-- सागर शिंदे
भंडारदरा (प्रतिनिधी) :-
महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पुराने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभुमीवर नगरच्या प्रशासनाने चांगलीच दक्षता घेतल्याचे दिसते आहे. भंडारदरा व मुळाकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, इतक्या विपरीत
|
राहुल द्विवेदी (जिल्हाधिकारी)
|
परिस्थितीत कलेक्टर साहेब, संगमनेर व राहुरी प्रांताधिकारी, आपत्ती व्यवस्थापनचे डॉ. बडदे सर व भंडारदरा येथील अभियंते किरण देशमुख तसेच अभिजीत देशमुख मुळाचे कुलकर्णी सर यांनी दिवसरात्र एक करून ७३ गावांवर येणाऱ्या आपत्तीला तोंड दिले आहे. त्यामुळेच लाखो नागरिक स्वस्थ झोपू शकले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नक्कीच त्यांचे कौतुक केले पाहिजे. असे जनतेला वाटते. खरे पाहता अकोल्याची २० गावे, संगमनेरची १७, राहाता ६, श्रीरामपूर १२, राहुरीची २५, नेवाशाची ६ अशा ७६ गावांना "हायअलर्ट" करण्यात आले होते. त्यामुळे कधीनव्हे इतका थैमान पावसाने घातला होता. वेळीच नदिकाठच्या गावांनी दक्षता घ्यावी असे प्रशासनाने आवाहन केले आहे. तसेच आपत्ती ओढविल्यास योग्य ती सामग्री व मनुष्यबळ तयार ठेवले होते. इतक्या विपक्ष परिस्थितीत डोळ्यात तेल घालुन उभे असणाऱ्या पोलीस व महसुल प्रशासनाला खरोखर सलाम करावा तो कमीच आहे.
|
किरण देशमुख
|
कोल्हापुर, सांगली, साताऱ्यात पुराने थैमान घातले आहे. केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या आडमुठे धोरणाचे २४ बळी गेले आहे. त्या तुलनेत अकोले तालुक्यात पर्जन्याचे प्रमाण अधीक आहे. तरी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, संगमनेर प्रांताधिकारी मंगरुळे, अकोले तहसिलदार मनोज कांबळे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. बडदे, मुळा अभियंते मा. कुलकर्णी, भंडारदरा अभियंते किरण देशमुख व
|
अभिजीत देशमुख (अभियंता)
|
अभिजित देशमुख, निळवंड्याचे मनोज डोके, यांनी चांगले नियोजन केल्याचे स्पष्ट होते. वेळोवेळी नागरिकांना सावध होण्याचे आदेश देऊन लाखो क्युसेस पाणी जायकवाडीत दाखल केले. भारताच्या इतिहासात नोंद व्हावी की, बिन पाऊस पडता १०२ टिएमसी भरलेले धरण कोणते ? तर बेशक त्याचे उत्तर "जायकवाडी" असावे. त्यामुळे गंगा, गोदावरी, मुळा, प्रवरा अशा नद्यांमधून लाखो क्सुसेस पाणी एकाच वेळी जायकवाडीत गेले. ते ही कोणतीही मनुष्यहानी न होता. त्यामुळे कोल्हापुर, सागली, सातारा यांचे हाल पाहता. नक्कीच या अधिकाऱ्यांचे कौतुक करणे अनिवार्य वाटते.
|
डॉ. बडदे सर (जिल्हा आपत्ती व्य. अधिकारी)
|
भंडारदरा धरणातून २१ हजार क्युसेसने विसर्ग केला होता. तर आज १ हजार क्युसेस पाणी सुरू आहे. कालपासून पावसाची परिस्थिती निवळली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तोच कर्नाटकच्या अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडे झाल्यामुळे कोल्हापुर, सांगली, सातारा येथील पाण्याची थोप वाहती झाली आहे. त्यामुळे जीवीत हानीची संभावना मावळली आहे. मात्र, ज्या कठीण परिस्थितीत नगर जिल्ह्यातील नदीकाठच्या ७३ गावांचे संरक्षण केले. त्यांचे आभार अनिवार्य वाटते.
|
मुकेश कांबळे (तहसिलदार)
|
अतिव्रुष्टींनंतर पाण्याखाली येणारी ७३ गावे आहेत. त्यांनी येणाऱ्या काळात नेहमी अलर्ट राहणे गरजेचे आहे. कारण, :जी कधीही सांगून येत नाही" ती "आपत्ती" असते. मात्र, तिची चाहुल मानवाला नक्की असते. ज्यावर वेळीच उपोयोजना करता येईल.
|
मनोज डोके
|
"या गावांनी दक्षता घ्यावी"
भंडारदरा, रंधा खुर्द व बुद्रुक, शेलविहीर, माळेगाव, दिगंबर, चितळवेढे, निब्रळ, निळव़डे, विठे, म्हळदेवी, सावंतवाडी, इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, उंचखडक बु व खुर्द, अकोले, टाकळी, सुगाव खुर्द व बुद्रुक अशा २० गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर संगमनेर तालुक्यात दोन्ही धांदरफळ, वाडापूर, रायते, संगमनेर बु व खुर्द, जोर्वे, कणुली, दाढ, कोकणेवाडी, आश्वी, वाघापूर, शेडगाव, खराडी, मंगळापूूर कसारा दुमाला, आश्वी बु, तसेच...राहाता तालुक्यात, दाढ, हाणुमंतगाव, पाथरे, दुर्गापूर, कोल्हार भगवती तर श्रीरामपूर तालुक्यात कडीत खुर्द व बुद्रुक मांडवे, कुराणपूर, लाडगाव, भेर्डापूर, मालुंजे, खिर्डी, वागी खुर्द व बुद्रुक, वळदगाव, उंबरगाव, या गावांनी सतर्क रहावे. तर, नेवाशात पाचेगाव, चिंचबन, गोनेगाव, नेवासा खुर्द व बुद्रुक व बहिरवाडी येथील नागरिकांनी सतर्क रहावे. राहुरी तालुक्यात देखील धानोरे, सोनगाव, सात्रळ, माळे डुक्रेवाडी, कोल्हार खु, चिंचोली, दावनगाव आंबी, अंमळनेर, केसापूर, चांदेगाव, ब्राम्हणगाव, बोधेगाव, करंजगाव, मालंजे, दरडगाव, महालगाव, लाख, सांक्रापूर, गंगापूर, पिंपळगाव फुगणी, माहेगाव अशा २५ गावांना हायअलर्ट आहे.
===================
वाढदिवस
प्रमोद वाघ (PI)
=================
-- सागर शिंदे
८८८८७८२०१०
------------------------ --------
जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने २७ दिवसात ५२ बातम्यांच्या जोरावर ३ लाख ५९ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------
"सार्वभाैम संपादक
- सागर शिंदे