"इडा पिडा" जावो, "काँग्रेसचे राज्य" येवो...!
ओवाळीते कर्मयोगी भाऊराया ..! |
''अनंत आमुची ध्येयशक्ती; अनंत आमुच्या आशा, किनारा तुला पामराला''. हे "कोलंबसाचे गर्वगीत" एकले की, "कर्तुत्ववान मानसांच्या प्रतिमा" डोळ्यासमोर खेळू लागतात. कारण, खरोखर त्यांच्या "धैर्याला अंत" नसतो. म्हणून अशावेळी "द्रुष्टीपटलावर" पहिलं नाव समोर येते ते "निष्ठावंत बाळासाहेब थोरात" यांचे. आज देशात पक्षाची "रक्षा-बंधने" तोडून वर्षानुवर्षाच्या रेशीम गाठी "राजकीय स्वार्थापोटी" लिलावात काढल्या गेल्या. मात्र, काँग्रेसचा पाठीराखा म्हणून "थोरात साहेब" अगदी "सह्याद्रिसारखे" ठाम उभे आहेत. म्हणून हा "दिपस्तंभ" कोलमडविण्यासाठी "ना. विखे, पिचड आणि मुख्यमंत्र्यांचे फासे" पडू लागले आहेत. मात्र, या "रडीच्या सारिपाठाला" लाथाडून बंधुराज्यांच्या "मनगटात बळ" यावं यासाठी खुद्द "दुर्गा"रुपात चौघा बहिनींनी साहेबांना ओवाळले असून "इडा पिडा जावो, अन् काँग्रेसचे राज्य येवो" "हेच बळ" देवाकडे मागितल्याचे दिसते आहे.
अखंड भारताचा पंतप्रधान होवो ! |
बाळासाहेबांनी कधीच "कुरघोडीचे" राजकारण केले नाही. स्वत:चा तालुका सोडून अन्य तालुक्यात "गट-तट" करून "घुसखोरी" केली नाही. "संस्था आणि कर्मचारी" यांच्या जोरावर "शिरजोरी" केली नाही. त्यामुळे, "याला उभे करून, त्याला पाडायचे" आणि "याची अडवून, त्याची जिरवायची" हे असले डावपेच त्यांनी कधी केले नाही. अर्थात त्याची गरजही त्यांना कधी पडली नाही. स्थानिक जनतेने त्यांच्यावर "भरभरून प्रेम केले" आणि जिल्ह्यात नव्हे इतक्या लिडने निवडूनही दिले. म्हणून संगमनेरला "काँग्रेसचा बालेकिल्ला" संबोधले जाते.
"अपराजित" बाळासाहेब खरोखर "सत्तेचे लालची" नाहीत. त्यांना यापुर्वी अनेकदा "पक्षबदलाच्या आॅफर" आल्या होत्या. पण, "मंत्रीपदे आणि इडीच्या" धमक्यांना त्यांनी भिक घातली नाही. संगमनेरमध्ये विकास केला. त्या बळावर जनता त्यांना डोक्यावर घेते. नाहीतर "तुझ्याकडे पाहतो, कामाहुन काढतो, बघुन घेईल, गाठ माझ्याशी आहे, असले राजकारण त्याच्या आचरणात सोडा, चेहऱ्यावर देखील दिसणार नाही. त्यामुळे दुर्गाताईंनी भावाचे जे वर्णन केले ते अगदी शब्दन् - शब्द खरे वाटते.
येतो एक गावकी झाकी है, विकास औरभी बाकी है |
साहेब आपल्याला शुभेच्छा..! |
उद्याच्या विधानसभा तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. राज्याची जबाबदारी थोरात साहेबांवर आहे. काही मिळाले नाही, म्हणून कोणी विरोध करीत असेल तर तो निव्वळ अतिशहानपणा ठरेल. मात्र, राज्याचे नेत्रुत्व संगमनेरकडे आहे. याचा अभिमान बाळगून "साहेब..! तुम्ही लढा" आम्ही "संगमनेरचा मतदार" डगमगू देणार नाही. असे ठणकावून सांगितले पाहिजे. नाहीतर व्हायचे प्रकाश आंबेडकरांसारखे, राज्यभर फिरायचे आणि दोन्ही ठिकाणी पडायचे. म्हणून प्रत्येक मतदार "बाजीप्रभू" झाला पाहिजे. जे संगमनेरी खिंड लढवेल. असे मावळे ग्राऊंड लेवलवर दिसावे असे आम जनतेला वाटते. तसेच राज्यात "सो" शेर त्यांच्यावर झोंबून पडले आहे. त्याना एक "सव्वाशेर" नक्कीच भारी पडेल अशी अपेक्षा आहे. साहेबांना उदंड आयुष्य लाभो. आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी, वंचित, मनसे एकत्र येवो. बाकी "इडा पिडा जावो" अन् "काँग्रेसचे राज्य येवो" असे साकडे दुर्गारुपी बहिनींनी देवाला घातल्याचे वाटते.
===================
-- सागर शिंदे
8888782010
फक्त व्हाट्सअॅप
------------------------
जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने ३१ दिवसात ६१ बातम्यांच्या जोरावर ३ लाख ८० हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------