"डॉ. सुजय विखेंचे" संगमनेर "विधानसभेचे आॅपरेशन"; आ. थोरातांना घेतले "व्हेंटीलेटरवर"..

संगमनेर (प्रतिनिधी) :-
           आमचे कुटुंब दु:खात असतांना आम्ही घरी असायला हवे होते असे लोकांना वाटते, पण पक्षाला आणि संगमेनरच्या जनतेला आमची गरज आहे. म्हणून मी घराबाहेर पडलो आहे. या राज्याला कधी नव्हे असा पहिल्यांदा मुख्यमंत्री लाभला आहे. संगमनेरच्या विकासासाठी आपण त्यांना साथ दिली पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला चांगले दिवस यावे यासाठी एक व्हा. निळवंडे धरणाच्या पाणी क्षेत्रात जी गावे येतात, तेथील सर्व शेतकरी उद्याच्या महाजनादेश यात्रेसाठी आले पाहिजे. नाबार्डचा उपयोग सर्वात जास्त संगमनेर तालुक्यासाठी झाला आहे. अशा अनेक योजना राबवायच्या असतील तर संगमनेरात एखाद्या लॉन्सवर नको तर जाणता राजा मैदानावर  ही सभा झाली पाहिजे.

थोरात विरोधकांची मादीयाळी

         ही निवडणुक आपल्यासाठी का महत्वाची आहे, तर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना जे वाटते आम्ही पराभूत होऊ शकत नाही. हा भ्रमनिराश काढायचा असेल तर कार्यकर्त्यांनी २४ तास गरिबांच्या प्रश्नांसाठी लढले पाहिजे. तेव्हा सिद्ध होईल संगमनेरचा शेतकरी, मजूर आणि व्यापारी काय करून दाखवू शकतो. आपल्याला कोणावर टिका टिप्पणी करायची नाही. ना कोणावर चिखलफेक करायची नाही. आपल्याला फक्त मोदीजींचे स्वप्न पुर्ण करायचे आहे. राज्यात देवेंद्र टिकवायचे आहे. यासाठी कामाला लागा. आयुष्यमान विमा योजना, रेशनकार्ड यांच्यासह सर्व योजना लोकांपर्यंत पोहचवा. मी जेव्हा नव्याने खासदार झालो तेव्हा मोदी साहेबांनी प्रत्येकाला दिड मिनिट आपले काम काय यावर बोलण्याची संधी दिली होती. त्यावर मी म्हणालो, आपल्या आयुष्यमान विमा योजनेत अडिच लाख लोकांचे वीमे काढून त्यांना लाभ दिला. त्यावर मोदी म्हणाले डॉ. सुजय विखे हे भाजपात नसून त्यांनी आपल्या योजनेतून समाजकार्य केले व राजकारणात ठसा

वेलकम टू संगमनेर

उमटविला. त्यामुळे आपले काम चांगले असेल तर चांगले चांगले लोक आपले कौतुक करतात, तेव्हा सामान्य मानसांना अशा योजना दिल्या तर ते तुम्हाला डोक्यावर घेतील. आज मी घोषणा करतो की; संपुर्ण संगमनेरच्या गरिब नागरिकांचे आयुष्यमान विमा योजनेचे कार्ड काढायचे आवाहन करतो. सद्या लोकसभा झाली आहे. त्यामुळे मीच कंगाल आहे. मात्र, तरी देखील हा विमा काढण्यासाठी लागणारी सगळी रक्कम मी अदा करण्याची जबाबदारी घेतो. हे काम कार्यकर्त्यांनी करायचे आहे. सरकारच्या सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहच करायच्या आहेत. जेव्हा हे काम मैदानात उतरून पुर्ण होईल तेव्हा समजून जा की संगमनेरात भाजपचा आमदार झाला. ही काळ्या दगडावरची रेष आहे.
     

"जय-पराजयाचे साक्षीदार"

 आजवर योजना मोदींनी आणल्या आणि त्याचे पैसे प्रस्तापितांनी खाल्ले, हे जनतेचे पाप आहे. जनतेच्या मनात रोष आहे. त्यामुळे तुम्ही जनतेत जा. त्यांच्या समस्या सोडवा. देशात कायम नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र टिकवायचे असतील तर जनतेत फिरा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या. सरकारच्या योजना प्रत्येक्षात आणा. मोदींनी पहिल्यांदा ३७० कलम रद्द करून काश्मिरात तिरंगा फडकविला आहे. आरक्षण, तलाख, पाकला जबाब असे अनेक प्रश्न सरकारने सोडविले आहे. ते लोकांना भावले आहे. त्यामुळे संगमनेरात आपला आमदार हवा असेल तर गरीबांना उमेदवारात आपले प्रतिबिंब दिसले पाहिजे असे उमेदवार आपल्याला द्यायचा आहे. सद्या येथून ६६ उमेदवार इच्छूक आहेत. मात्र. जो जनतेत जाऊन काम करेल तो येथील आमदार असेल असे डॉ. विखे म्हणाले.
        भाजपात माईंडच डिपार्टमेंट ना. विखे साहेबांकडे व हृदयापासूनचे डिपार्टमेंट माझ्याकडे दोन्ही मिळवुन संघटन वाढवतो. महिलांची उन्नती बचतगटांपासून विविध योजनेतून करा असा संगमनेरच्या कार्यकर्त्याना आदेश दिले आहे. स्वतःची प्रतिमा सर्वसामान्य जनतेमध्ये रुजवा, जनतेशी नाळ जोडा असा स्पष्ट आदेश सुजय विखे पाटील यांनी संगमनेरच्या कार्यकर्त्याना दिला. स्वतःचे कौशल्य दाखवा कार्यकर्त्यानी योजना घराघरा पर्यंत पोहोचवा सन्मान योजना ते उज्वला योजना पर्यंत सर्व योजना संगमनेर मध्ये वाटा यापासून कोणीही वंचित राहिले नाही पाहिजे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊनच शिर्डी मतदारसंघात विखे साहेब सव्वा लाख मतांनी निवडुन येतील अशी ग्वाहीही देण्यात आली. कुठली कारखाना यंत्रणा लागत नाही, कुठली अदृश्य ताकदही लागत नाही फक्त शासनाच्या योजनेचा लाभ जनतेपर्यंत जाऊद्या. संघटना प्रबळ करा, आपली ताकद जनसामान्यांपर्यंत पोहोचवा. माननीय मुख्यमंत्री साहेबांचे स्वप्न संगमनेर मध्येही पुर्ण करू अशी कार्यकर्त्यांना ग्वाही देण्यात आली.
मा, राधावलभ कासट,प्रकाशजी चित्ते,अप्पाशेठ केसेकर, बापूसाहेब गुळवेज्ञानेश्वर कर्पे,राजेशजी चौधरी, काशिनाथजी पावसे,कैलास वाकचौरे, राजेंद्र सांगळे, अमोल खताळ, अशोक सातपुते, नागसेवक मेघा भगत आदी उपस्थित होते.
=====================

         --  सुशांत पावसे

            (संगमनेर प्रतिनिधी)
=====================

         -- सागर शिंदे 

   ------------------------  -----------------------------------
         जाहिर आभार
----------------------------------

 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  ३५ दिवसात  ७१ बातम्यांच्या जोरावर  ४ लाख ११ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                              आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

             


            - सागर शिंदे