सर्जिकल स्ट्राईक" करण्याची हिंमत मोदींमध्ये आहे.
जम्मू कश्मिर येथील ३७० कलम हटवून मोदी व शहांनी भारताला बळकटी दिली आहे. १५ आॅगस्ट रोजी मी मुंबईत, मोदींनी दिल्लीत तर जम्मु कश्मिर व लडाख येथे मोठ्या दिमाखात तिरंगा फडकला आहे. आपल्याला एक वैभवशाली भारत घडवायचा आहे. म्हणून मी संगमनेर मध्ये तुमचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही मला आशिर्वाद द्याल का? ...होय....राम शिंदेंना आशिर्वाद द्याल का ? ...होय ! ना. विखे पाटलांना आशिर्वाद द्याल का ? ..होय ! तुम्ही खा. सुजय विखे यांना आशिर्वाद द्याल का ? असे म्हणताच प्रचंड जल्लोष झाला. तुम्ही वैभव पिचड यांना आशिर्वाद द्याल का ?...होय !! तुम्ही भाजप सरकारला आशिर्वाद द्याल का ? होय असा प्रतिसाद एकुण मुख्यमंत्र्यांनी भाषणाला पुर्णविराम दिला.
- सगार शिंदे
- सुशांत पावसे
============मुख्यमंत्री यांच्या भाषणाचे विश्लेषण
"रोखठोक सार्वभौम" वर. नक्की वाचा. काय हवे होते आणि काय नको. एक अभ्यासपुर्ण लेख..!!
====================
"सार्वभाैम संपादक"
- सागर शिंदे
8888782010
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ५७ दिवसात १०६ लेखांचे ५ लाख ८० हजार वाचक)
----------------------