"उतुंग कामगिरी" करणाऱ्या" नगरच्या २२ पोलीसांचा "स्वातंत्र्यदिनी" सन्मान

दिलीप पवार (LCB, PI)

  अहमदनगर (प्रतिनिधी) :- 
                  पोलीस म्हटलं की नेहमी टिकेचे धनीच असतात. जर लोकांनी टिका केली तरी त्यांच्यापर्यंत पोलीस दलाविषयी चांगल्या माहितीची बाजू गेली नाही. म्हणून ते नावे ठेवतात. असे मुंबई डिआयजी लखमी गौतम, आयपीएस चिन्मय पंडीत, आयपीएस मनिष कलवाणीया, आयपीएस पंकज देशमुख, डिवायएसपी तान्हाजी बर्डे, डिवायएसपी बजरंग बनसोडे, आनंद भोईटे, अभिजित शिवथरे यांच्यासह अनेक खाकीप्रेमी म्हणायचे. पण, आज काळ बदलतोय, जसजसे नवे आयपीएस रुजू होऊ पहात आहे. यामुळे पोलीस दल देखील नव्या जिकरीने काम करु पहात आहे. म्हणून तर एक "फक्त लढ म्हणा" या कौतुकाची थाप म्हणून असल्या प्रशंसनिय सेवेसाठी प्रमाणपत्र किंवा सन्मान चिन्हाच्या सहाय्याने दिली जात आहे. एक छोटसे उदा. सांगायचं ठरले तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी खरे पाहता नगर जिल्ह्यासह औरंगाबाद, पुणे ग्रामीण, बीड, उस्मानाबाद, नाशिक अशा शेजारील जिल्ह्यांच्या देखील गुन्हेगाऱ्या संपविल्या आहेत. दरोडे (३९५) आणि दरोड्याचे प्रयत्न (३९९), गावठी कट्टे आणि खंडणीखोर अशा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आणि आज कोठे दक्षिण नगरसह तीन-चार जिल्हे स्वस्थ झोपू शकत आहे. आशा व्यक्तांचा नक्कीच सन्मान झाला पाहिजे. म्हणून महानिरिक्षकांनी याची दखल घेतली असून दि. १५ आॅगस्ट रोजी २२ जणांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचे पोलीस अधिक्षक ईशु सिंधू साहेब व नगरकरांकडून स्वागत होत आहे.

एसपी ईशु सिंधू साहेब


                पोलीस निरीक्षक दिलीप पवार (एलसीबी), पीएसाआय न्यानेश्वर फडतरे, सोन्याबापू नानेकर, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे यांनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जगदीश चहाळ यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे डिटेक्शन केले. तसेच नेवासा येथील दरोड्याचा गुन्हा ओपन करून त्यात १० लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल व पिस्तूल जप्त केला. तर अगदी अल्पावधीत संगमनेर येथील कापड व्यापारी "प्रकाश कटारीया" यांच्या नातवाचे अपहरण करणाऱ्यांना बेड्या ठोकून बालकाची सुखरूप सुटका केली. या उल्लेखनिय कामगिरीमुळे त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
       तर त्यांच्यासह भिंगारचे पीएसआय मंगेश बेंडकोळी यांनी फसवणुकीचा अगदी क्रिटीकल तपास करुन आरोपी अटक केले आहे. तोफखाना पीएसआय समाधान सोळंके यांनी ३२६ (अ) या गुन्ह्यातील अनोळखी महिलेचा तपास करून तिला अटक केली. राजेंद्र गर्गे यांनी नरेंद्र मोदी यांच्या सभेत गोपनिय म्हणून अगदी चोख कामगिरी पार पाडली होती. राहुरी पीएसआय सतिष शिरसाठ यांनी सलग तीन वर्षे गडचिरोली येथे उल्लेखनिय कामगिरी केली होती, अभिजित अरकल यांनी सायबर शाखेत कार्यरत असताना नागरिकांची आॅनलाईन झालेली फसवणूक उघड करून ९ लाख रुपये पुन्हा रिफंड करून नागरिकांना दिले, अजित घुले यांनी १ हजार १९२ गुन्ह्यांची निर्गती करण्यास मदत केली होती, सोनईचे शेख रऊफ समद यांनी खुनाच्या गुन्ह्याचा तपास केला होता. त्यात आरोपीस म्रुत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती तर पीएसआय रितेश राऊत यांनी श्रीरामपुरमध्ये एका गुन्ह्याची उकल करताना २२ तोळे सोने रिकव्हर केले होते. त्यामुळे काम बोलते असे म्हटले जाते. अशा कर्मयोगी कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा सन्मान होणार आहे.
       तसेच लोकसभा निवडणुकीत योग्य नियोजन करून बंदोबस्त पुरविणे, कर्मचाऱ्यांचे वितरण करणे या कारणास्तव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, कर्मचारी सलाउद्दीन शेख, रवींद्र निमसे यांचा सन्मान केला जाणार आहे. तर प्रशंसनिय सेवेसाठी राखीव पोलीस निरीक्षक दशरथ हटकर, सखाराम मोटे (पीआरओ), रऊफ शेख, सलाउद्दीन शेख, सचिन पवार वसंत वाव्हळ यांना सन्मानचिन्ह देऊन गैरविण्यात येणार आहे.
""""""""""""""""""""""""""""""

स्वातंत्र्य दिनाच्या सर्व वाचकांना मन:पुर्वक शुभेच्छा


    ===================

               --  सागर शिंदे

                 (संपादकीय)

------------------------


         जाहिर आभार
             ----------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  ३१ दिवसात  ६० बातम्यांच्या जोरावर  ३ लाख ७८ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                          आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

           

                        - सागर शिंदे