सन १९९५ ची निवडणुक आणि "पिचडांचा "विजय" व भांगरेंचा "पराजय" हे पारंपारिक युद्ध" ; आता बदल शक्य, पण..!
इतिहासाचे साक्षिदारकॉ. शांताराम वाळुंज |
अकोले (प्रतिनिधी) :-
तो काळ सन १९८९ चा होता. मधुकर पिचडांनी आता सलग "१० वर्षे" आमदारकी भोगली होती. त्यांचे पाय राजकारणात खोलवर रुजत चालले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या प्रश्नांना कोठे न्याय मिळत नव्हता. म्हणून त्यांना पर्यायी "तरुण व्यक्तीमत्व" म्हणजे आम्ही "अशोक यशवंत भांगरे" यांच्या "पंखात बळ" भरले. त्यासाठी कम्युनिष्ठ, समाजवादी या दोघांनी मिळून भांगरेंना "जनतादलाचे चक्र" या चिन्हावर उमेदवारी दिली. तर अकोल्यात शिवसेनेने नुकतेच डोके वर काढले होते. त्यांची उमेदवारी "काशिनाथ साबळे" यांनी केली होती. परंतु अशोकराव यांना "यशवंत भांगरे व गोपाळ भांगरे" या दोन्ही माजी आमदारांची "कौटुंबिक पार्श्वभूमी" असल्यामुळे त्यांच्यामागे चांगला "जनाधार" होता. तर दुसरीकडे साबळे नवखे होते. त्यामुळे जो विजयी होऊ शकतो त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे एकवटलो होतो. त्यात कॉ. कारभारी उगले, दशरथ सावंत, मी (कॉ. शांताराम वाळुंज) मधुकर नवले, गिरजाजी जाधव यांच्यासह काँग्रेसचे अॅड. महाले यांनी देखील भांगरे यांना पाठिंबा दिला होता. तर सावंत यांच्या नेत्रुत्वाखाली अनेकजण पिचडांच्या विरोधात "दंड थोपटून" मैदानात उतरले होते. मात्र, तरी काही अंशी फरकाने पिचडांनी विजयाचा गुलाल उधळून "भांगरेंचा पराभव" केला.
पारंपारिक विरोधक |
"एकनिष्ठ साहेब" !!? |
या निवडणुका झाल्या आणि काही काळ लोटतो तेच अशोक भांगरे पिचडांना जाऊन मिळाले. १९९७ साली ज्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. त्यात भांगरे पुन्हा झेडपीचे सदस्य झाले. भांगरेंच्या अलटी-पलटी धोरणामुळे त्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडत राहिला. नाहीतर खऱ्या अर्थाने ते आजही अकोल्याचे आमदार राहिले असते.
इकतेच काय ! १९९७ नंतर दोन वर्षात म्हणजे १९९९ साली शरद पवार यांनी "राष्ट्रवादी" पक्ष काढला आणि "मधुकर पिचड" पवारांसोबत "घड्याळात" बसले. त्यावेळी अशोक भांगरे यांनी पुन्हा पिचडांची साथ सोडली आणि १९९९ ला काँग्रेसच्या पंजावर निवडणूक लढविली. त्यावेळची एक गोष्ठ नमुद करावीशी वाटते. की; १९९५ ला जे पिचडांचे सोबती विरोधात गेले होते. ते पुन्हा त्यांना जाऊन मिळाले. पिचडांनी त्यांना "स्थानिक स्वराज्य संस्थांवर पदे बहाल केली". तेव्हा सगळा "फुटीर ताफा" एक असतांना देखील १९९९ च्या निवडणुकीत भांगरे यांना अवघ्या २२ शे मतांनी पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर भांगरे यांनी २००४ साली "शिवसेनेत प्रवेश" केला आणि तेव्हाही पिचडांना शह दिला. पुढे २००९ मध्ये "मधुकर तळपाडे" यांनी पोलीस खात्याचा राजिनामा देत पिचडांशी दोन हात केले. त्यावेळी "अशोक भांगरे" यांनी "मनसेत" प्रवेश केला आणि अकोल्यात तिरंगी लढत झाली. पुढे २०१४ साली "शिवसेना भाजप" युती झाली नाही. त्यामुळे शिवसेनेकडून मधुकर तळपाडे यानी उमेदवारी केली तर "अशोक भांगरे" यांनी "भाजपात प्रवेश" करून पुन्हा तिरंगी सामना उभा केला. हे सर्व वातावरण पिचड घराण्याला "पोषक" ठरत गेले आणि ते निवडून येत राहिले.
हात जोडले आजवरच्या राजकारणाला आता मला एकदा संधी द्या ! |
आज त्यांचा पराभव करायचा असेल तर "एकास एक उमेदवार" दिला पाहिजे. "पिचडांचा पक्षबदल" जनतेच्या "पचणी" पडलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अकोल्यात "सुप्तलाट" निर्माण झाली आहे. आता डॉ. किरण लहामटे हे उमेदवार म्हणून कार्यरत असले तरी ते "दिशाहीन" आहेत. त्यामुळे त्यांनी "नियोजनात्मक काम" केले पाहिजे. "विरोधकांची मोट" बांधली पाहिजे. "बुथनुसार तरुणाचे व कार्यकर्त्यांचे संघटन" ऊभे केले पाहिजे. "नियोजन असेल तर पिचडांचा पराभव" शक्य आहे. अन्यथा "येरे माझ्या मागल्या" अशीच स्थिती अकोल्यात पहावयास मिळेल.======================
टिप :- लेखात शब्दरचना ही संपादकीय आहे. काही बदल असु शकतात. परंतु एक अकोल्याचा इतिहास म्हणून आम्ही ही पाने चाळून सादर करत आहोत.
- सागर शशिकांत शिंदे
(संपादकीय)
----------------------------------------
श्रीगणेशाचा आकर्षक "आरस" अल्पदरात मिळण्याचे एकमेव ठिकाण, विजय फुटवेअर शेजारी संस्क्रुती माॅल खटपट नाका अकोले. संपर्क :- ७३०४६५९००९, ९२८४०६५५०७ योगेश लाड |
---------------------------------------
५ लाख वाचकांचे लोकप्रिय पोर्टल "रोखठोक सार्ववभौम"