काय म्हणाले "अकोल्यात" मुख्यमंत्री, "जसेच्या तसे भाषण" डॉ. लहामटे "ताब्यात", शर्मिला येवले यांनी केली ताफ्यावर "शाईफेक"
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोल्यात भाषणाला सुरुवात करतांना पहिल्यांदा छत्रपती शिवराय डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राघोजी भांगरे यांच्या नावाने सुरूवात केली. त्यामुळे पहिलाच टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले भाजपला खऱ्या अर्थाने बळ केव्हा मिळाले तर, जेव्हा मधुकर पिचड यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा. त्यामुळे आमची ताकद वाढली आहे. आता एकीकडे आम्ही व दुसरीकडे तुमचे बळ, त्यामुळे वैभव पिचड रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणार. यात शंकाच नाही. येथे आले की आम्हाला शिवरायांची प्रेरणा मिळते. येथे आदिवासी समाज्याची संस्क्रुती आहे. येथील शेकतरी कष्ट करणारा आहे. म्हणून इकडे येताना आनंद होतो. तुम्ही सगळे मोठ्या प्रमाणावर सभेला आलात हाच आमचा जनादेश आहे. ही यात्र, जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी काढली आहे. जनता हेच आमचे दैवत आहे. त्यांचा आशिर्वाद होता म्हणून लोकसभेत काँग्रेसचे पैलवान "चारी मुढ्या चित" करू शकलो. जे कोणी नडले त्यांना धडा शिकवायचा ही बिजेपीची परंपरा आहे. आता लोकसभा झाली. त्यात जनतेच्या ज्या समस्या आहेत. त्या समजून घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत. आमच्या नंतर काँग्रेस राष्ट्रवादी यांनी यात्रा काढाला सुरूवात केली. मात्र, त्यांच्या यात्रांना मंगलकार्यालये भरत नाहीत. आणि आमच्या सभांना मैदान पुरत नाहीत. त्यांना जेव्हा सत्ता दिली. तेव्हा माजोरी आणि मुजोरी केली. आता १० ते १२ वर्षे निट राहिले तर ठिक. किमान विरोधीपक्ष होण्यासाठी तरी किमान प्रतिनिधी निवडून येतील. नाहीतर अवघड परिस्थिती होईल.
मधुकर पिचड यांनी आजवर आदिवाशांचे चांगले नेत्रुत्व केले आहे. वैभव पिचड हे शांत, सयमी, अभ्यासू व शिस्तबद्ध व्यक्तीमत्व आहे. हे मी गेली पाच वर्षे पहात आहे. त्यानी अगदी मुद्देनिहाय आपली मते मांडली आहे. त्यांना पुढच्या काळात नक्की चांगले यश येईल.
गेली अनेक वर्षे आम्ही कठीण परिस्थितीचा सामना केला आणि जनतेचा विश्वास संपादन केला. ५० वर्षे काँग्रेसचे सरकार होते. त्यांनी २० हजार कोटी निधी उपलब्ध केला. तर आम्ही ५ वर्षात १० हजार कोटींचा निधी खर्च केला. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर बला आली. तेव्हा तेव्हा आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ऊभे राहिले आहे. जेव्हा जेव्हा वैभव पिचड यांनी मागण्या केल्या. त्या आम्ही मान्य केल्या आहेत. आदिवासी समाज्यास आम्ही आजवर मदत करण्याच प्रयत्न केला आहे. आज हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून जलसिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्याचे काम आम्ही करत आहोत.
जम्मू कश्मिर येथील ३७० कलम हटवून मोदी व शहांनी भारतातील बळकटी दिली आहे. १५ आॅगस्ट रोजी मी मुंबईत, मोदींनी दिल्लीत तर जम्मुत मोठ्या दिमाखात तिरंगा फडकला आहे. आपल्याला एक वैभवशाली भारत घडवायचा आहे. म्हणून मी अकोल्यात तुमचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही मला आशिर्वाद द्याल का? ...होय....राम शिंदेंना आशिर्वाद द्याल का ? ...होय ! ना. विखे पाटलांना आशिर्वाद द्याल का ? ..होय ! आणि वैभव पिचड यांना आशिर्वाद द्याल का ?...होय !!!!
जय हिंद
जय महाराष्ट्र
दरम्यान शेतकरी स्वाभिमानी पक्षाच्या शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला तो मुद्दा चर्चेचा विषय ठरला. तर दुसरीकडे पिचड विरोधी डॉ. किरण लहामटे यांनी एक दिवसीय आदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना पोलिसांनी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ताब्यात घेतले होते.==============