धन्यवाद..! "मोदीजी" जिवंतपणी मला "अखंड भारत" दाखविला : ३७० च्या निकालानंतर "सुषमा स्वराज" यांनी घेतला "अखेरचा श्वास"...

दिल्ली :-
            भाजपची वाघीन समजल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज याचे नुकतेच निधन झाले आहे. सायंकाळी त्यांच्या ह्रदयात दुखू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ह्रदयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे त्यांनी सायंकाळी ट्विट करून म्हटलय की मोदी व शहा यांचे अभिनंदन की, यांनी ३७० कलमावर योग्य निर्णय घेतला. मी माझे भाग्य समजते की मला हे पाहण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या या ट्विटने अनेकांच्या काळजाला हात घातला आहे. "मी याच दिवसाची वाट पाहत होते". असे म्हणत त्यांनी "वाक्यालाच नाही" तर "आयुष्याला पुर्णविराम" दिला आहे. त्यांच्या जाण्याने एका "वाघीनिची अस्मानि डरकाळी" आज शांत झाली आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी एम्स रुग्णालयात घाव घेतली.

          "सुषमा स्वराज" यांचा जन्म: १४ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला होता. त्या एक भारतीय राजकारणी व सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील होत्या. त्या सध्या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या होत्या. २६ मे २०१४ पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. इंदिरा गांधीनंतर पदावर पद घेणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. त्या संसदेचे सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या .

आता मी येते..! अलविदा...!

         १९७७ मध्ये २५ वर्षांच्या वयात त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या.  त्यांनी १३ ऑक्टोबर १९९८ पासून ३ डिसेंबर १९९८ पर्यंत दिल्लीच्या ५ व्या मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. सन १९९६ आणि सन १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर सन २००९ सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. सन २००० - २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली होती. त्या डिसेंबर २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या. अशी खूप मोठी राजकीय कार्यकिर्द त्यांनी यशस्वी पार पाडली आहे.
             

"कर्तुत्वाच्या उंचीचे माप नाही" 

              सामान्यत: स्रीयांकडे पाहिलं तर आजकाल फारशी परंपरा दिसून येत नाही. पण सुषमा ताईंच्या कपाळावर नेहमी "मोठी लाल" टिकली, भांगामध्ये शोभेल असा सिंदूर, मोठ्या काठा पदराची साडी आणि चेहऱ्यावर खळी पाडून ते स्मित हास्य ही सुषमा ताईंची एक डोळ्यांच्या आडून कधी न पुसणारी छबी. अगदी मनाला भावेल अशी. बीए, एलएलबी झाल्यानंतर त्यांनी वकीली पेशा स्विकारला होता. मात्र, अशा अभ्यासू व्यक्तीमत्वाची देशाला गरज होती.
म्हणून त्यांनी राजकारणात उडी घेतली व त्या १० वर्षे हरियाणा विधानसभेच्या आमदार म्हणून निवडून गेल्या. १९९९ मध्ये कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघातून त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात निवडणुकीत रणसिंग फुंकले तेथे त्यांना अपयश आले. मात्र, २००४ मध्ये जेव्हा सोनिया गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसनं थाट रचला.
तेव्हा ताईंनी प्रचंड विरोध केला. भारत  देशातील सर्वोच्च पदावर जर "परदेशी महिला" बसत असेल तर मी स्वत:ला बोडकं करुन फिरेल. अशी आक्रमक भुमिका त्यांनी मांडली. कारण, दिडशे वर्षे भारताने इंग्रजांची गुलामी केली. आता पुन्हा देशावर कोणतही संकट नको आहे. असे त्यांचे मत असल्याचे बोलले जाते. सुषमा स्वराज यांच्या नावाविषयी अनेकाना माहिती नसेल. मात्र, ते माहित असणे आवश्यक आहे. त्यांनी मिझोरमचे माजी राज्यपाल व वकिल स्वराज कौशल यांच्यासोबत विवाह केला होता.
लग्नानंतर सुषमा स्वराज यांनी अडनाव म्हणून पतीचे नाव "स्वराज" असे लावण्यास सुरुवात केली. "सुषमा आणि स्वराज" असे नाव रुजू पडले. अगदी राधा-कृष्ण जोडीसारखे. एक विशेष नमुद करावेसे वाटते. त्या श्रीकृष्णाला मानत असे. त्यामुळे ताईंनी आपल्या मुलीचे नाव बांसुरी ठेवले आहे. ती आज वकील आहे.
      आज दि.७ आॅगस्ट रोजी त्यांना सायंकाळी ह्रदयाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे दिल्लीला एम्स खासगी रुग्णालयात दाखल करण्याच आले होते. मात्र, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

"सार्वभाैम टिमकडून 
ताईंना भावपुर्ण श्रद्धांजली" 
        
      -- एस. एस शिंदे
  -----------------------------------
         जाहिर आभार
----------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  २१ दिवसात  ४७ बातम्यांच्या जोरावर  ३ लाख ३० हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                              आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

             

            - सागर शिंदे