"पिचडांना सरकारचा मोठा धक्का" दुसऱ्या पत्नीचा "शालेय दाखला" घेण्यास; "क्राईम ब्रँन्च" सुगावात दाखल; "तपासाला वेग"


अकोले (प्रतिनिधी) :-
              "माजी मंत्री" मधुकर पिचड" साहेब यांच्या दुसऱ्या पत्नी "कमल पिचड" यांचा खोटा अदिवाशी दाखला" तयार करून शहापूर येथील आदिवाशी समाज्याच्या जमीनी हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. याप्रकरणी चौकशी समितीने "क्राईम ब्रँच" शाखेची मदत घेऊन थेट "सुगाव बु" गाठले आहे. झेडपी शाळेत प्रवेश करून त्यांनी मुख्यध्यापकांकडून "कमल देशमुख" यांच्या "शाळेचा दाखला" व अन्य कागदपत्रे हस्तगत केली आहेत. त्यामुळे या प्रकरणात "कारवाई होते" की, "क्लिनचिट" दिली जाते. याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
            माजी आमदार वैभव पिचड व मधुकर पिचड यांनी स्वत:वर होणाऱ्या "आरोपांचा बचाव" करण्यासाठी भाजपात प्रवेश केल्याचे "राजकीय वर्तुळातून" बोलले जाते. त्यांची दुसरी पत्नी "कमल" यांचे नाव "अदिवासी समाजात" सामाविष्ठ करून घेतले. यासाठी "सत्तेचा पावर" वापरून स्थानिक अधिकाऱ्यांकरवी हा उपक्रम राबविण्यात आला व शहापूर येथील अदिवासी समाज्याच्या लोकांच्या जमीनी नाममात्र रकमेत खरेदी केल्या. या आरोपाला अनुसरून अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे, मारुती मेंगाळ यांच्यासह सबंध अदिवासी बांधवांनी अकोले तहसिलवर "जनआक्रोश मोर्चा" काढला होता. तसेच हे प्रकरण "न्यायप्रविष्ठ" आहे. त्यामुळे या चौकशीला वेग आला असून या "जातीच्या दाखल्यावर" संपुुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
           
काल आलेले हे पथक "२४ तास तालुक्यात तळ ठोकून होते". त्यांनी कमलताई यांच्या "शाळा सोडल्याच्या दाखल्यासह अन्य कागदपत्रे हस्तगत" केल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता "भाजप सरकार" यावर काय भूमिका घेईल हे सर्वद्न्यात आहे. मात्र, न्यायलयात "दोन सुनावण्या" झाल्या असून याप्रकरणावर पुढे काय सुनावणी होते. हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

         "मास्तर सक्तीच्या

              रजेवर" ?

चौकशीसाठी पथक आले असता राजकीय दबाव वापरून सुगाव शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापकांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याची कुनकण स्थानिक नागरिकांमधून येत आहे. तर एकीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे मिळाली असे सांगण्यात आले. त्यामुळे काय नेमकी काय लपाछपी चालु आहे. याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
----------------------------------
            - सागर शिंदे
-----------------------------------
         जाहिर आभार
------------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने १६ दिवसात ४२ बातम्यांच्या जोरावर २ लाख ५० हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे. नकळत निर्भिड पणातून कोणाचे मन दुखविले तर क्षमा असावी.  
                          ---धन्यवाद ---
                              आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

             

            - सागर शिंदे