अकोले व संगमनेरात "जनावरे खरेदी विक्रिच्या नावे" चालतात "कत्तलखाने"
आज सुटले ! उद्याचे काय ? |
हिंदुंचे दैवत म्हणून "गाईकडे" पाहिले जाते. त्यामुळे गाई असो वा वासरु यांचे रक्षण कट्टर हिंदुत्ववादी तरुणांकडून होताना दिसते. तर जाती-धर्माच्या नावाखाली काही "अॅन्टी सैनिक" पकडलेल्या गाड्यांचे व्यावहार करु पाहतात तर तोडक्या "पैशासाठी दलाली" करताना दिसत आहे. आता यात "पोलिसांचा वरदहस्त" आणि जनावरे खरेदी विक्रीचे परवाने त्यामुळे खुलेआम कत्तलखाने सुरू आहे. या कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. अन्यथा जणावरांचे "पालक" म्हणून "कसाई" वाढत जातील आणि हतबल झालेले गोरक्षक एकदिवस कायदा हातात घेतील. असेच काहीसे वातावरण समाजात पाहण्यास मिळेल आणि अकोले संगमनेर सारखे तालुके युपी, एमपी व बिहार सारखे तयार होतील. म्हणून यावर उपायोजना करणे गरजेचे आहे. याची गरज व उत्तर खालील घटनाक्रमातून लक्षात येईल..
शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी अकोल्यातील काही कार्यकर्त्यांनी एक संशयीत पीकअप अडविली होती. या वाहनाची झडती घेतली असता त्यात अगदी सुंदर आणि महिनाभराचे वासरे बंद करुन चालविले होेते. आता ज्याने विकत घेतले त्यानं खुद्द कत्तल करण्यासाठीच चालविले होते. मात्र, पोलिसांनी नेहमीप्रमाणे चालढकल सुरू केली. जरा वेळात बघता-बघता तोबा रक्षक जमा झाले. त्यातल्या काही महाशयांनी अर्थपुर्ण तडजोडीची भाषा सुरु केली. मात्र, हा ना करता-करता गाडी अकोले पोलीस ठाण्यात दाखल झाली. अखेर एक व्यक्तीने त्याच्या खरेदी विक्रीचे लायसन दाखविले आणि ही वासरे कत्तल करण्यासाठी नाही तर पाळण्यासाठी चालविली आहेत. असे सांगण्यात आले. तसा जनावरे खरेदी विक्रीचा परवाना दाखविण्यात आला. मात्र, तरी गोरक्ष दटून बसले. हे सिद्ध करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी गोऱ्हे विकले होते. त्यांना पोलीस ठाण्यात निमंत्रण मिळाले. त्यांनीही सांगितले ही वासरे आम्ही विकली नसून पाळण्यासाठी दिली आहे. त्यामुळे गोरक्षक हतबल झाले.
खा....की |
अर्थात पोलिसांनी योग्य भुमिका बजावली असती तर कायदेशीर गुन्हा दाखल झाला असता. जर जनावरे वाहुन नेणाऱ्या गाड्या पकडल्या की यांनी शेतकरी तयार ठेवायचे. आम्ही कापायला नाही तर पाळायला दिल्यात. अशी उत्तरे पुढे करायची. पोलिसांनी मात्र, शाबीत "अर्थ"पुर्ण तडजोड करुन प्रकरण मार्गी लावायचे. हाच फंडा सद्या संगमनेर अकोल्यात सुरू झाला आहे. सरळ- सरळ ही कोवळी वासरे कत्तल करण्यासाठी चालविले असल्याचे स्पष्ट दिसत होते. जर योग्य तपास केला असता तर कायदेशीर गुन्हा दाखल झाला असता. पण, निव्वळ पोलिसांच्या रटाळ आणि अंगकाढू धोरणामुळे हा गुन्हा दाखल झाला नाही. गुन्हा निष्पन्न होण्याच्या अगोदरच पोलीस अधिकारी म्हणाले, हे कत्तल करण्यासाठी चालविले होते हे सिद्ध करता येत नाही. त्यामुळे ही वासरे पुन्हा शेतकऱ्यांच्याच ताब्यात देऊ. असा निर्णय घेण्यात आला. आणि कोणताही गुन्हा दाखल न होता. आम्ही वासरे विकणार नाही. या लेखी पत्राद्वारे बांधून घेत. सर्व वासरे शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली.
जर्शी म्हणजे आम्ही दावनीला भारचा का ? |
वास्तव पाहता जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या काही विशिष्ट दलालांचे घरे आंबानीसारखी झाली आहेत. या परवान्याच्या नावाखाली कत्तलखाने जोमात सुरू आहेत. जर अशा पद्धतीने कारवाई होणे टाळली जात असेल तर कत्तलखाने बोकाळतील. म्हणून या कायद्यात बदल करून काही नियम व अटी घतल्या पाहिजे. जेणे करून असल्या दलालांची या परवान्याआडून कत्तलखाने चाललार नाही. आता भाजप सरकारची चलती आहे. त्यामुळे हिंदु रक्षकांनी असे सुधारणात्मक विधेयक तयार करुन मांडले पाहिजे. काल ज्या तरुणांनी वासरांची सुटका केली. त्यांचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
""""""""""""""""""""""""""""""""
""""""""""""""""""""""""""""""""
-- सागर शिंदे
=====================
माजी मधुकर पिचड राजकारणात कसे आले, त्यांच्या कुरघोड्या, राजकारण, समाजकारण आणि आजची परिस्थिती. वाचा "रोखठोक सार्वभौम"