"अकोल्यात शिवसेना म्हणजे, एकात एक नाही बापात लेक नाही" पिचडांची "रसद" कोणाला !
अकोेेले (प्रतिनिधी) :-
"शिवसेना" म्हणजे काय ! हे जर "मुंबई" नंतर कोठे अनुभवयास मिळत असेल तर ते बेशक "अकोले मतदारसंघात" हे "त्रिवार सत्य" आहे. कारण; गेली ३० वर्षे प्रस्तापित पिचडांना "अविरत फाईट" देणारा "जन्मजात शिवसैनिक" येथे "सह्याद्रीसारखा" पाय रोखूून उभा आहे. येथे "विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव" आहे. त्यामुळे "दुर्दैव भगव्याचे" की; त्यांना "सच्चा शिवसैनिक उमेदवार" लाभला नाही. इतकेच काय ! तर शिवसेनेत राहुन भगव्याच्या नावाखाली "भडवेगिरी" करणाऱ्यांनी "वैयक्तीक स्वार्थापोटी" पक्षाचे निशान गहान ठेऊन "मी नाही त्यातली, अन् कडी लाव आतली" असली डोळेझाक भुमिका जनतेपुढे मांडली. वास्तव पाहता जर "राजूरच्या बंगल्याहुन" येणाऱ्या "रसदीला" कोणी "लाचार" झाले नसते तर बेशक आज अकोल्याच्या "कडे-कपारीत आणि डोंगराच्या दरी - खोरीत भगवा फडकला असता". हे आमचे वैयक्तीक मत नाही तर, "सामान्य जनतेसह राजकीय विश्लेषकांना" वाटते आहे. मात्र, आता ती वेळ गेली असून भगवा "गटा-तटात" विभागल्याचे दिसते आहे. त्यामुळे सद्यातरी "एकात एक नाही, अन् बापात लेक नाही" अशी परिस्थितीला शिवसेनेची झाली आहे. हे "जाणकारांच्या तोंडचे उद्गार" आहे.
अरे काय चाललय तिकडे अकोल्यात !! |
खरे पाहता अकोल्यात आज "राष्ट्रवादीला" डॉ. किरण लहामटे, "भाजपला" वैभव पिचड, "रिपाईला" विजय वाकचौरे तसे "शिवसेनेला" मच्छिंद्र धुमाळ वगळता जुना बडा चेहरा नाही. जसे "काँग्रसला" चेहरा नाही, तर मतेही नाही. हे गत निवडणुकीत सतिश भांगरे यांच्या मतांच्या अकडेवारीहुन नव्याने सांगायला नको. पण, तसे शिवसेनेचे नाही. शिवसेनेच्या काही छोट्या-मोठ्या नेत्यांवर पिचड साहेबांचाच "वरदहस्त" आहे. "चुल एकच, फक्त ताटं वेगळी" अशी नौटंकी. स्टेजवर "आरोप-प्रत्यारोप" आणि अंतर्गत "रसदीचा कारखाना" फुल चालतो. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा आहे. हे महत्वाचे नाही. तर कोण पक्षाशी किती "प्रामाणिक" आहे. हे महत्वाचे वाटते. नाहीतर अकोल्यात "रासने कॉम्प्लॅक्स" पासून तर कचेरीपर्यंतचे मोर्चे आपण पाहिले नाहीत का. जशी वंचित भाजपची बी टीम म्हणतात, तसे अकोल्यात पिचड साहेबांच्या "ए, बी, सी, डी ते झेड" पर्यंतच्या टिमा आहेत. फक्त कोणी "प्रत्यक्ष सहभागी असते तर कोणी अप्रत्यक्ष". इतकाच परक आहे.
कमळाला बळ फितुर वाघांचे ..! |
बै...."ठग" |
काल अकोले तालुक्यात "विधानसभा मतदार संघ" याबाबत "दोन सभा" पार पडल्या. एम. धुमाळ, सतिष भांगरे यांच्या सहकार्याने मिलींद मंडाळकर (वि.स.संपर्क प्रमुख) व रावसाहेब खेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत. तर दुसरीकडे महेश नवले, लालुशेठ दळवी, बाजिराव दराडे, मारुती मेंगाळ, माधव तिटमे वैगरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. विषय एकच होता. "अकोले विधानसभा" ही गेली "३० वर्षे" शिवसेना लढवत आली आहे. त्यामुळे "ही जागा भाजपला न देता; सेनेकडे कायम ठेवावी". अर्थात या एकाच मागणीसाठी एकाच वेळी दोन बैठका. ! हे कितपत योग्य वाटते ? आणि इतक्या बड्या आणि जाणकार नेत्यांना आपण कसे सांगावे की ही "ग्रामपंचायत सदस्याची" निवडणुक नाही. त्यामुळे हा सगळा "सावळा गोंधळ" होणार आहे. जर युती नाही झाली तर "मातोश्री" कोणत्या गटाचा उमेदवार देईल आणि कोण कोणाचा प्रचार करेल ! ही सगळी "भेसळ" निर्माण झाली आहे. "देव न करो" ! जसे एकेकाळी अकोले "कम्युनिष्ठांचा बालेकिल्ला" होता. आज तो "भुईसपाट" झाला. तसे शिवसेनचे व्हायला नको. अर्थात या सर्व परिस्थिकडे पाहुन नक्की वाटते, "एकात एक नाही, आणि बापात लेक नाही". या म्हणीची प्रचिती येथे दिसू लागली आहे. अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागल्या आहेत. मात्र, सद्या वातावरण कितीही अस्थिर झाले तरी युतीचे काय होेते. यावर सर्व अवलंबून आहे.
क्रमश:
=======================
"आनंदाची बातमी"
आता सार्वभौम पार्टलच्या बातम्या गुगलच्या वेगवेगळ्या पेजवर दिसू लागल्या आहेत. visit म्हणून त्यांनी आपले पोर्टल सजेस्ट केले आहे. अवघ्या ४० दिवसात. हे स्वप्न पुर्णत्वाकेड चालले आहे. गुगल नियमानुसार अशा बातम्या दिसण्यासाठी १ ते दिड वर्षाचा कालावधी लागतो. तो आपण अवध्या ४० दिवसात शक्य केला आहे. सर्व वाचकांचे मनस्वी धन्यवाद..!
=====================
-- सागर शिंदे
=====================
जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने ४० दिवसात ७५ बातम्यांच्या जोरावर ४ लाख ६५ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------