"आ. थोरात" आणि "ना. विखे" यांच्यात "जुगलबंदी" एकमेकांवर "सरसंधान"...


जमले ते "पाटील" साहेबांनाच ! 

संगमनेर (प्रतिनिधी) :- 
                         कोल्हापुर, सांगली, सातारा येथे पुरग्रस्तांची  घरे वाहुन गेली. त्यामुळे राज्याचे ग्रुहनिर्माणमंत्री तेथे असणे आवश्यक होते, तो एक संवेदनशिल विषय आहे. असा टोला आ. थोरात यांनी लावला. त्यावर उत्तर देत ना. राधाक्रुष्ण विखे यांनी "रोखठोक सार्वभौम" या पोर्टलच्या बातमीचा आधार घेत, थोरातांवर "सरसंधान" साधले. ते म्हणाले "दिल्लीत शिला दिक्षीतांचे निधन, आणि संगमनेरात अध्यक्षपदाचे सेलिब्रेशन" चालते का ? त्यावेळी जेवणावळी घालणाऱ्यांची संवेदनशीलता कुठे गेली होती ? अशी "जुगलबंदी" पहावयास मिळाली. संगमनेर येथे सुरू करण्यात आलेल्या "महायुतीच्या" संपर्क कार्यालयाचे तसेच माहीती सुविधा केंद्राचे उद्घाटनाप्रसंगी ना.विखे  बोलत होते. यावेळी अमोल खताळ पाटील यांच्याहस्ते माहिती कार्यालयाचे उद्धाटन करण्यात आले.

हात जोडतो साहेब, पण संगमनेरात लक्ष द्या !

            ते म्हणाले, तालुक्यात दबलेल्या जनतेचा आवाज आता रस्त्यावर आला आहे. यापुढे संचालकांच्या चिठ्या चपाट्या शासकीय कार्यालयात चालणार नाही. ही फालतू कामकाजाची पध्दत बंद करावी लागणार आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आता महायुतीचे कार्यालय हेच समन्वयाचे ठिकाण राहाणार असून, तालुक्याच्या विकासाचे प्रभावी केंद्र म्हणूनच  महायुतीच्या  कार्यालयाची ओळख निर्माण करा असे आवाहन गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे यांनी केले.  यावेळी राज्यात नैसर्गिक आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहाण्यात आली. तसेच औपचारीकता म्हणून देखील कोणताही सत्कार न स्विकारता ना.विखे यांनी महायुतीच्या कार्यालयाची भूमिका स्पष्ट केली. थोरातांवर कडक शब्दात टिका करताना ते म्हणाले; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शिला दिक्षीत यांचे निधन झाल्यानंतर संस्थेमध्ये भोजनाच्या पंगती घालणाऱ्यांनी आम्हाला संवेदनशीलता शिकवू नये. सोशल मिडीयावरून करण्यात आलेल्या टिकेला विखे यांनी उत्तर दिले. पूरग्रस्तांना प्रवरा मेडीकल ट्रस्ट आणि डाॅ. विखे पाटील फौंडेशनच्या वतीने कोल्हापूर सांगली सातारा येथे मदत म्हणून डाॅक्टरांचे मदत पथक तसेच औषध पाठविले आहे. याचा डामडौल आम्ही केला नाही. काहींचे मदत कार्य फक्त फोटोसाठी सुरू असल्याची टिका त्यांनी केली. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मदतफेरी काढून मदत पाठविण्याचे आवाहन विखे यांनी केले.

"आली रे आली, आता तुमची बारी आली"..



           निळवंडेच्या नावाखाली अनेक वर्षे लोकांना झुलवत ठेवले. पण हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सोडविला. मागच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील जलसिंचन प्रकल्पाला १५ हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आलेल्या निधीत बाराशे कोटी रूपये निळवंडे धरणासाठी दिले आहेत. याकडे लक्ष वेधून विखे पाटील म्हणाले की, अनेक वर्षे तालुका दुष्काळी ठेवण्यातच यांना रस आहे. दुष्काळाचे माॅडेल म्हणून संगमनेरला पुढे आणणार्याचे माॅडेलही आता कालबाह्य झाले असल्याचे विखे म्हणाले.

थोरातांच्या "बालेकिल्यात" विखेंचे हात उंचावले

          तालुक्यातील सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आपण १९ तारखेला "जनता दरबार" घेणार असून यापुढे दिलेल्या कालावधीतच काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. यापुढे शासकीय कार्यालयात संचालकांच्या चिठ्ठ्यांनी काम चालणार नाहीत. जनतेची सहनशिलता संपली असल्यानेच गावोगावची जनता आता रस्त्यावर आहे. असे विखे म्हणाले. 

शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यात आलेली मोफत अपघात योजना संगमनेर तालुक्यात सुरू करणार आहे. प्रत्येक गावात शासन आपल्या दारी या उपक्रमातून रेशन कार्ड तसेच विविध शासकीय योजनाची अमंलबजावणी महायुतीच्या कार्यालयातून करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.
 =====================

         --  सुशांत पावसे

            (संगमनेर प्रतिनिधी)
=====================

         -- सागर शिंदे

----------------------  -------------------


         जाहिर आभार
             ----------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  २७ दिवसात  ५६ बातम्यांच्या जोरावर  ३ लाख ६० हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                          आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

           

                        - सागर शिंदे