"डॉ. लहामटेंचा भगव्या "मफरीने घात केला ! "राष्ट्रवादीने आजवर नाकारला प्रवेश व तिकीट !!!
मफलर गळ्याभोवती आली !! |
मा. आ. वैभव पिचड यांनी राजिनामा देऊन भाजपचे कमळ हाती घेतले आणि भाजपकडून आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या अशोक भांगरे, सौ. सुनिता भांगरे व डॉ. किरण लहामटे यांची कोंडी झाली. अगदी "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" झाल्यासारखे. त्यामुळे वाट मिळेल तिकडे पळापळ सुरू झाली आणि त्यात डॉ. किरण लहामटे यांच्या भगव्या "मफलरीची" चर्चा काही औरच झाली. लहामटे नक्की भाजपचे पक्षनिष्ठ की, भगवी पताका गळ्यात टांगून मिरवणारे हिंदुत्ववादी..! वेळ पडली तर शिवबंधनात अडकणारे भावी शिवसैनिक की शाब्दीक राष्ट्रवादी..! असे काहीच कळायला तयार नाही. त्यामुळे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देखील आवाक झाले. जे उमेदवार राष्ट्रवादीचे तिकीट मागायला "भगवी मफलर" घालून येतात. त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा की जे "गळ्यात भगवं" घालतात ते शेवटपर्यंत "हातात घड्याळ" ठेवतील ! त्यामुळे अद्याप डॉ. किरण लहामटे यांना "ना राष्ट्रवादीत प्रवेश मिळाला ना उमेदवारी" मिळाली. अजूनही "भिजत घोंगडं पडलं" आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या भगव्या मफलरीने घात केल्याची मिश्किन टिका त्यांच्यावर होताना दिसत आहे.
भगवी कापडं, हाती घड्याळ ! डोहाळे विधानसभेचे |
भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाचा टेंभा मिरवून जाती-धर्माला खतपाणी घालत आहे. असे म्हणणारे भले-भले काँग्रेस व राष्ट्रवादीवाले "ईडी" आदारकी आणि मंत्रीपदासाठी भाजपवासी झाले. तर, हिंदुत्व, भगवा शिवबंधन, आरएसएसप्रती एकनिष्ठ असे काही नेते तिकीटासाठी राष्ट्रवादीत आले. त्यातले एक "बंडखोर व्यक्तीमत्व" डॉ. किरण लहामटे होय. वास्तव पाहता लहामटे यांना "एकनिष्ठतेचे पहिले प्रमाणपत्र" जर कोणी दिले असेल तर ते झेडपीत असणाऱ्या काही भाजप सदस्यांनीच. याचे कारण म्हणजे, जेव्हा पिचड भाजपात डेरेदाखल झाले तेव्हा भाजपकडून उमेदवारीच्या रेसमध्ये असणारे डॉ. किरण लहामटे प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यानंतर त्यांनी नामदार विखे साहेबांना भेटून आपली कैफियत मांडली. पण, उमेदवारी वैभव पिचड यांना फायनल झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. त्यानंतर लहामटे यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी सर्वात प्रथम आपल्या बॅनरहुन कमळ हद्दपार केले व निष्पक्ष बोर्ड कार्यालयावर लावला.
"भगवे राष्ट्ररवादी" आज विरोधी ! |
आता कालप्रमाणे डॉक्टरांच्या अंगात भगवा कुर्ता नव्हता. होते ते फक्त "पांढरे कपडे". पण, या सगळ्यात मिसमॅच उठून दिसत होती ती "गळ्याभोवती गुंफलेली भगवी मफलर". दोघांनी समोरासमोर एकमेकांना नमस्कार केला. तोच दादांनी खालवर नजर नेत "भगव्या वस्त्रावर" नजर स्थिरावली. निश:ब्द होत त्यांच्याही मनात प्रश्न पडला असेल. काय देते ही "शिवसेना किंवा बीजेपी" त्यांच्या नेत्यांना. जे "काहीच न देता घेता" आपला "स्वाभाव आणि स्वाभिमान" गहान ठेवत नाहीत. आणि आमच्याकडे सगळं देऊन आमची "निष्ठा व स्वाभिमान गहान" राहतो. सगळ्या गोष्टी अनाकलनिय आहे. असेच काहीसे पुटपुटत ते खाली बसले. तब्बल दोन तास चर्चा झाली. पण ना प्रवेश ना तिकीट. डॉ. लहामटे त्यांना "जीव तोडून" सांगत होते. "माझा "शब्द हाच प्रमाण" आहे". आपण उमेदवारी दिली तर दुसरी कोणाचीही उमेदवारी मी करणार नाही. पण, पवार घराणे अकोल्याबाबत दुधाने पोळाले होते. त्यामुळे ते येथील ताक देखील फुंकूनच पिणार यात काही शंका नाही.
खरा राष्ट्रवादी साज ! |
अर्थात त्यानंतरही डॉ. लहामटे व पवार कुटुंबाशी चर्चा झाली. पण गळ्यातली "मफलर" निघाली नाही. म्हणून तर त्यांचा ना प्रवेश होऊ शकलाय ना उमेदवारी डिकलेर झाली. अखेर आजवर त्याचा मफलरीनेच घात केल्याचे बोलले जात आहे. अर्थात कोणाच्याही मनात काहीही असले तरी ते राष्ट्रवादीकडून उमदवारी लढवतील असे निष्ठावंत राष्ट्रवादीच्या तरुण वर्गाला वाटते आहे. मात्र, शिवसेना व भाजप युतीचा काय निर्णय होतो. यावर आमदारकीचे सर्व गणित अवलंबून आहे.=====================
-- सागर शिंदे
=====================
Latest Marathi Newsजाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने ३९ दिवसात ७९ बातम्यांच्या जोरावर ४ लाख ४५ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------