"मधुकर पिचड" यांचा मी पाहिलेला "राजकिय जिवण" प्रवास; होय..! मी "दशरथ सावंत" बोलतोय...

अकोले (प्रतिनिधी) :-
                    "शेतकरी संघटनेचे" ज्येष्ठ  नेते तथा "शेतकऱ्यांचे कौवारी दशरथ सावंत" साहेब यांच्या विशेष मुलाखतीत आपण "माजी मंत्री मधुकर पिचड" यांच्या "राजकीय प्रवासावरची धुळ" बाजूला सारत आहोत. कालचा प्रथम भाग आपण अगदी डोक्यावर घेतला. ५ ते ६ तासात या लेखाचे वाचक "पाच हजारांच्या वर" गेले होते. तर प्रतिक्रिया देखील चांगल्या आल्या. त्यामुळे आपण जेथे राहतो. तेथील "राजकीय इतिहास" आपल्यापर्यंत पोहचविण्यात आम्हाला "आनंद" होत आहे. आपण ही "पोष्ट वाचून शेअर" करता हेच आमच्या लिखानाचे "फलित" आहे.  कालच्या लेखाला अनुसरुन आजचा लेख "होय..! मी दशरथ सावंत बोलतोय" हा दुसरा भाग क्रमश: खाली दिला आहे.

"म्हळदेवीहुन शिफ्ट भंडारदरा" 

          अकोल्याचा पाणीप्रश्न कधी "संथ" राहिला नाही. १९७२ च्या "आंबड" चळवळीनंतर १९७७ साली "म्हळदेवीच्या धरणाच्या" जागेहुन प्रश्न उभा राहिला. तेव्हा "आणिबाणीचा" काळ सुरू होता. म्हळदेवी क्षेत्रात निब्रळ, म्हळदेवी, इंदोरी, मेहेंदुरी, रूंभोडी, विठे अशा सहा गावांत १० हजार एकर जमिन 'पाणलोट क्षेत्रात' जाणार होती. आणि हा सर्व भाग "सुपिक जमिनीचा" होता. त्यामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. हे धरण दिगंबर येथे स्थलांतरीत व्हावे असे अशी मागणी असतांनाही "शंकरराव चव्हाण आणि बाळासाहेब विखे" यांनी मोठ्या दिमाखात आणिबाणीत म्हळदेवीत धरण कामाचे "भुमिपूजन" केले. नंतर तेच धरण "भंडारदरा" येथे झाले. मात्र, दरम्यानच्या काळात आम्ही मोठा संघर्ष उभा करून याला विरोध केला. त्याचे हे "फलित" होते. त्यानंतर निळवंडे धरणाच्या वेळी देखील दादासाहेब रुपवते यांनी हस्तक्षेप करून चितळवेढे येथे धरण बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पिचड यांनी "निळवंडे" फायनल करून तेथे धरणाचा आरंभ केला.

"चितळवेढेहुन शिफ्ट निळवंडे"

         मधुकर पिचड सन १९८० ला आमदार झाले. त्यानंतर १९८३ मध्ये आम्ही पाणी प्रश्नावर "रुम्हणं" मोर्चा काढला होता. प्रवरेच्या पाण्यात अकोले व संगमनेर तालुक्यास "३० टक्के हिस्सा" मिळावा ही प्रमुख मागणी होती. याचे पडसाद राज्यभर उमटू लागले होते. याच वेळी हजारो जनता हातात "काठी, शिवळ आणि रुम्हणं" घेऊन रस्त्यावर उतरली होती.  तेव्हा पिचड यांनी वसंत दादा यांच्या ग्रुुपला जवळ केलेले होते. इतक्या मोठ्या मोर्चातून अलिप्त कसे रहायचे म्हणून पिचड यांनी मला (दशरथ सावंत) एक चिठ्ठी पाठविली होती. त्यात होते. जर तुमची हरकत नसेल तर मी या आंदोलनात सहभाग घेऊ शकतो का ? त्यावर मी म्हणालो. प्रश्न "शेतकऱ्यांचा व पाण्याचा" आहे. तो सोडण्यासाठी एकजूट होत असेल तर माझी काही एक हरकत नाही. त्यामुळे पाण्यासारख्या नितळ, निर्मळ भावनेने मी "ये म्हणालो". मात्र, नंतर ते आमदार आसल्यामुळे त्यांचे पाणी प्रश्नावर वर्चस्व गाजत गेले. लोकप्रतिनिधी असल्यामुळे आम्ही त्यांना विरोध केला नाही. कारण, तालुक्याला "न्याय मिळणे अपेक्षित" होते. म्हणून सरकारशी बोलण्यासाठी पिचड यांची "मध्यगाची भुमिका" महत्वाची असल्याने आम्ही ती "स्विकारली" होती.

"पाणीदार, दमदार आमदार"

         या दरम्यानच्या काळात पिचडांनी पाण्यासाठी चांगला "संघर्ष" केला होता. त्यामुळे, ते "पाणी लढाईचे आमदार" आहे. म्हणून त्यांना "मंत्रीमंडळात स्थान" देण्याचे ठरले. खऱ्या अर्थाने "पाणी" हेच पिचडांना "मंत्री" करू शकले. हे त्यांनी आज नाकारले तरी तेच वास्तव आहे. असे आम्हाला वाटते. त्यानंतर त्यांना लालदिवा मिळाला आणि "डाव्या चळवळीची प्रगल्भता" कमी होत गेली. पुढे याचाच फायदा त्यांनी घेत "राजकीय स्वार्थ" साधला आणि कायम आमदार होत राहिले.
          पुढे 'यशवंतराव चव्हाण' यांची "क्रुषीविषयक धोरणे" महाराष्ट्रसाठी चांगली राहिली. शेतकऱ्यांच्या विकासाची अनेक स्वप्ने त्यांनी राज्याला दाखविली. त्यामुळे एकेकाळी अहमदनगर जिल्हा "कम्युनिष्ठाचा असणारा बालेकिल्ला" पक्ष "काँग्रेसमय" झाला. याच काळात "सहकाराची चळवळ" वाढत गेली. त्यातून "पहिला प्रवरा सहकारी साखर कारखाना" उभा राहिला. या सहकारामुळे "पक्ष प्रबळ" होत गेले. सत्ता मिळविण्यासाठी त्यांचा वापर होऊ लागला. कारखाने, दुधसंध, पतसंस्था, संस्था, क्रुषी विकास यामुळे लोकांचा कल प्रस्तापित पक्ष आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वाढता झाला. त्यात पिचड देखील अपवाद ठरले नाही. तेही वेळोवेळी "चातुर्याने" आणि व्यक्तीप्रेमाने निवडून येत गेले. 'यशवंतराव चव्हाण' यांच्या काळात "विकास हाच मुद्दा" होता. आजसारखे फारसे "पक्षांतर" नव्हते. डाव्या चळवळीतील लोकाशी "वैचारीक हातमिळवणी" होत गेली व पक्ष वाढत गेले. मात्र, नंतरच्या काळात फार मोठा "भ्रष्टाचार" आणि "घराणेशाही" पुढे आली. जी लोकांना नको होती. त्यामुळे पक्षांतर, प्रादेशिक पक्ष, संघटना संस्था निर्माण होऊन "मताचे विभाजन" झाले. त्यामुळे अनेक राजकीय बदल पहावयास मिळू लागले. पुढे प्रस्तापितांनी या "डाव्या चळवळी" त्यांच्या 'हितासाठी' वापरून घेण्याचा "नवा फंडा" सुरु केला आणि यातच "डावे कम्युनिष्ठ" संपून गेले. हेच अकोल्यात देखील "पिचडांच्या बुद्धीचातुर्यातून"  पहावयास मिळाले.
             
 पहिल्यांदा पिचड हे वसंतदादांच्या 'गळ्यातील ताईत' होते. मात्र, नंतर 'शरद पवारांचा चलता काळ' येताच ते पवारांच्या अधीन झाले. पवारांनी त्यांना "आदिवासींचा नेता" म्हणून पुढे आणले. "सेड्युल ट्राईब" साठी त्याकाळी प्रथमत: "वेगळे बजेट" तयार करण्याचा निर्णय घेतला. तो पिचडांसाठी महत्वाचा मुद्दा ठरला गेला.
        जिल्ह्यात पिचडांचे वर्चस्व वाढत गेले. ते कमी करण्यासाठी आम्ही "न्यायात्मक लढा" देत होतो. राजकीय वर्तुळात "जनाधार" आमच्याकडे चांगला होता. याचे कारण म्हणजे १९८१ साली मी (दशरथ सावंत) "समाजवादी पक्ष सोडला" आणि १९८२ 'शरद जोशी' यांच्या "शेतकरी संघटनेत" सामील झालो. त्यानंतर १९८४ साली संगमनेर "साखर कारखान्याच्या निवडणुका" झाल्या. तो कारखाना ऊभारणीत "बुवासाहेब नवले आणि दत्ता देशमुख" यांचा खरा महत्वाचा वाटा आहे. तेव्हा "पिचड मंत्री तर थोरात सहकारमंत्री" होते. जेव्हा १९८४ साली निवडणुका लागल्या तेव्हा या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात आम्ही "दंड थोपटून" ऊभे राहिलो. आणि शेतकरी संघटनेचे "तीन" उमेदवार निवडून आणले. ते ही लोकवर्गनीतून आम्हाला पैसा पुरविण्यात आला होता. त्यानंतर पिचडांना शह देण्यासाठी मी स्वत: "अशोक भांगरे" यांना "जनता दलाकडून" विधानसभेच्या रिंगणात उतरविले होते. त्यावेळी  भांगरे यांना "३४ हजार" मते मिळाली होती. आज भांगरे यांनी "एक पक्ष आणि लोकांचा विश्वास" कायम ठेवला असता तर ते आज "आमदार" असते. या अकोले तालुक्यात विरोधकांचे वर्तन हीच पिचडांना बळ देणारी "जमेची बाजू" ठरली आहे. या काळातच 'शरद जोशी' यांनी "मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण" स्विकारले. मात्र, त्याचे आम्हाला योग्य अनुभव आले नाही. त्यामुळे मी "शेतकरी संघटना" सोडली आणि पहिल्यांदा शरद पवारांचे क्रुषी धोरणाचा योग्य वाटले. तसेच "गांधीबाई परकिय आहेत. म्हणून त्यांचे प्रतिनिधित्व आम्ही मान्य करणार नाही".
               

एकाच म्यानात दोन तलवारी !

 हे त्यांचे धोरण आवडले त्यामुळे मी "राष्ट्रवादी" काँग्रेसमध्ये दाखल झालो. आणि पिचड यांची विचारसारणी "कधी सम, तर कधी विषम" होती. मात्र, याच काळात पिचड यांनी "शिवसेना व भाजपात" जायचं की शरद पवारांसोबत जायचे.! हा प्रश्न मला विचारला. आणि मी पवारांच्या क्रुषी धाेरणाकडे पाहुन पवारांना साथ देण्याची पसंती केली. आणि "पिचड राष्ट्रवादी" झाले. त्यापुर्वी १९९५ ची विधानसभा निवडणुक  होती. पिचडांवर त्यांच्या "जवळचेच कार्यकर्ते" अगदी दात खाऊन होते. त्यांनी ऐनवेळी त्यांनी त्यांची "साथ सोडली" आणि अकोले विधानसभेच्या इतिहासात कधी नव्हे इतके एकटे पिचडांना पाडण्यात आले.

( क्रमश: भाग ३ वाचा उद्या दि.२० आँगस्ट रोजी सकाळी ९ वाजता.)
( टिप:-  लेखात काही प्रिट व सिक्वेन्स चुका असतील तर त्या माझ्या संपादकीय असतील)
------------------------
* कोण होते ते बंडखोर पुढारी
* १९९५ ला काय क्रांती झाली
* पिचड का एकटे पडले
* सगळे रिपाईत का गेले
* किती लिडने पिचड आले
* अशा अनेक प्रश्नांची अनुत्तरीत उत्तरे माहित करुण घेण्यासाठी
* वाचा -  रोखठोक सार्वभौम


 ===================

               --  सागर शिंदे

                 8888782010

                   फक्त व्हाट्सअॅप

------------------------


         जाहिर आभार
             ----------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  ३५ दिवसात  ७२ बातम्यांच्या जोरावर  ४ लाख १ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                          आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

           

                      - सागर शिंदे