"पिचड साहेबांचा पक्षप्रवेश" म्हणजे "नक्टीच्या लग्नाला" सतरा "विघ्ने"..!

अकोले (प्रतिनिधी) :- 
              "नक्टीच्या लग्नाला सतरा विघ्ने" ही खूप जुनी म्हण आहे. तसेच काहीसे मा.आमदार "वैभव पिचड" यांच्याभोवती "विघ्ने" फिरताना दिसत आहे. पक्षप्रवेशाची चर्चा रंगली तेव्हा "मोठे साहेब आजारी पडले", पक्षप्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची गोपनिय भेट घेणार तोच "अजित पवार अचानक भेटले", जो पक्षप्रवेश झाला तो "निष्ठावंत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मान्य होईना". इकडून तिकडून मान्य केला, तर "बीजेपी समर्थकांना तो रुजेना", सगळ्यांना एक करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय अकोल्यात येणार, तर तो "दौरा कोल्हापुर आपत्तीने पुढे ढकलला", त्याचे पुढील नियोजन करायचे म्हणून आज (दि.१८) ना. विखे साहेबांच्या उपस्थितीत अकोल्यात बैठक होणार होती तर त्यांच्या "मातोश्रींनी अखेरचा श्वास घेतला". या सगळ्यांचा अर्थ काढला तर सर्व गोष्टी "नकारात्मक" आहे. त्यामुळे "आमदार आणि मंत्री" होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पिचडांना ही "धोक्याची सुचना" आहे की, काय !  असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. परंतु  "इतिहास" सांगतो, "शंभुराजे पालथे जन्मा आले" तर सगळीकडे अशुभ चर्चा सुरू झाली. पण, प्रचंड उत्साहात अंधश्रद्धेला बाजुला सारुन छत्रपती शिवाजी राजे गरजले आणि म्हणाले, "जो पालथा जन्माला आला, तो "दिल्लीचे तख्त" पालथे करेल". आणि खरोखर शंभुराज्यांनी दिल्ली पालथी करून रयतेचे राज्य उभे केले. असेच काहीसे "अशुभातून शुभ" संकेत घेऊन "भाऊ" आमदार होऊन मंत्री होतील की नाही, असे प्रश्न जनतेला वाटू लागले आहे.

                मा. आमदार वैभव पिचड यांनी "हातातून घड्याळ" काढले आणि "कमळ हातात" धरले.  मात्र, ते निष्ठावान कार्यकर्त्यांना पचणी पडायला तयार नाही. "मुलगा मोठा व्हावा" हे कोणात्या पित्याला वाटत नाही. म्हणून माजी मंत्री साहेबांनी देखील मुलाच्या सुरात "हो ला हो" मिळविला. या दरम्यान साहेब रुग्णालयात अॅडमिट होते. मात्र, तरी त्यांनी मुलगा मंत्री होण्याचे आपल्या मनातील स्वप्न ओठावर आणले नाही. अर्थात पिचड साहेब पवाराशी आजवर प्रामाणिक राहिले. त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचे शल्य त्यांच्या मनात सलत असावे. म्हणून पहिला झटका निष्ठावंत म्हणून त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्यांची प्रक्रुती खचत राहिली. तदनंतर राष्ट्रवादीला एकामागे एक खिंडार पडत राहिले. वाघ, अहिर, नाईक, पिचड, निबाळकर अशा अनेकजणांनी बंडखोरी केल्याने कधी नव्हे इतके शरद पवार खचून गेले. त्यामुळे "इकडे आड, तिकडे विहीर" अशी गत पिचड साहेबांची झाली. मात्र, तरी देखील ना. विखे यांच्या मध्यस्तीने घड्याळाला चावी लावली गेली आणि राष्ट्रवादीचा प्रवास उलट दिशेने सुरू झाला. अर्थात ज्या पक्षाने आपल्याला मोठे केले, त्याचे वाटोळे होताना पाहण्याचे महतभाग्य अनेक बंडखोरांना लाभत आहे. याची नैतिकता म्हणून मनाला होणाऱ्या वेदना अक्षम्य आहेत. हे बंडखोर नेते आजही बोलून दाखवितात. त्यामुळे चांगली कामे करताना अनेकदा अडथळे निर्माण होत असल्याचे दिसत आहे.
             अकोल्यात वैभव पिचड यांच्यामुळे भाजपमध्ये असणारे धुमाळ, जालिंदर वाकचौरे, डॉ. किरण लहामटे, सिताराम भांगरे, सौ भांगरे व अशोकराव भांगरे यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे सद्या अँन्टी (राष्ट्रवादी) भाजप आणि नैसर्गीक भाजप अशा दोन टाेकाच्या दोन भाजप पार्ट्या झाल्या आहेत. मुळ भाजप अजूनही पिचड यांना स्विकारायला तयार नाही. तर युती झाली नाही तर जन्मजात शिवसैनिक देखील याच रांगेत बसणार आहे. त्यामुळे आज पिचडांच्या विरुद्ध आवाज उठविणारे भांगरे हे त्यांना मदत करतील असे वातावरण सद्या तरी नाही. तरी देखील त्यानी जिगर सोडली नाही. अजूनही त्यांच्या पोस्टरवर कमळ फुलताना दिसत आहे. हे "पॅचअप" फक्त ना. विखे साहेब किंवा बंडखोरी याच मुद्द्दयावर सॉल होऊ शकते.  त्यामुळे पिचड साहेबांना युती आणि भांगरे हे दोन प्रश्न सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे.

असं का होतय बुवा..!

            आता या दोन्ही गटांचे मनोमिलन घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस अकोल्यात येणार होते. मात्र, त्याला महापुराचे ग्रहण लागले. जरी महोदय आले तरी ते भांगरे यांना काहीतरी "अश्वासन" देऊन शांत करतील. मात्र, नगर दक्षिणची जागा डॉ. सुजय विखे यांना देताना माजी खासदार गांधी यांचे "पुनर्वसन" करण्याचे ठरले होते. मात्र, त्यांच्यामागून विखेसाहेब, अविनाश महातेकर अगदी काहीच नसताना मंत्री झाले. इतकेच काय उलट "अर्बन बँकेवर प्रशासक" बसला. तर नारायण राणे व एकनाथ खडसे हे अजूनही अश्वासन पुर्तीची वाट पाहत आहेत. त्यामुळे भांगरे साहेबांची वर्णी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य जिल्हा पातळीवर लवकर काेठेतरी होऊ शकते. अन्यथा भांगरे आणि पिचड हे वैर कायम राहिले तर "अकोल्याचे वैभव" धोक्यात येईल. यात शंका नाही.
          आज (दि.१८) मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन म्हणून ग्रुहमंत्री विखे पाटील अकोले दौऱ्यावर येणार होते. सगळे नियोजन पुर्ण झाले असताना आज सकाळी विखे साहेबांच्या मातोश्रींना देवाद्न्या झाली. त्यामुळे आज पुन्हा ही बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे मा. पिता-पुत्रांचा पक्षप्रवेश झाला खरा. परंतु एक ना एक असे अनेक अडथळे ऊभे रहात आहे. आता हा समस्यांचा चिखल तुडवत कमळापर्यंत पोहचण्यासाठी मोठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागणार आहे. असे नाही झाले तर अकोल्यात नव्याने एक इतिहास घडेल. यात तिळमात्र शंका नसावी असे जनतेला वाटते.
========================

              -- सागर शिंदे

                (संपादकीय) 
====================

     होय..! मी दशरथ सावंत बोलतोय

 ( क्रमश: भाग २) :- पुढील भाग २ दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे १९ आॅगस्ट रोजी क्रमश: प्रसिद्घ केला जाईल. 

          महत्वाचे मुद्दे


पिचड साहेब मंत्री कसे झाले
* पाण्याच्या प्रश्नात त्यांचा वाटा काय
३५ वर्षातील रोमहर्षक निवडणुका
धरणांमधील भागीदारी !
* पिचड का निवडून येत राहिले ! 
आत्ताचे सोबती, कालचे दुष्मण !
शरद पवार ते मधुकर पिचड
अशा बर्याच अनुत्तरीत आणि अबोल प्रश्नांची माहिती.
वाचा भाग २ "रोखठोक सार्वभौम"

 ===================

               --  सागर शिंदे

                 8888782010

                   फक्त व्हाट्सअॅप

------------------------


         जाहिर आभार
             ----------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  ३४ दिवसात  ७१ बातम्यांच्या जोरावर  ३ लाख ९३ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                          आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

           

                      - सागर शिंदे