"भंडारदरा" धरण "४२ वर्षात" ११ वेळा "अपुर्ण" राहिले तर "३१ वेळा तुडूंब" भरले. वाचा "स्पेशल स्टोरी"...
-- सागर शिंदे
भंडारदरा (प्रतिनिधी) :-अकोले, संगमनेर व "मराठवाड्यासह एक कोटी" लोकांची तहान भूक भागविणारा "भंडारदरा धरण" आज (दि.३) तुडूंब भरले. त्यामुळे वर्षभर लाखो शेतकऱ्यांची चिंता स्थिरावली आहे. या धरणातील "आवक- जावक" १५ आॅगस्टच्या आसपास सुरू होते. यापुर्वी "१९६७ ते २०१९" या "४२ वर्षाच्या काळात" भंडारदरा धरण "कधी भरले" व कधी भरले नाही, याचा स्पेशल रिपोर्ट "सार्वभाैम"च्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
आज "भंडारदरा धरण" तांत्रिकद्रुष्ट्या भरल्याचे प्रशासनाने जाहिर केले आहे. पाण्याची आवक लक्षात घेता १५ आॅगस्टपर्यंत हा साठा "१० हजार ५००" दसलक्ष घनफुट मेंन्टेन ठेवला जातो. जसे "रतनवाडी, घाटघर, साम्रद, जायनेवाडी, बिताका, मुतखेल, बारी, वाकी" अशा पर्जन्यछायेच्या भागातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याची "आवक" लक्षात घेता "जावक" निच्छित केली जाते. तसे "१५ ते ३१ आॅगस्टपर्यंत ११.३९ टिएमसी" भडारदरा धरण फुल करण्याचे धाेरण शासनाचे आहे. सद्या धरणातून वीजनिर्मिती द्वारे ८२५ क्यूसेक, तसेच स्पिलवे द्वारे ३६०० क्यूसेक असे एकूण ४४२५ क्यूसेक ने धरणातून विसर्ग सोडण्यात आल्याचे किरण देशमुख (अभियंता) यांनी प्रसिद्ध केले आहे.
एरव्ही भंडारदरा धरण १५ आॅगस्ट रोजी भरते असे अंदाजे निर्धारीत झाले आहे. ही तारीख ओलांडत नाही तोवर प्रत्येकाला धरणाची सांड निघेल अशी आशा असते. त्यानंतर मात्र, सगळ्यांना चिंता असते. आजवर ४२ वर्षाच्या काळात भंडारदरा एकून ११ वेळा भरलेला नाही. दि. २ आॅगस्ट १९६९ ते ७० पर्यंत धरण याच महिन्यात फुल भरले. मात्र, सलग तीन वर्षे म्हणजे १९७२ पर्यंत पावसाने बळीराजाकडे दुर्लक्ष केले. परिणामी उभ्या महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागला. यावेळी फक्त ७५ टक्के सरासरी धरण भरले होते. १९७३ ला धरण भरले परंतु ७४ ला पुन्हा दुष्काळमय परिस्थिती अकोलेकरांनी अनुभविली. त्यानंतर मात्र, सलग १० वर्षे म्हणजे १९८४ पर्यंत धरण क्षेत्रात पाणलोट पहायला मिळाला. तर नंतर सलग तीन (१९८५ ते ८७) व ८९ ला धरण पुर्णत: भरले नाही. या दरम्यान पाच वर्षाचा काळ शेतरऱ्यांच्या सुखाचा गेला. पाण्याचा तुटवडा फारसा जाणवला नाही. मात्र १९९५ साली धरणाची भूक अपुर्ण (९ हजार ४९८ दलघफु ) राहिली. तीच परिस्थिती २००० दशकाच्या मुहूर्तावर झाली. तेव्हा धरण अवघे ८ हजार ८५१ टिएमसी भरले होते. त्यानंतर सलग १५ वर्षे आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात धरणाची आवक कायम राहिली. ती आज ३ आॅगस्ट २०१९ पर्यंत. अशा पद्धतीने ४२ वर्षात धरण प्लस- मायनसमध्ये होत राहिले.
एकंदरीत विचार करता २० आॅगस्टनंतर भंडारदरा धरण ओव्हरफुल झाल्याचे अकडेवारीत निश्चित होते. तर २००९ मध्ये फक्त आक्टोबर महिन्यात धरण उशिराने भरले आहे. तर आॅगस्ट महिन्याच्या आधी एकदाही धरण भरल्याची इतिहासात नोंद नाही.
"भंडारदरा" धरण "तांत्रिकद्रुष्ट्या" भरले आहे. "३१ आॅगस्टपर्यंत निर्धारीत-- अभिजित देशमुख (अभियंता)
मर्यादेपर्यंत फुल होईल".
यावर्षी लवकरच धरणाने अधिकतम पातळी पुर्ण केली आहे. आता "पाणलोट क्षेत्रातून" होणारी "आवक" लक्षात घेऊन पाणी सोडले जाईल. भडारदरा परिसरात येणाऱ्या "नागिकांनी पाण्यात उतरू नये", तसेच "निसर्गाची हानी" होईल असे प्रकार व "जीवघेणे स्टंण्ट" करु नये.
-----------------------------------
जाहिर आभार
------------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने १७ दिवसात ४३ बातम्यांच्या जोरावर ३ लाख ११ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे. नकळत निर्भिड पणातून कोणाचे मन दुखविले तर क्षमा असावी.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------