"कलेक्टर" आणि "एसपी" साहेब..! अकोेल्यात "वाळूचे हाप्ते" दिडपट वाढले..! समस्त तस्करांस जाहिर व्हावे हो..!
"प्रशासनानं डोक्यावर घेतलीय वाळू" |
अकोले व संगमनेर तालुक्यात प्रवरेची खोली आणि प्रवाहाचा वेग ही नैसर्गिक देन नाही. तर, तो वाळतस्करांचा आशिर्वाद म्हणावा लागेल. आता महापुरामुळे वाळुचा साठा" घटला असून पुरवठा करायला साठा देखील संपला आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने "वाळुचे हाप्ते" गगणाला भिडले असून ते "दिड पटीने" वाढल्याची माहिती "वाळू तस्करांनीच" दिली आहे. त्यामुळे विभागीय अधिकाऱ्यांसह सगळ्याचे हात यात बरबटले असून काही कारवाई करण्याची हिंमत फक्त वरिष्ठ पातळीहुनच होऊ शकते. त्यामुळे वाळुतस्करांचे "टेबल शेअर करणारी खाकी" आणि "रात्री झोकांड्या" खाणारे महसुल यांना आळा घालणे गरजेचे झाले आहे. नाहीतर अकोल्यात याच वाळुतस्करीतून अण्णा लष्करे, हिंमत जाधव, चन्य बेग, पिन्या कापसे, सोपान गाडे यांच्यासारख्या टोळ्या निर्माण होतील. या तालुक्यात सुगावच्या एका वाळुतस्कराने भर दिवसा एका बड्या राजकीय नेत्यावर पिस्तुली हल्ला केला होता. हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे "पैशाची मुजोरी" हाताबाहेर जाण्यापुर्वीच यांच्या मुसक्या आवळण्या ऐवजी हाप्त्यांची रक्कम दाम-दुप्पट करणे हे "कायदा व सुव्यवस्थेला बाधक" होईल असे सामान्य जनतेला वाटते. यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
भर तू...! सगळे साहेब मॅनेज केलेत |
मा. महोदय कलेक्टर साहेब राहुल द्विवेदी अगदी तरुण तडफदार व्यक्तीमत्व आहे. त्यांनी महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी असे दोन्ही पदभार एकाच वेळी स्विकारले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची चुनूक सगळ्या जिल्ह्याने पाहिली आहे. ते वाळुतस्करी थांबविण्यात देखील पुढाकार घेतील यात शंका नाही. खरे पाहता वाळू गौणखणिज प्रकारात मोडते. त्यामुळे प्रथम कारवाई करण्याचा अधिकार महसुलला आहे. आणि कारवाई करताना पोलीसांनी प्रोटेक्शन देणे असे नियम सांगतो. जर तहसिलदारने वाहन पकडले तर चांगला दंड ठोकून शासनाला महसुल जमा होतो. मात्र, इथे कारवाई न होता महसुल कोणत्या "सरकारी खिशात" जातोय हे नागरिकांना सांगायची गरज नाही. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाला वाळुवर कारवाईचा अधिकार नाही. मात्र, गौणखणिजाची चोरी म्हणून ३७९ कलमान्वये ते गुन्हा दाखल करतात. वेळ पडली ३५३ नुसार धिटाई करतात. आता गुन्ह्यात तितकेच झटे, जितका महसुल दंड करते. त्यामुळे "अर्थ"पुर्ण तडजोड हाच योग्य पर्याय दोन्ही ठिकाणी वापरला जातो. अशा अनेक तक्रारी समाजसेवकांकडून वरिष्ठांकडे नोंदविल्या जात आहेत.
सोन्याहुन महाग दगडाची वाळु |
संगमनेर शहरात सद्या महामार्ग, बस स्थानक अशा अनेक ठिकाणी वाळुविरुद्ध आवाज उठविला आहे. त्यामुळे सद्या वाळुतस्करी बंद असल्याचे बोलले जाते. मात्र, उपरस्ते आणि "रात्रीस खेळ चाले" अशा पद्धतीचा अवलंब केला जात आहे. तर भर दिवसा रिक्षा नदित वाळू काढताना दिसतात. पोलीस अधिकारी नव्याने हजर होताच त्यांनी पहिली सलामी दिल्याने तस्कर अलर्ट झाले असून अजून हा आकडा किती गगणभेदी ठरतो आहे. हेच पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.क्रमश: भाग १
---------------------------------