"आता आमचं ठरलय..! "अब की बार ओनली रोहित पवार..! "राम नाम" सत्य हैं.. !

                   
कर्जत / जामखेड :- 
              गेली दहा वर्षे मंत्री महोदय राम शिंदे यांनी कर्जत जामखेडमध्ये शिंदेशाही चालविली. मात्र, चौंडी सारखी ठराविक ठिकाणंं वगळली तर दोन्ही तालुके अगदी "रामभरोसे" असल्याचे दिसते आहे. कालपर्यंत कुकडीच्या पाण्यासाठी  आत्मदहनाचा प्रयत्न करणारे शिंदे. आज, कुकडीचे पाणी ढवळायला देखील तयार नाहीत. शेतीचे सोडा, पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भकटायला लागणाऱ्या स्रीया आता शिंदेशाहीला कंटाळल्या असून निव्वळ "कोटीत" मिळणारी अश्वासने, एमआयडीसी, मेडिकल कॉलेज हे जनतेने आता 'रामभरोशावर" सोडले आहे. या बॅनरबाजीला जनता कंटाळली असून ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी कर्जत जामखेडला डोईजड झाल्याचे दिसू लागले आहे. म्हणून कालपरवा झालेल्या महाजनादेश यात्रेकडे जनतेने काना डोळा केला तर रोहित पवार या नवोदीत तरुणाकडे विकल्प म्हणून लोक पाहु लागले आहेत. म्हणून तर शिवस्वराज्य यात्रेस घरा-घरातून लोक मैदानात आले आणि एकच नारा दिला. "आता आमचं ठरलय ! अब की बार रोहित पवार". त्यामुळे पवारांचे वाढते प्रस्त पाहुन विरोधकांचे "राम नाम सत्य है" ! असेच होणार असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

"गर्दी" नव्हे "दर्दी" जनता

                भाजपचे "मुख्यमंत्री" देवेंद्र फडणवीस यांची "महाजनादेश" यात्रा व राष्ट्रवादीचे डॉ, अमोल कोल्हे यांची "शिवस्वराज्य" यात्रा ही "एकाच दिवशी एकाच वेळी" जामखेडमध्ये आमने-सामने आली.
परवाचे जामखेडचे वातावरण म्हणजे "तो पहा सुर्य अन् तोच जयधरथ"असेच काहीसे "दर्दी" होते. तर दुसरीकडे "जनता कमी" अन् "पोलीस प्रशासन व शासन" यांची प्रचंड 'गर्दी' होती. अशात "अश्वासनांची खैरात" मांडणारी ती "जत्रा"च होती. एकंदरीत या परिस्थितीत दोन्ही बाजुने होणाऱ्या जाहीर सभेत प्रमुख नेते काय बोलणार याची उत्सुकता आम जनतेला होती. पण, चौका-चौकात "कोट्यावधी रुपये मंजूर, इतका निधी, तितका निधी" असे "लाखो रुपयांचे बॅनर" ठराविक ठेकेदारांनी लावल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे पवार यांच्या यात्रेत साधा "एकही पोलीस" किंवा "प्रशासकीय अधिकारी" पहावयास मिळाला नाही. उपस्थित होते ते फक्त "पवारांचे काम".

शिंदेंच्या मतदारसंघावर पवारांनी फिरवलं पाणी !

कारण, ज्या दुष्काळात कर्जत जामखेडला "पाण्याची गरज" होती. तेव्हा ठराविक गावांत शासनाचे पाणी पोहचत होते. तर, बाकी "रामभरोसे" गावांसाठी रोहित पवार धावून आले आणि २५० पेक्षा जास्त "टँकरचा पुरवठा" करून खचलेल्या "शेतकऱ्याच्या माऊलीची पायपीट" थांबविली. रोहीत काही दिवसांपासून कर्जत जामखेड मध्ये ठाण मांडून आहेत. सृजन व बारामती अॅग्रोच्या माध्यमातून त्यांनी विविध कामे केली आहे. त्याचे फलीत कालच्या सभेतून दिसुन आले. "शिवस्वराज्य" सभेला लक्षणीय गर्दी पाहुन रोहीत पवारांनी "सर्वसामान्य जनतेशी नाळ" जोडल्याचे दिसून आले.

"राम...राम"..द्यायचा ना ..!

          दरम्यान "महाजनादेश" यात्रेत मा. मुख्यमंत्री मोहदयांनी राम शिंदे यांच्या कामाचे "कौतुक" केले. सत्ता आली तर राम शिंदेना "पुन्हा मंत्रिपद" देऊ असे "अश्वासन" दिले. परंतु, फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष चांगलेच कडाडले. शिंदेना "मंत्रीपद" देण्यासाठी ते "निवडुन तर आले पाहिजे ना"..! असा टोला दिला. कुठलीही सत्ता नसताना रोहीतने कर्जत-जामखेडचा विकास केला आहे. मला विश्वास आहे की तो कर्जत-जामखेडच्या विकासासाठी कटिबद्ध असेल. तो जनतेचा विश्वास तोडणार नाही. सुजान नागरिकांनो..! उद्या तुम्हाला रोहितलाच विधान सभेवर पाठवायचे आहे असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.

कर्जत-जामखेडचे काऊंट-डाऊन सुरू

        दोन्ही सभेंचा "परामर्श" घेतला तर लक्षात येईल की; कर्जतमध्ये परावांचे वाढते प्रस्त आहे. तितके जामखेडमध्ये दिसत नव्हते. कारण, शिंदे हे स्थानिक उमेदवार आहेत. मात्र, "शिवस्वराज्य" यात्रेतून जामखेडची जनता "पवारांच्या पाठीशी" उभी राहिलेली दिसली. त्यामुळे "समसमान टक्कर" होण्यास वातावरण पुरक झाले आहे. वास्तव पाहता, "मराठा" व "जाणता राजा" म्हणून शरद पवारांना तेथे माननारा वर्ग मोठा आहे. तर "ओबीसी" समाज शिंदे यांच्या पाठिशी असल्याचे दिसते. मात्र, "काम नाही, तर साथही नाही". त्यामुळे "ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी" वाढविल्याने शिंदेंना जनता साथ द्यायला तयार नाही. असे स्थानिक जाणकारांना वाटते. उद्या राज्यात युती होते की नाही. किंवा "वंचित - वंचितच" राहणार असेल तर तेथून अरुण जाधव यांचीही डोकेदुखी पवारांना असणार आहे.

रोहितचा "टिकाव" लागेल का ??

           तसेच रोहित पवारांचे नाव "शिखराव" पोहचले म्हणून मनिषा गुंड, नामदेव राऊत, नागरगोजे यांनी शांतता घेतली आहे. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणाक ईडी आणि सत्तेची लालसा कोणत्या थराला जाऊ शकते. हे राष्ट्रवादीला नव्याने सागायला नको.  म्हणून "सर्वसमावेशक गणिते" जुळली तर रोहित पवार विधानसभेत जातील असे वातावरण सद्यातरी तयार झाले आहे.
        एकीकडे डॉ. सुजय विखे, ना. विखे आणि सदाशिव लोखंडे  यांचे देखील गटतट शिंदेंना तारक ठरतील. आणि महत्वाचे म्हणजे, विखे आणि पवार कुटुंबियांचा वाद शिंदेंना अधिकच तारक ठरु शकेल. त्यामुळे, उद्याचा विचार करता, समग्र जिल्ह्याचे "पालकमंत्री" राम शिंदे यांनी "उत्तर नगर जिल्हा" जणू घोषित करुन विखे साहेबांना वाटणीत बहाल" केला आहे. कालपर्यंत "शिंदेशाहीचा" जो "मिजास" होता. तो "विखेशाहीत विभागला" आहे. त्यामुळे "जिल्हा विभाजन" करून "दक्षीनेवर अधिराज्य" कायम ठेवायचा मानस राम शिंदे यांचा आहे. असे "राजकीय विश्लेषकांना" वाटते.

"घाव" घालुन नव्हे ! "कव"घालून साद !

             पण, उद्याचं सोडा. आज विधानसभेत रोहित पवार नावाचे "वादळ" शिंदेंना झोपू देणार नाही. येणाऱ्या काळात जो कोणी जनतेच्या प्रश्नांना "स्मशान" देखवेल त्याचा "जनता"... "राम नाम सत्य है" ! केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.
=====================

         --  सुशांत पावसे

        (क. जा विशेष प्रतिनिधी)
=====================

         -- सागर शिंदे 

   ------------------------  -----------------------------------

         जाहिर आभार
----------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  ४० दिवसात  ७५ बातम्यांच्या जोरावर  ४ लाख ६६ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                              आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

             

            - सागर शिंदे