पिचडांच्या "जन्मजात विरोधकाकडून "राजकीय आयुष्याची पोलखोल" होय..! "मी 'दशरथ सावंत' बोलतोय"..!
होय..! मी दशरथ सावंत बोलतोय. |
माजी मंत्री "मधुकर पिचड" यांच्या "धुर्त आणि गणिमी" राजकारणाचे अनेकजण चाहते आहेत. तर "पवारांच्या मांडिला मांडी" लावून बसल्यामुळे "वान नाही, पण गूण लागला". त्यामुळेच पुढे कोणती चाल खेळायची ? हे अद्याप कोणाला कळू शकले नाही. इतकेच काय तर "स्वत: पवार साहेबांना" देखील 'पक्षबदलाची चुनूक' लागू दिली नाही. अर्थात "३५ वर्षे आमदार" राहणे म्हणजे जोक नव्हे. "भले-भले मातब्बर" बंड पुकारुन गेले आणि त्यांनी पुन्हा "राजुरच्या बंगल्याचे दरवाजे" ठोठावले. अगदी आदिवासी समाज्यातील या मानसाने "१८ पगड" जाती एक बोटावर नाचून विरोधकांच्या नाकावर टिचून आमदार, मंत्री, विरोधीपक्षनेता अशी अनेक पदे भुषविली. मात्र, अजूनही जनसामान्यांना एक प्रश्न पडतोय. असे काय होते पिचडांमध्ये, जे इतक्या दुर्गम भागात राजा बनून राहिले. त्याचे उत्तर आपण शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा शेतकऱ्यांचे कैवारी "दशरथ सावंत" यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
तो काळ १९६५ चा असावा, तेव्हा "सर्वोदयचे संस्थापक" पाटणकर सर हे तत्कालीन "मुख्यमंत्री मुरारजी देसाई" यांचे "पीए" म्हणूनही ते काम पाहत होते. मात्र, आपल्या "आदिवासी भागाची उन्नती" व्हावी म्हणून ते अकोल्याला आले. राजुरला त्यांनी संस्था सुरू केली. त्यावर एक "उमदा तरुण" म्हणून त्याकाळी "बीए पास" झालेला "मधुकर पिचड" नावाचा एक देखना तरुण पोरगा "शिक्षक पदावर" भरती केला. त्याच्याकडे चांगले "नेत्रुत्व कौशल्य" आणि तितकेच "धाडस" व "समयसुचकता" होती. त्याकाळी भातगिरीण्या होत्या. त्या संघटनेवर प्रथमत: पिचड हे व्यक्तीमत्व "चेअरमन" म्हणून नियुक्त केले गेले. येथेच त्यांचा "राजकीय काळ सुरू" झाला. त्यावेळी म्हणजे १९६२ साली "यशवंतराव भांगरे" हे अकोल्याचे "आमदार" होते. त्याकाळी राज्यात "राजकीय व सामाजिक" बरीच मोठी "अस्थिरता" निर्माण होत चालली होती. अकोल्यासारख्या ठिकाणी "कॉम्रेड अण्णासाहेब शिंदे" (पाडळी) यांनी "काँग्रेसमध्ये प्रवेश" केला होता. दरम्यान "१९६७ च्या विधानसभा" जवळ येताच क्रुषी खात्यात कार्यरत असणाऱ्या "बी के देशमुख" यांनी नोकरीचा राजिनामा देऊन "भारतीय कम्युनिष्ठ" पक्षाकडून निवडणुक लढविली आणि ते "आमदार" देखील झाले. तोवर पिचडांची राजकारणात कोणतीही चलती नव्हती. ना त्यांचे नाव चर्चेत होेते. ते वर्षानुवर्षेचे राजकारण यशस्वी करण्याचे "बाळकडू" या संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीतून उकळून पीत होेते. सन "१९७२ साली" चांगलाच भयान दुष्काळ पडला होता. त्यावेळी "देशमुख यांना जनतेने पायउतार केले" व पुन्हा "यशवंत भांगरे" यांच्या गळ्यात "आमदारकीची माळ" पडली. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यांच्या सानिध्यात पिचड या व्यक्तीने चांगलेच धडे घेतले होते.
"भांगरे नावाच्या घराण्याला, आयुष्यात कधीच "राजकीय आखाड्यात" विजय मिळवू द्यायचा नाही. हाच "गणिमी काव्याचा धडा" १९७२ च्या राजाकरणात पिचडांनी अभ्यासला आणि 'पहिल्यांदा हा पैलवान' राजकारणाच्या आखाड्यात उतरला, तो जिल्हा परिषद निवडणुकीच्या रुपानं. त्याकाळी चारच गट होते. त्यांनी राजूर गटातून, मी (दशरथ सावंत) अकोले गटातून, लहानु बेनके यांनी समशेरपूर गटातून तर भाऊसाहेब हांडे यांना डावलून सुगंधराव देशमुख यांना कोतुळ गटातून उमेदवारी देण्यात आली. चारही उमेदवार काँग्रेसकडून निवडून आले. मात्र, पिचड आमच्यातच राहुन खताळांना बंडखोर म्हणून निंबाळकर गटाच्या बाजूने होते. तरी त्यांचा कल खताळांकडे नेहमी जास्त होता. तेव्हाही काही गटबाजी कमी नव्हती. त्यापाठोपाठ पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि आठ गणातून निवडून आलेले आठ व झेडपीचे चार असे १२ जणांनी सभापती ठरावयचा नियम होता. त्यावेळी झेडपी सदस्यांनाही सभापती होता येत होते. म्हणून सुगंधराव देशमुख यांनी मातब्बर भाऊसाहेब हांडे (अपक्ष) यांना पाडले होेते. त्यामुळे त्यांच्या विजयाचा जल्लोष आणि वजन काही औरच होते. म्हणून देशमुखांना सभापती देण्याचे ठरले. मात्र, पिचड आणि अन्य व्यक्तींनी कोणाला कळू न देता अंतर्गत खेळ्या केल्या. आज जशा निवडून आलेल्यांच्या बाहेर सहली काढतात, तसे त्यावेळी आम्हा सर्वांना भंडारदरा येथे नेऊन ठेवले होते. तेथे सभापतीसाठी लढाई सुरू झाली. पण, पिचडांनी ऐनवेळी अकोल्यात जाऊन अर्ज भरला. हे जेव्हा आम्हाला समजले तेव्हा आम्ही अकोल्यात येण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक अडथळे पार करीत अकोल्यात अर्ज दाखल करायला आलो. पण, वेळ शिल्लक राहिला नव्हता. तेव्हा मी (दशरथ सावंत) प्रथमत: पिचडांच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिलो. अगदी त्याच वेळी, त्याच ठिकाणी पंचायत समितीसमोर पिचडांना आव्हान करून त्यांच्या विरोधात बाहेर आंदोलन उभारले होते. तेव्हापासून मधुकर पिचड आणि सावंत यांच्या वैचारिक युद्धनितीचा शंख फुकला गेला.
"टोपी घालून" साहेब पुढे गेले |
मा. दशरथ सावंत सर |
त्यामुळे मी अवघ्या दोन वर्षात झेडपीचा राजिनामा देखील देऊन टाकला. कारण, काँग्रेसची काही धोरणे तेव्हा पटली होती. पण, स्थानिक पातळीचे "धुर्त राजकारण" कधीच सहन होणे शक्य नव्हते. म्हणून "पदाला आणि पक्षाला" जड होण्यापेक्षा अन्यायावर आवाज न उठविणे हाच अंतर्मनाचा आवाज मला स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून मी "राजिनामा" दिला. तो केवळ "पिचडांसारख्या व्रुत्तीमुळे". या दरम्यानच्या काळात १९८० पर्यंत मधुकर पिचड हे सभापती म्हणून ८ वर्षे कार्यरत होते. याच काळात सुवर्णसिंग काँग्रेस आणि अधिक्रुत काँग्रेस यातून राज्यात आणिबाणी लागू झाली होती. त्यानंतर १९८० ला पोटनिवडणुका झाल्या आणि यशवंत भांगरे आणि मधुकर पिचड यांच्यात राजकीय रणसंग्राम झाला व पिचड हे पहिल्यांदा आमदार झाले.====================
( क्रमश: भाग १) :- पुढील भाग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे १९ आॅगस्ट रोजी क्रमश: प्रसिद्घ केला जाईल.
महत्वाचे मुद्दे
* पिचड साहेब मंत्री कसे झाले
* पाण्याच्या प्रश्नात त्यांचा वाटा काय
* ३५ वर्षातील रोमहर्षक निवडणुका* धरणांमधील भागीदारी !
* पिचड का निवडून येत राहिले !
* आत्ताचे सोबती, कालचे दुष्मण !
* शरद पवार ते मधुकर पिचड
* अशा बर्याच अनुत्तरीत आणि अबोल प्रश्नांची माहिती.
वाचा भाग २ "रोखठोक सार्वभौम"
===================
-- सागर शिंदे
8888782010
फक्त व्हाट्सअॅप
------------------------
जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने ३३ दिवसात ७० बातम्यांच्या जोरावर ३ लाख ८८ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------