"आदिवासी" नेत्यांना "एकजुटीचे राजकीय शहानपण" आले तरच "पिचडांचा पराभव"..! होय..! मी "दशरथ सावंत" बोलतोय...

अकोले (प्रतिनिधी) :-
                  तो काळ "१९९५ चा" होता. अकोल्यातील सगळे "प्रस्तापित नेते" पिचडांच्या "विरोधात" गेले होता. त्यात "भाऊसाहेब हांडे व सिताराम गायकर" यांच्यासह अनेकांनी "बंडाचे निशान" हाती घेत "पिचडांना पाडण्याचा चंग बांधला" होता. त्यावेळी मी (दशरथ सावंत), मिनानाथ पांडे व विठ्ठल चासकर यांच्यासारखी ठराविक नेते मंडळी त्यांच्यापाठी ठाम उभी होती. अशा परिस्थितीत "जनता काय करेल" हे सांगता येणे अशक्य होते. अशा पडत्या काळातच "विरोधकांच्या तोफा कडाडत होत्या". मात्र, "पिचडांचा बालेकिल्ला" आम्ही 'डगमगू' दिला नाही. यावेळी विरोधकांनी "रिपाईला पिचडांपासून फोडण्यासाठी" कधी नव्हे पण चौकात "निळ्या टोप्या" घालून दलित मते फिरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकदाची निवडणूक झाली आणि पिचड कधी नव्हे ते "३४ हजार मतांच्या बलाढ्य फरकांनी" निवडून आले.

         अर्थात त्याकाळी त्यांच्या "जवळच्याच व्यक्तींवर जनतेचा प्रचंड रोष" होता. ठराविक  "मक्तेदारी" करणाऱ्यांनी "पिचडांची साथ सोडली" त्यामुळे जनता आनंदून गेली होती. "वैयक्तीक पिचडांना माननारा वर्ग मोठा होता". त्यामुळे या "सुप्तलाटेने" इतका मोठा विजय जनतेने अगदी "खुशी- खुशीत बहाल" केला.
          मात्र, पिचडांनी विरोधक कमी करण्यासाठी पुढील पाच वर्षात पुन्हा "फुटीर कार्यकर्त्यांची" मोट बांधली. आणि १९९९ विधानसभा लढविली. याचे परिणाम असे झाले की; ही "फाईट" इतकी "टफ" झाली की नेते सोबत नसताना ३४ हजारांचे लिड व नेते सोबत असताना अवघे "२२०० शे मतांचे लिड" इतका विरोधाभास निर्माण झालेला पहावयास मिळाला. तेव्हा जर "अशोक भांगरे" यांनी "रिकाऊंटींगचा फॉर्म" भरला असता तर कदाचित भांगरे आज आमदार असते. असे आम्हाला वाटते.
               
त्यानंतर "मधुकर तळपाडे" यांनी 'शिवसेनेची उमेदवारी' आणली आणि अनेकदा चांगली फाईट दिली. मात्र, त्यांनाही यश आले नाही. कारण, त्यांना तालुक्याची मोट बांधता आली नाही. तळपाडेंना आदिवासी भागातून कमी मतदान मिळत होते. मात्र, बिगर आदिवासी भागात चांगली मते होती. तसे अशोक भांगरे यांना १७ हजार पेक्षा जास्त मते आदिवासी भागातून पडतात, तर अन्यत्र ठिकाणी कमी मते पडता. याचा परिणाम म्हणजे "मत विभागणीत" होत आणि पिचड अवघ्या "८ ते १० हजारांच्या फरकाने" निवडून येतात. हाच "फंडा" चालत आलेला आहे. आज पिचडांच्या विरोधात लोकांच्या "मनात राग" आहे. मात्र, "योग्य विरोधक" त्यांना मिळत नाही, हेच दुर्दैव आहे. जेव्हा "तडपाडे यांच्यासारखे व्यक्तीमत्व" आले तेव्हा सगळ्या तालुक्याला आशा होती. मात्र, निवडणुकींच्या नंतर त्यांनी "तालुक्यात फिरकणेच साेडून देणे" पसंत केले. म्हणून जनतेने त्यांना "पसंत" केले नाही. त्यामुळे आज त्यांना विरोधक राहिला नाही. "लोकांना विश्वास देईल" असे तळपाडे व भांगरे हे इलेक्टीव मिरीटचे वाटत नाही.
             
                  सद्यातरी "डॉ. लहामटे" यांचे चित्र उभे रहात आहे. तसे पाहता आज लोकांच्या मनात "राष्ट्रवादी आणि काँग्रेस" पक्षाबाबत लोकांच्या मनात "अस्था" राहिली नाही. कारण, मोदींच्या "कश्मीर"सह अन्य मुद्द्यांमुळे "लोक खुश" आहेत. त्यामुळे "पिचड म्हणून नाही" तर "मोदी म्हणून" तरुण वर्ग मोदींच्या पाठीशी ऊभा राहिल. पिचडांनी जर म्हटले असते मोदी "सरकारचे धोरण" व निर्णय चांगले आहेत. "म्हणून मी भाजपात जातोय" तर त्यांचे सगळ्यांनी "कौतुक" केले असते. मात्र, त्यांनी केवळ "सत्तेच्या लालसापोटी" हा निर्णय घेतला आहे. हे जनतेला न कळण्याइतकी ती "दुधखुळी" नाही. आता जर आदिवासी समाज्यातीन नेत्यांना "राजकीय शहानपण" आले नाही, आणि "एकास एक उमेदवार" दिला नाही. तर, पुन्हा "वैभव पिचड" यांनाच फायदा होईल आणि ते आमदार होतील. यात शंका नाही. अजून काही दिवस आहे. "राजकीय धेय्य धोरणे वरिष्ठ पातळीवरुन" येणे आहे. त्यामुळे पुढे काय ? या प्रश्नाचे उत्तर उद्याचा काळच ठरविणार आहे.
=======================
      क्रमश: भाग संपले आहेत
   आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

 ===================

               --  सागर शिंदे

                 8888782010

                   फक्त व्हाट्सअॅप

------------------------


         जाहिर आभार
             ----------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  ३६ दिवसात  ७३ बातम्यांच्या जोरावर  ४ लाख ३ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                          आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

           

                      - सागर शिंदे