पहिले "लिखकर" बिक जाते थे "आखबार", अब "बीक कर" लिख जाते है "आखबार".!
अहमदनगर :-
"ज्याला आवाज नाही, अशा व्यक्तींचा आवाज" झाल्याबद्दल आदरणीय "रवीश कुमार" यांना "रेमन मैगसेसे" हा 'पुरस्कार' जाहिर झाला होता. तेव्हा ते म्हणाले होते, जेव्हा तुम्ही लोकांचा आवाज व्हाल तेव्हा तुम्ही खरे "पत्रकार". अशी साधी आणि सरळ 'व्याख्या' त्यांच्या पत्रात करण्यात आली होती. त्यामुळे "स्वत:ला पत्रकार" म्हणून घेणाऱ्यांनी आपण पत्रकार म्हणण्याच्या "लायक" आहोत की नाही. याचे उत्तर "स्वत:च्या मनाला" द्यावे. अन्यथा आपण "चाैथा आधारस्तभ" होऊनच "लोकशाहीचा गळा घोटला" हेच आरोप आपल्यावर होत आले आहेत आणि होतील. आजकाल लोकांचा आवाज होण्याऐवजी, त्यांचा आवाज दाबण्याची भुमिका आपण चोखपणे पार पाडतो आहे. बाकी, 'कमर्शीयलपणा', 'नेते व मालकांची हुजरेगिरी" आणि "निव्वळ बक्कळ पैसा" कमविण्यासाठी उभारलेली यंत्रणा म्हणजे 'पत्रकारीता' अशीच व्याख्या रुजू झाली आहे. त्यामुळे, या "बरबटलेल्या व्यवस्थेत" कुमारांच्या प्रेरणेने 'नव्या पिढीतील कुमार' पत्रकारीतेत जन्म घेतील हीच आपेक्षा. मीडियाला "विकत घेणे" आणि त्याचे "हात कलम" करणे हे ज्या सरकारला जमले त्याच विपक्ष परिस्थितीत कुमारांनी पत्ररकार हा पिंड जिवंत ठेवला. पण, आजकाल प्रखर वास्तव सांगायचे झाले. तर, पुर्वी लिहील्यानंतर विकले जायचे वृत्तपत्र आणि आता विकल्यानंतर लिहीले जातात वृत्तपत्र इतका फरक निर्माण झाला आहे.
काल रवीश कुमारांचा लेख वाचला आणि "निर्भिड पत्रकारितेची आठवण" झाली. पण, आज "अन्यायी" व्यवस्थेपुढे झुकलं नाही, "लाचारी पत्करली" नाही तर फक्त 'हातच' नाही, तर सगळं "आयुष्यच कलम" केले जाते. हा पहिला धडा अनेक यशस्वी होऊ पाहणाऱ्या पत्रकारांना पत्रकारीतेने दिला आहे. कधी "निखील वागळे" तर कधी "रवीश कुमार" किंवा "रजत शर्मा" होण्याच्या आतच लिहीणारे हात गौरी लंकेश सारखे "कलम" केले जातात. किंवा गुंतवले जातात. हे वैयक्तीक कोणाचे उदाहरण नाही. तर, हा पत्रकारीतेतील अंतर्गत राजकारणाचा भाग आहे. आणि तो सदैव पुढे चालत राहणार आहे. पण, त्यावर कोणी आवाज उठविणार नाही. कारण, पत्रकार लोकांच्या हजारो प्रश्नांवर आवाज उठवतो. मात्र, स्वत:वर झालेल्या किंवा होणाऱ्या अन्यायाला तो निमुटपणे सहन करत असतो. अर्थात "मित्र एक, आणि शत्रू अनेक". त्यामुळे, नाही होत शक्य. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लढाई करणे. अखेर "बुळग्या" पत्रकारीतेची सवय अंगवळणी पडून जाते आणि लढा सुरू होतो. फक्त "रोजच्या पगारासाठीचा". पण, याच्याही पलिकडे ज्याच्यात धमक असतेना..! प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लढाई करण्याची. तो होतो रवीश कुमार. विनर आॅफ मैगसेसे..
डॉ. आंबेडकरानी "मुकनायक" व्रुत्तपत्र सुरू केले होते. त्याचा अर्थ होता, मुक्या जनतेचे प्रतिनिधीत्व करणारा "नायक". याच वाक्याला अनुसरून कुमार यांना पुरस्कार जाहिर केला आहे. कारण, त्यांची "प्राईम टाईम" ही मालिका "जनतेचा आवाज" झाली होती. असे निवड समिती म्हणते. अगदी खेडेगावातून आलेले व्यक्तीमत्व मैगसेसे पर्यंत जाते. आणि ते ही आजच्या काळात. हे खरोखर अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. दुर्दैव असे की, भारतात रजत शर्मा, अर्बन गोस्वामी, प्रभू चावला, राजदिप सरदेसाई, शेखर गुप्ता, विर सांघवी, करण थापर, अंजना काश्यप यांच्यासारखी मातब्बर पत्रकार या मातीत असताना त्यांची नावे देशाबाहेर पुरस्कारासाठी वेळीच गेली नाहीत. केवळ आणि केवळ एकमेकांच्या "कुरघोडी आणि खेकडा" व्रुत्तीमुळे. म्हणून इथे जन्मा येणाऱ्या अनेक झुंजार कुमारांचे हात इथल्या "घानेरड्या कटकारस्तनाने" "कलम" केले आहे. असे ज्येष्ठ पत्रकारांना मनस्वी वाटते.
ज्याला आपण "लोकशाहीचा चौथा" स्तभ म्हणतो, त्याचा "कणा ढिसूळ" होऊ लागला आहे. कारण, आज युवा पिढी प्रिंट मीडियाकडे न वळता Online चॅनल, पोर्टल, व फेसबुक, व्हाट्सअॅप यांचा वापर करून लिखानाचे स्वातंत्र्य उपभोगत आहे. त्यामुळे, प्रिंट व इलेक्ट्राॅनिक माध्यमांची गुलामी कोणीही करायला तयार नाही. जाहिरातीसाठी आटापिटा करणे म्हणजे आजची पत्रकारीता झाली आहे. त्यामुळे आजच्या काळानंतर "रवीश कुमार" पुन्हा होणे नाही. पत्रकारांच्या अनेक संघटना पाहिल्या. "एकात एक नाही, अन बापात लेक नाही". अशीच गत झाली आहे. पण, वर्षानुवर्षे "पत्रकार हल्ला विरोधी कायदा", "पत्रकार पेन्शन", "निवारा", अशा अनेक मुद्दयांसाठी रोज झगडावे लागले आहे. मालकीहक्क असलेल्या व्यक्तीला आणि प्रस्तापित संपादकांनाही संरक्षणाची गरज वाटत नाही. महत्वाचे वाटते ते फक्त मैदानात काम करणाऱ्या प्रतिनिधींना. त्यामुळे, एखादी समस्या अंगलट आली की "तो आमचा कोणी नाही". हीच भुमिका संपादकीय व्यवस्थापनाची असते. तेव्हा खरा "पत्रकार लावारीस" होतो. खरे पाहिले. तर, मानसाचा जेव्हा चलता काळ असतो, तेव्हा हजारो हात मदतीची मागणी करतात. पण, पडत्या काळात आपलेच परके होऊन जातात. हिच रित आहे पत्रकरीतेची. त्यामुळे, आता पत्रकारीती फार अपंग झाली आहे. तिला नव्या पिढीतील तरुणांनी जिवंत करणे गरजेचे झाले आहे.
आजकाल पत्रकार आहे असे म्हणायची देखील लाज वाटू लागली आहे. कारण, आता पत्रकार म्हटलं तरी लोक दलाल किंवा ब्लॅकमिलर म्हणून सहज नजर फिरवू लागले आहेत. ज्याला दोन शब्द लिहीण्याची अक्कल नाही. असे पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून मिरवतात. ज्याला बातमीचा अंग नाही.! असे प्रतिनिधी कम तडजोडीचे बादशाह होऊन गडगंज धनसंपदा जमा करुन बसले आहेत. आजही साधा, सामान्य व प्रमाणिक निष्पक्ष पत्रकार दुचाकीवर आणि निवाऱ्यास पुरक घरात राहतो. पण, पत्रकारीतेच्या नावाखाली दलाली आणि लुटमार करणाऱ्यांकडे पहा, गाड्यांवर नाव प्रेस आणि हे महाशय वाळू तस्करांच्या बैठकीला. कोणी प्रशासनाशी सलगी करतय तर कोणी महसुल सोबत. कोणी स्वत: अवैध धंदे करतय तर कोणी पत्रकारीतेच्या आडून पार्टनरशिप.! त्यामुळे, मालक लोकं जाहिरात आणि राजकारणातून मलिदा जमा करतात. तर, प्रतिनिधी किंवा तोतया पत्रकार पत्रकारीतेच्या नावाखाली धनबलाढ्य झाल्याचे पहायला मिळत आहे. आता दुर्दैव या पत्रकारीतेचे. की, जेव्हा एखाद्या पत्रकारावर संकटाची वेळ येते. तेव्हा येथे धावून कोणी यायचे.? हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. जेव्हा पत्रकार म्हणून एखादा व्यक्ती त्याचा पींड पार पाडत असतो. तेव्हा त्याने आजवर केलेल्या पत्रकारीतेची कसोटी लागलेली असते. त्यामुळे, वेळ आली की अनेकजण कुत्रे देखील वाघाची शिकार करु पाहतात. मग, त्याच्या पडत्या काळात राजकारणी व त्याचे सोबतीच कमजोर बाजू घेऊन विरोधात उतरु लागतात. अखेर केल जनतेला न्याय देणारा स्वत: न्यायासाठी याचना करु पाहतो. तेव्हा पेपर, मालक, सहकारी किंवा संघटना त्याला कधीच साथ देत नाहीत. म्हणून जसा एकटा जन्माला आला, तसा एकट्याला लढायचे धैर्य ज्याच्या अंगी आहे. त्यानेच या क्षेत्रात उतरण्याचे धाडस करावे. अन्यथा, किडा-मुंगी होऊन मेलेले कधीही चांगले. एक पत्रकार म्हणून संघटना निवेदन देऊ शकतात. पण, उध्वस्त झालेल्या पत्रकाराच्या कुटुंबाला पत्रकारीता कधीही उभे करू शकत नाही. हेच प्रखर वास्तव आहे. त्यामुळे, येणारा काळ अधिकाधिक भयानक होणार आहे. पुर्वीप्रमाणे मुघल सल्तनत सारखे सत्तेसाठी भाऊ भावाचा आणि मित्र-मित्राचा जीव घेऊन गाद्या हस्तगत करीत असे. तसे केवळ आपली पत्रकारीता टिकावी किंवा आपणली बढती व्हावी यासाठी या क्षेत्रातील अंतर्गत युद्ध प्रचंड भयानक होणार आहे. त्यामुळे, लोकशाहीचा चौथा स्तंभ वाचविणे किंवा समाजसेवेचे व्रत हाती घेण्यासाठी कोणी नवोदित व्यक्ती यात येऊ पाहत असेल. तर, त्यांनी ही लत लवून न घेतलेलीत बरी आणि जर इच्छा असेल. तर, खरोखर या बरबटलेल्या व्यवस्थेला सुधरायचे असेल. तर, या क्षेत्रात निर्भिड व निष्पक्ष व्यक्तींची प्रचंड गरज आहे. जिवन उध्वस्त करायचे आहे. या अजेंड्याखाली प्रवेश करा आणि लागा कामाला....
- सागर शिंदे