"गुरूवार ऐवजी रविवारीच सुट्टी"; नाहीतर हा "घ्या राजिनामा" चालवा तुम्हीच "कारखाना"; "एमडी" व युनियनचे "वाक्- युद्ध"


अकोले (प्रतिनिधी) :- 
                 "गुरूवार" ऐवजी "रविवारी"  "साप्ताहीक सुट्टी" सुरू करावी. या सुट्टी बदलाच्या करणास्तव "अगस्ति साखर कारखाना" व "कामगार युनियन" यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याचा प्रकार काल (दि.३) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला. त्यामुळे संतापलेल्या "एमडी साहेबांनी" आपल्या निर्णयावर ठाम राहत. "पदाचा राजिनामा" देण्याची "धमकीवजा वाच्चत" केली. मात्र, त्यांनी तडकाफडकी राजिनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. हा प्रकार मा. गायकर साहेबांच्या समोर झाला. परंतु, हा प्रश्न त्यांनी संयमाने घेतला. यावर स्वत: पिचड साहेब तोडगा काढतील असे चिन्ह निर्माण झाले.  त्यामुळे तुरतास कर्मचाऱ्यांमध्ये शांतता पसरली तरी "सुट्टी विषयीचा असंतोष" कायम असल्याचे दिसून आले.

             अगस्ति साखर कारखान्याची सद्या चांगलीच छपाई सुरू आहे. मागील वर्षात कारखान्याची गाळप क्षमता वाढविली. येथे वेगवेगळे प्रकल्प उभे रहात आहे. त्यातील "इथेनाॅल प्रोजेक्ट" हा महत्वपुर्ण ठरला असून "रोपवाटीका", "माती - पाणी परिक्षण", "खत निर्मिती प्रकल्प", असे अनेक उपक्रम सुरू आहेत. आता सर्वपक्षीय सत्ता असल्यामुळे सर्व "मिलबाटके" एकमताने साखर कारखाना सुरू आहे. यात कोणाला काही अडचण नाही. कारण, तेव्हढीच एक "एमआयडीसी" का म्हणा, पण सामान्य मानसाला रोजगाराचे साधन आहे. परंतु तेथे कामगारांचा आवाज दाबायचा प्रकार होत असेल तरी आम जनतेेने गप्प बसावे असे का वाटावे ? आणि वाटतही असेल, तर तो मनमानी कारभार करणाऱ्या संचालक मंडळाचा किंवा प्रशासकीय यंत्रणेचा गोड गैरसमज आहे.
         अर्थात सद्या कर्मचाऱ्यांची गुरूवारी सुट्टी असते. या दिवशी अकोल्याचा बाजर असतो. नेते - पुढाऱ्यांच्या घरी जशी घरकामाला महिला शेतात गडी असतो तसे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना घरची शेती पाहुन गुरूवारी बाजारहाट करावा लागतो. त्यामुळे  गुरूवारची सुट्टी योग्य वाटते. इतकेच काय, तर आठवडे बाजारामुळे टायरगाड्यांनी अनेकांना उडवून दिले आहे. अनेकजण जखमी झाले आहेत, छोट्यामोठ्या वाहनांचे नुकसान झाले आहे. गर्दी त्यामुळे गुरूवारी कारखान्याला सुट्टी असल्यास अनेक प्रश्न सुटतात. रविवारची सुट्टी असेल तर बँकेची कोणतीही कामे करायला जमत नाही. कारण त्या दिवशी सुट्टीच असते. तर मुलांचे अॅडमिशन आणि अन्य गोष्टी करायच्या असेल तर गुरूवारी सरकारी यंत्रणा चालु असते. त्यामुळे हा अट्टाहास आहे. मात्र, का कुणास ठाऊक येथे कर्मचाऱ्यांचा विचार व्हायलाच तयार नाही. "हम करे, सो कायदा"..., का ? तर नात्या गोत्याच्या राजकारणामुळे कोण कोणाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाही. त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? असेच वातावरण कारखान्यात निर्माण झाले आहे.
          जर आज कारखाना इतके सर्व प्रोजेक्ट उभे करीत आहे. ते कोणाच्या जीवावर आहे ? अमेरीका, जपान, रशिया या प्रगतशिल देशात कर्मचाऱ्यांना मालक समजले जाते. मात्र, आपल्याकडे अजूनही गुलामीची प्रथा रुजू ठेवली आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाला वाटेल अशी सुट्टी न लादता. कर्मचाऱ्यांना हवी तीच सुट्टी दिली पाहिजे. असा सुर कर्मचारी वर्ग व जनतेकडून येत आहे. असे न झाल्यास कामगार युनियन नक्कीच योग्यते पाऊल उचलेल अशी प्रतिक्रिया कामगारांकडून येत आहे.
        दरम्यान एमडी साहेबांनी तडकाफडकी राजिनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र, तो अद्याप मंजुर झालेला नाही. पिचड साहेब या प्रकारात मध्यस्ती करून कामगार व एमडी यांच्यात सलोखा घडवून आणतील असे वाटते. उद्याच्या निवडणुका पाहता साहेबांना कर्मचाऱ्यांचा रोष ओढून घेणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे  यात समन्वयाची भुमिका नक्कीच पार पाडली जाईल असे बोलले जाते.

            -- सागर शिंदे  

 -----------------------------------
         जाहिर आभार
------------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  १८ दिवसात ४४ बातम्यांच्या जोरावर  ३ लाख १५ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे. नकळत निर्भिड पणातून कोणाचे मन दुखविले तर क्षमा असावी.  
                          ---धन्यवाद ---
                              आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

             

            - सागर शिंदे