...तर निवृत्ती महाराजांचा "राज ठाकरे" होईल !! राजकिय किर्तनाला इंदोरीकरांचा "जयहारी"..!
महाराज एकदाच लढा, हे शिट औदा पाडायचय |
संगमनेरमध्ये "राजकीय पंथातील" आ. बाळासाहेब थोरातांना शह देण्यासाठी "ह.भ.प पंथातील" निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना पुढे केल्याची चर्चा आता जोरदार रंगूू लागली आहे. त्याच पार्श्वभुमिवर बुवांनी संगमनेर येथे महाजनादेश यात्रेत "भाजपच्या मंचकावर हजेरी" देखील लावली. त्यामुळे शंकेचे धागे जुळून येऊ लागले आहे. म्हणून थोरातांना विरोधक म्हणून ते योग्य उमेदवार ठरतील का ?, नेहमी लोकांकडून लाखो रुपये कमविणारे महाराज आता जनतेत मतदानासाठी पैसे उधळतील का ? त्यांच्या शब्दफेकीची "जादू" आणि हासविण्याची "लकब" यामुळे जमा होणाऱ्या "गर्दीचे रुपांतर" मतात होईल का ? की; यांची अवस्था "राज ठाकरे" यांच्यासारखी होईल ? असा प्रश्न जनतेच्या मनात सुरू आहे. खरे पाहता ठाकरे हे पुरावे देऊन भाषणात प्राण आणतात. सत्य कथन करून ते लोकांच्या गळी उतरवितात. तर दुसरीकडे निवृत्ती महाराज शेतकरी आत्महत्या, मुले-मुली, सासू-सुन, आई-बाप असे अनेक सामाजिक विषय हताळतात. मात्र, हे "वास्तव" फक्त हसू करण्यासाठी जनता वापरते. हे दुर्दैव आहे. त्यामुळे राज्यात हे दोन्ही व्यक्तीमत्व तळमळीचे व परिवर्तनवादी आहेत. मात्र, लोक त्यांना गांभिर्याने घेत नाहीत. त्यामुळे, निवृत्ती महाराजांना समाजकारण करायचे असेल तर त्यांनी विधानसभेत गेले पाहिजे. कारण, भाजपात प्रद्न्यासिंह ठाकूर, जय सिद्धेश्वर महाराज, योगी आदित्यनाथ अशी "महाराज" निवडूण येतात. तेव्हा "इंदोरीकर" महाराज तर यांच्या कित्तेक पटिने लोकप्रिय आहेत. त्यामुळे आता "टाळ म्रुदूंगाचे स्वर" विधानभवनात गुंजणार का ? असे प्रश्न जनतेच्या मनात "नाचू" लागले आहेत.
भाजपच्या झेंड्यावर थोरातींची दिंडी ? नाय पटत ! |
आता महत्वाचा विषय असा की ! एकीकडे आ. थोरात यांची ताकद आणि दुसरीकडे महाराजांची लोकप्रियता. तिसरीकडे आ. थोरात यांचा प्रांजळ स्वभाव, सोज्वळ राजकारण आणि संगमनेर तालुक्यात केलेला विकास. तर महाराजांकडे बघण्याचा धार्मिक द्रुष्टीकोण, किर्तनाला जमनारी अमाप गर्दी, त्यांचे प्रबोधन. तर चौथीकडे थोरातांचे प्राबल्य, बुथनिहाय नियोजन, संस्थात्मक एकगठ्ठा मतदान, शरद पवारांची साथ आणि माननारा मतदार. तर ना. विखे, खा. विखे व सौ. विखे यांची ताकद, तसेच आरएसएसची व भाजपची रणनिती यांचे नियोजन. या सर्व प्रकारात संगमनेरची "फाईट टफ" होणार यात शंकाच नाही. महाराष्ट्रातील लोकांच्या मानसिकतेचा कौल पाहिला तर, गर्दी जमायला वेळ लागत नाही. मात्र, दर्दी जमवायला नाकीनव येते. जसे एखादा अपघात झाला तर रस्ता ब्लॅक होतो. इतकी अमाप गर्दी जमा होते. पण, त्या गर्दीत दर्दी मानसे अगदी बोटावर मोजण्याईतके असतात. जे धावून येऊन मदतीचा हात पुढे करतात आणि बाकी सगळे बघ्याची भुमिका पार पाडतात. त्यामुळे गर्दी जमते म्हणून जर महाराजांना पुढे केले जात असेल तर त्याचे "चिंतन" करणे गरजेचे आहे. असे "राजकीय विश्लेषकांना" वाटते. किंवा जमलेल्या गर्दीचे रुपांतर "मतात" कसे करता येईल. यासाठी काही उपायोजना करणे आवश्यक वाटते.
महाराज !! आपल्या आपल्यात का आता ? |
एकीकडे मनसे अध्यक्ष "राज ठाकरे" यांचा विचार केला तर. मुंबईत सोडा, संपुर्ण राज्यात त्यांची कोठेही सभा असेल तर. गर्दीला अटोका नसतो. मात्र, पहिली निवडणुक वगळता त्यांना पुढे फारसे यश आले नाही. विशेष म्हणजे, सभांना गर्दी कमी झाली नाही. मात्र, गर्दीचे "रुपांतर मतात" झाले नाही. हे दुर्दैव स्वत: ठाकरे साहेबांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. उत्तम उदाहरण सांगायचे झाले. तर, सन २०१९ च्या लोकसभेचा "आखाडा" गाजविणारा हा एकमेव "पैलवान". सभांना गर्दी पाहिली तर बाप रे !!, भाजपचा सुपडा साफ होते की काय ! अशी परिस्थिती होती. मात्र, चित्र तर वेगळेच पहायला मिळाले. इव्हीएमने म्हणा की जनतेची नाराजी त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता औषधाला शिल्लक राहिली नाही. असे टोले विरोधक वारंवार देऊ लागले आहेत. त्यामुळे लोकांच्या झेंड्यावर पंढरीची वारी करण्याचा प्रयत्न केला तर...! जे काही होईल ते निकालच सांगू शकेल.
अर्थात भाजपला बुवाबाजी चांगलीच धारजीन असल्याचे बोलले जाते. त्यांनी साेलापुरात जयसिद्धेश्वर महाराज, एमपीत योगी अदित्यनाथ, तर प्रद्न्यासिंग ठाकूर अगदी मालेगाव बाँम्बस्पोटात आरोपी असताना. मेडिकल लीव वर असता त्या खासदार म्हणून निवडून आल्या. इतका तर "धर्मनिष्ठ" मतदार भारतात नांदतो आहे. सोलापुरात एक महाराजच प्रकाश आंबेडकरांना पाडू शकतो. संविधान ओरडून सांगणारा जेएनयुचा माजी विद्यार्थी "कन्हैया कुमार" बेगूसराय मधून पडू शकतो. तर या देशात काहीही होऊ शकते. असे अभ्यासकांना वाटते. त्यामुळे निव्रुत्ती महाराजांनी उभे का राहु नये. असा प्रश्न "काहीशा खोचक" तर "काहीशा चर्चात्मक द्रुष्टीकोणातून पुढे येत आहे. यापुर्वी सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, सनी देवोल, उर्मिला मातोंडकर, शत्रुघ्न सिंन्हा अशा अनेकांनी खासदारकी भोगली तर यात काहींना अपयश आले. क्रिडा क्षेत्रात सचिन तेंडूलकर हे देखील संसदेत गेले. त्यामुळे, प्रत्येक क्षेत्रातून संसदेत जाण्याची संधी आहे. मग किर्तनकार का जाऊ नये. राजकीय युद्धात हारजीत चालुच असते. त्यामुळे महाराजांनी नशिब आजमावयास हरकत काय ! असे मत जनतेतुन येत आहे. त्यांना शिर्डीच्या काशिकानंद महाराज यांनी "अनुमोदन" देखील दिल्याचे आपण पाहिले. तरी निव्रुत्ती महाराज देशमुख यांनी आखाड्यात उतरण्यास नकार दिला आहे.
संगमनेर ! नको रे बाबा ! कानाला खडा !! |
असे बोलले जाते. की, महाराज कोल्हापुरच्या पुरग्रस्तांना १ लाख रुपयांची मदत करण्यासाठी संगमनेरात भाजपच्या स्टेजवर आले होते. यात कोणताही राजकीय हेतू नाही. पण, १५ तारखेपासून तीन जिल्हे पाण्याखाली होते. ते ११ दिवस. तरी महाराज शांत होते. अकोले ही त्यांची "जन्मभूमी" आहे. तेथेही "मुख्यमंत्री" आले होते. आणि "महाराजही" येऊ शकले असते. पण, अकोले "राखीव मतदारसंघ" आहे. तर "संगमनेर खुला". त्यामुळे त्यांच्या "राजकिय किर्तनाची" चर्चा संगमनेरात जोरदार सुरू आहे. तसेच "पुरग्रस्तांना" मदत करायची असेल तर. तिकडे काही किर्तने करून निधी किंवा मततीचे आवाहन केले कर कोट्यावधी रुपये जमा होऊ शकतील. पण, "चेक हा मेट" करण्यासाठीच होता की काय ! अशी चर्चा सोशल मीडियात सुरु आहे.
दरम्यान, आपण समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे. त्यामुळे निवडणुक रिंगणात उतरणार नाही. भाजपचे स्टेज केवळ पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी शेअर केले होते. असे निव्रुत्ती महाराज यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्हेंटीलेटरवर असणाऱ्या संगमनेरच्या २४ उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. मात्र, इतकी मोठी सभा होऊन देखील उमेदवाराचे नाव निच्छित केले नाही. मात्र, एका उमेदवाराची चर्चा सद्या जोर धरू लागली आहे. त्यावरील लेख वाचण्यासाठी वाच सायंकाळी "रोखठोक सार्वभौम"....
-- सागर शिंदे
====================
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
8888782010
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ५९ दिवसात ११० लेखांचे ५ लाख ९२ हजार वाचक)
----------------------