"काँग्रस-राष्ट्रवादीची माजोरी आणि मुजोरी जनतेने पाहिली..!"
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
विरोधी पक्षांनी कितीही यात्रा काढल्या तरी १५ वर्षात सत्तेत असताना यांची माजोरी आणि मुजोरी जनतेनी अनुभवली आहे. यांनी कधीच जनतेत जायचे पसंत केले नाही. त्यामुळे मतदारांनी त्यांना खाली खेचले आहे.
विरोधांंच्या माजोरी आणि मुजोरीमुळे यांच्या यात्रेला कोणी जात नाही, त्यांना कार्यकर्ते देखील जमवता येत नाही. आणि येणाऱ्या काळात यांच्याकडे मतदार झुकनार नाही. हे आज दिसते आहे आणि पुढेही दिसत राहिल. विरोधी निवडणुकीत हारल्यानंतर "इव्हीएमला" दोष देतात. मात्र, वास्तविक पाहता २००४ ते २०१४ पर्यंत ईव्हीएमवर निवडणुका होत आहे. आता मोदी साहेब व भाजपा जिंकत असल्याने विनाकारण ईव्हीएमला दोष देत आहेत.
बारमतीवाले जिंकले तर इव्हीएम चांगले आणि मोदीजी जिंकले भाजपा जिंकली तर इव्हीएम खराब हीच निती विरोधकांची झाली आहे. विरोधकांची परिस्थिती एखाद्या बुद्धु मुलासारखी झाली आहे, अभ्यास न करता परीक्षेत पेपर लिहायचा नाही आणि नापास झाल्यानंतर वडिलांनी रागावल्यावर पेपर लिहिणाऱ्या पेन ला दोष द्यायचे. अर्थात जनतेत जायचे नाही नाही आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही. निवडणुका हरल्या की इव्हीएमला दोष द्यायचा. हा कोणता शहाणपणा म्हणायचा.
विरोधकांना ईव्हीएम हारवत नाही हारवतो तो मतदार राजा. गेली १५ वर्ष ज्या मतदारांना त्रास दिला त्याची माफी मागा. कमीत कमी माफी मागितल्यावर दोन चार तरी जागा निवडून येतील. अशी टिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
यावेळी पालकमंत्री राम शिंदे, डॉ. सुजय विखे, मा.आ.वैभव पिचड, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिकाताई राजळे, आ. शिवाजी कर्डीले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.====================