...अखेर "एमडींचा कमबॅक; "राजिनामा झाला ना"पास"; मनधरणीत "गायकर पाटलांना" यश; "असंतोष" कायम...!


अकोले (प्रतिनिधी) :- 
                  "सुट्टीच्या" कारणाहुन "सुट्टीवर" गेलेले "एमडी" साहेब कारखान्यात पुन्हा "कमबॅक" करणार आहेत. "तडकाफडकी राजिनामा" दिल्याने त्यांची "मनधरणी" करण्यात "गायकर पाटलांना" यश आले आहे. त्यामुळे मान्य "असो किंवा नसो". पण पिचड साहेबांच्या आदेशामुळे पुन्हा "डिसिप्लेन" युक्त कारखान्याचे कामकाज सुरू होणार आहे. अशी माहिती "विश्वसनिय सुत्रांकडून" मिळाली आहे. असे असले तरी कर्मचारी "गुरुवारच्या सुट्टीवर" ठाम आहेत. त्यामुळे हा वाद "सासू-सुनेसारखा" कायम असून दोन्ही गोटात "असंतोषाचे वातावरण" टिकून असल्याचे बोलले जात आहे.
         तीन दिवसांपुर्वी एमडी साहेबांच्या "रागाचा पारा" अंश सेल्सिअसपेक्षा वर गेला आणि त्यांच्या तोंडातून "स्वत:वरच अपशब्दांचा वर्षाव झाला". त्याचे एका माध्यमातून "रेकॉर्ड" तयार झाले आणि त्याच दरम्यान कर्मचारी  व साहेबांमध्ये शाब्दीक चकमक सुरू झाली. केवळ मध्यांतराच्या "चहापान सुट्टीहुन" वाद थेट "राजिनाम्यावर" जाऊन पोहचला. अवघ्या "दोन मिनीटात" कारखान्यात "ऐतिहासिक" निर्णय झाला आणि साहेबांनी दुपारी "राजिनामा" सादर केला.
          साहेबांच्या मतानुसार "शेतकरी" गुरूवारी बाजार करण्यासाठी अकोल्याला आला की, त्याचे काम कारखान्यात येऊनही होत नाही. त्यांचा "नहाक चक्कर" होतो. म्हणून "गुरुवारची सुट्टी" रद्द करून "रविवार" ठेवावी. एक अर्थी त्यांचे बरोबरही असेल. पण, आजवर अनेक शेतकऱ्यांना "कारखान्याला गुरूवारची सुट्टी" असते हे जवळपास माहितच झाले आहे. त्यामुळे जसे मुलांना माहित असते, रविवारी शाळेला सुट्टी आहे. त्यामुळे, ते "हकनाक" चकरा मारायला जात नाही. आणि गेलाच तर हे त्याचे वेगळेच "हितसंबंध" जोपासायला जातात असेच का समजू नये. !
      अर्थात यात कोणी आपले "हितसंबंध जोपासत नसेल". पण, "एक हजार" कर्मचाऱ्यांना देखील काही अडचणी असतील. याचाही विचार करायला हवा. ज्या नव्या कर्मचाऱ्यांवर वरदहस्त आहे. त्यांची "चाटूगीरी" वगळता. सामान्य कर्मचाऱ्यांच्या समस्याही आपण लक्षात घेतल्या पाहिजे. नाहीतर "वशील्याचे तट्टू" संभाळताना, "निष्ठावंत" दूर जाणार नाही. हे "राजुरच्या साहेबांनी" लक्ष घालून समजून घेतले पाहिजे.
        अर्थात कारखान्यात काय चालु आहे. कोणाचे "राजकिय हितसंबंध" जोपासले जातात, कोणाला "ठेके" दिले जातात, कारखान्याचा "मॅनपावर" अतिरिक्त कोठे वापरला जातो, तेथील "प्रकल्पांची उलथापालथ" या सर्व गोष्टींची "मालिका" काही काळात उघड होईलच.  मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेख चांगला नसतो, असे अध्यात्म सांगते. असो...

गुरुवार..!!!...रविवार..!!!

           कर्मचारी युनियन "गुरुवारच्या सुट्टीवर ठाम" आहे. तर  प्रशासन रविवारच्या. त्यामुळे यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे वाटते. गायकर पाटलांच्या कोर्टात या प्रश्नावर युक्तीवाद झाला तर नक्कीत दोघांना न्याय मिळेल. "गुरुवार व रविवार" वगळता सुट्टीचा मध्य काढला तरी शेतकरी, एमडी व कर्मचारी या तिघांच्या प्रश्नावर तोडगा निघेल असे आम जनतेला वाटते. मात्र, "हुकुमशाही" पद्धतीने सुट्टी लादने हे येणाऱ्या "विधानसभा" निवडणुकीवर परिणाम  करू शकते. या "सुप्त आणि गुप्त" लाटेची काळजी साहेबांना घ्यावी लागणार आहे.

(आजवाचा :-  सर्वेच्च न्यायालयाचे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव  सर यांचा ३७० व ३५ अ वरील अभ्यासपुर्ण लेख)

 -----------------------------

     -- सागर शिंदे  

 -----------------------------------
         जाहिर आभार
----------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  २० दिवसात  ४६ बातम्यांच्या जोरावर  ३ लाख २५ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                              आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

             

            - सागर शिंदे