ना. "विखे प्रणित" काँग्रेसच्या "कांबळेंनी" दिला आमदारकीचा "राजिनामा" शिवसेनेत प्रवेश करणार..! श्रीरामपुरात "राजकीय खलबते" !!!

जेथे विखे आम्ही तेथे  !!

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :-                 श्रीरामपूर तालुक्यातील "काँग्रेसचे" आमदार "भाऊसाहेब कांबळे" यांनी आमदारकीचा "राजिनामा" दिला आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात "काँग्रेसचे "प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. त्यांच्या शेजारीच असणारे कांबळे त्यांना सोडून गेले. तरी त्यांना "कानोकान खबर" लागली नाही. अर्थात कांबळे यांच्या डोक्यावर ना. विखे यांचा हात होता तोवर ते काँग्रेसचे आमदार होते. विखेंनी खासदारकीला लोखंडे यांच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हाच कांबळेंचे "राजकारण संपल्याचे" जगजाहीर होते. मात्र, त्यांची हुशारकी पुन्हा कामी आली असून त्यांनी आमदारकीचा राजिनाा हरिभाऊ बागडे यांच्याकडे देत. ते विखे सांगतील त्या पक्षात (शिवसेना) "विखेप्रणित" भूमिका पार पाडतील हे "निर्विवाद" सत्य आहे. या घडामोडींमुळे उत्तर नगर जिल्ह्याचे संपुर्ण राजकारण बदलले असून बाळासाहेब थोरातांच्या "अध्यक्षपदावर" देखील पक्षातूनच "प्रश्नचिन्ह" उभे राहु लागले आहे. असे बोलले जात आहे.

खेळ अजूनही संपला नाही. कारण, संगमनेर अजून बाकी आहे.


                    ना. विखे साहेबानी मुलासाठी "नगर दक्षिणची जागा" मागितली आणि ती काँग्रेस व राष्ट्रवादीने" नाकारली. त्याची "परिणीती" म्हणजे वर "ढगाला लागली कळ, पाणी थेंब-थेंब गळं" एशीच काहीशी झाली आहे. अगदी एक-एक "खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, सभापती, सरपंच" थेंबा-थेंबासारखा "शिवसेना - भाजपात" मार्गस्त होऊ लागला आहे. इतकेच काय ! "धुरंधर राजकारणी" आपल्या "संयमाचे नियंत्रण" सोडू लागले आहेत. अर्थात एक जागा दिली असती तर "सगळ्या जागा आणि पक्ष" स्टेबल राहिले असते. पण, आपल्यासारख्यांनी मातब्बर नेत्यांना काय सांगावं ! सजेशन ? छे..! "राष्ट्रवादीला प्रश्न विचारायची मानसिकता" ना. विखेंनी ठेवली नाही. हे आपण श्रीरामपुरला पाहिलेच. त्यामुळे "काँग्रेस - राष्ट्रवादी" पुरती "बेहाल" झाल्याचे दिसत आहे.

साहेब ! गुच्छ घ्या, मी येतो, तुम्हाला शुभेच्छा !! 

         काल सायंकाळी  श्रीरामपुरचे भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेसला "रामराम" ठेकला. अर्थात याचे ज्याला "आश्चर्य" वाटेल त्याने राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न देखील करू नये. कारण, "शिर्डी लोकसभा" मतदारसंघात कांबळे यांना तिकीट मिळाले तेव्हा त्यांच्या "उड्या गगणाला भिडत होत्या".  वर पिचड, खाली थोरात, शेजारी विखेंचा आशिर्वाद त्यामुळे "आमदारकीच्या" मतदारसंघात "खासदार" म्हणून निवडून येणार असाच त्यांचा "मनसुबा" होता. कारण; तेव्हा विखे साहेब काँग्रेसमध्येच होते. तर पुत्र भाजपात दाखल झाले होते. अर्थात मुलास निवडून आणण्यासाठी "मैदानावर" फिरून डॉ. सुजय विखे यांनी जितके काम केले नाही. तितके ना. विखे साहेबांनी "पडद्याआड" राहुन केेले आहे. त्यामुळे सदाशिव लोखंडे यांनी कर्जत जामखेडमध्ये डॉ. विखेंना मदत केली म्हणून कांबळे यांना डावलून खा. लोखंडे यांच्या विजयाचा गुलाल विखे साहेबांनी उघळला. हे "साट-लोटं" करुन त्यांनी दोन्ही शिट निवडून आणले. आणि नगरमध्ये भाजपचा किल्ला मजबूत केला. जेव्हा विखेंच्या शब्दावर कांबळे चालतील असे वाटत होते. तेव्हा याच कांबळेंनी निरोप दिला होता. आता "मी फार पुढे गेलो आहे". त्यामुळे "विखे साहेब..! माफ करा. मी निवडणुक लढतोय" !

२ वेळा आमदार केलं आपले आभार !!

         खरे पाहता, जेव्हा ना. विखे यांनी सदाशिव लोखंडे यांच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हाच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या तोंडवर "बारा वाजले" होेते. कारण, राहुल गांधी यांनी "पाच काय, दहा सभा" घेतल्या तरी स्थानिक पातळीवर "विखे पॅटर्न" याशिवाय इकडे काही चालत नाही. हे "गांधी व थोरात" विसरले तरी कांबळे कधीच विसरले नाही. त्यामुळे कांबळे यांचा जीव "विखेंच्या वाड्यावर" भटकत होता. असेच बोलले जात होते. अर्थात "कांबळे आणि लोखंडे" यांचे स्वत:चे "राजकीय अस्थित्व" म्हणजे "विखे साहेब" आहेत. त्यामुळे "राजा बोले अन् दल हले" तशीच गंमत य नामधारींची आहे. असे आरोप होत आहे. त्यामुळे, "कांबळेंचा राजिनामा" हा काही "एतिहासिक" बदल किंवा जगावेगळे काही नाही. असे "विश्लेषकांना" वाटते.

आ. कांबळेंची गांधिगिरी !!!

           तसेही खासदारकीला कांबळे यांनी फारसा कस लावला नाही. ते ना. विखेंची "बी टिम" होते. अशी टिका तेव्हापासूनच होत होती. तरी वैभव पिचड यांनी कांबळेंच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केले व ३१ हजारांचे लिड जे कधी पिचडांना स्वत:ला मिळाले नाही. तो इतिहास घडवून दाखविला. तर दुसरीकडे ज्या संगमनेरात आ. थोरात "पाऊनलाख" मताधिक्याच्या फरकाने निवडुन येतात तेथे कांबळे यांना सहा हजारांच्या लिडने मागे पडावे लागते. विशेष म्हणजे राहुल गांधी याची सभा होऊन देखील. हे दुर्दैव नाही का ? तर स्वत:च्या मतदार संघात त्यांना २० हजार मतांची पिछाडी आहे. पहिल्यादा आमदार झाले तेव्हा ससाने यांची निष्ठा तोडली. तर लोकसभेला ना. विखे यांची. म्हणूनच लोखंडे २ लाख ४५८ मतांनी निवडून आले. त्यामुळे आता कांबळे यांनी कोणाच्या भरोशावर पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न पहायचे ?.

आठवले म्हणून आले होते. पण..! 

         आता ऐकीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नगरचा दौरा केला. त्यात राजाभाऊ कापसे. विजय वाकचौरे, सुरेंद्र थोरात यांच्यासह अनेकांनी श्रीरामपूरवर हक्क बजावला आहे. अर्थात हे सर्व ना. विखे यांच्या आदेशाने चालणारे मतदारसंघ आहेत. त्यामुळे मागणी पेक्षा नामदारांना काय वाटतं हे महत्वाचे आहे.    आता या सर्व चर्चा सुरू असताना भाऊसाहेब कांबळे यांनी अचानक राजिनामा ठेऊन श्रीरामपुरवर पुन्हा हक्क दर्शविला आहे. अर्थात हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नसेल असे म्हणणे अत्यंत धाडसाचे ठरेल. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा एकच प्रबळ उमेदवार राहिला आहे. ते म्हणजे थोरात साहेब. त्यामुळे या बंडखोरीने काँग्रेसला दु:ख नसेल. मात्र, ताकद कमी झाल्याचा खेद उरात नक्की असणार आहे.
               कांबळे यांचा राजीनामा रिपाईच्या नेत्यांसाठी तोंड "दाबून बुक्क्यांचा मार" ठरणार आहे. तर खा. लोखंडे यांच्या पुत्राची मुस्कटदाबी झाली आहे. परंतु, कांबळे हेच उद्याचे स्थानिक प्रबळ उमेदवार असणार आहे. ते शिवसेनेत जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ज्या मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी विकासकामे करून देखील "बंडखोरीमुळे" त्यांना जनतेने स्विकारले नाही. ते काँग्रेसमधून आलेल्या कांबळे यांना जनता स्विकारेल का ? हे येणारा काळच देणार आहे. व येथील ही लढत देखील रंगतदार होण्याचा शक्यता वाटत आहे.
======================

                -- सागर शिंदे 

                    (संपादकीय)

=======================