"आमदार" नसलेला "अकोले तालुका", "एक्झिट पोलने" डॉ. लहामटे केले "आमदार"
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोले तालुक्याच्या "रखडलेल्या विकासामुळे" आमदार 'वैभव पिचड' यांनी "आमदारकीचा राजिनामा दिला" आहे. आता ते पिताश्रीं प्रमाणे "माजी आमदार" झाले असून अकोले तालुका "विधानसभेच्या प्रतिनिधीत्वापासून बेवारस" झाला आहे. तर दुसरीकडे डॉ. किरण लहामटे यांनी तालुक्यात "माती तेथे पाऊल" अशी "पायपीट" सुरू केल्यामुळे तरुण वर्गाचा त्यांना चांगलाच पाठींबा मिळत आहे. इतकेच काय तर 'सोशल मीडियावर' एक
"एक्झिट फोल" घेण्यात आला. त्यात ५० ते ६० टक्यांनी डॉ. लहामटे यांना "कौल" मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियाने जणू त्यांना "आमदारकी बहाल" केली आहे. असा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. आता वैभव पिचड देखील "प्रचाराच्या रिंगणात" उतरले आहेत. खुद्द सौ. सुनिता भांगरे यांनी देखील "मैदानात उडी" घेतली आहे. सतिष भांगरे आणि मारुती मेंगाळ हे "पक्षाच्या युती निर्णयाच्या प्रतिक्षेत" आहे. त्यामुळे काल परवाच "बाजार तळावर जागतिक आदिवासी दिन" म्हणून "घसे फाडून" ज्यांनी भाषणे केली. तेच आज "प्रचाराच्या मैदानात" दिसू लागले आहे. त्यामुळे या "निवडणुकीत रंगत येणार" यात शंका नाही.
"निवडणुकीच्या तोंडावर" वैभव पिचड यांचा भाजपात प्रवेश झाल. त्यांनी कायदेशीर "राजिनामा" देखील दिला आहे. त्यामुळे सद्या ते माजी आमदारांच्या रांगेत बसले आहे. म्हणून अकोले आमदार हिन तालुका असल्याची बोचरी टिका तरुणांकडून सोशल मीडियावर होत आहे. असे असले तरी उद्याच्या आमदारकीला चांगली चुरस पहावयास मिळणार आहे. कारण, मधुकर पिचड यांनी थेट शरद पवारांच्या विश्वासाला तडा दिला आहे. त्यामुळे दगाबाजी करणाऱ्यांचे काय होते, हे श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते याचे उदाहरण पिढ्यान् पिढ्या इतिहास विसरणार नाही. तोच "पॅटर्ण" अकोल्यात राबविणार असल्याच्या "व्युहरचना" सुरू आहे. तर दुसरूकडे अजित दादा म्हणतात, मी जर ठरवलं तर पिचडांना निवडून येऊ देणार नाही. या बुजूर्ग मैत्रीत घात झाल्यामुळे पवारांनी थेट विश्वासू मानसं अकोल्यात पाठवून डॉ. किरण लहामटे यांना मुंबईला आणण्याचे आदेश दिले. भाजपशी एकनिष्ठ असणाऱ्या लहामटे यांच्या डोक्यावर हात ठेवून कामाला लागा असे ठणकावून सांगितले. जसे, जिजामाता तान्हाजीला लढ म्हणाल्या आणि मालुसरेंनी "कोंढाणा सर केला. त्यांच्यात जनू १० हात्तीचे बळ आले होते. तसेच बळ लहामटे यांच्यात दिसून येत आहे. जाणत्या राज्याने त्यांना लढ म्हटले आणि "टिटावळा ते पठारभाग" असा "मतदार तेथे मी" हा फंडा आमलात आणला आहे.
-------------------------------
जाहिर आभार
----------------------------------

आता कालच अकोल्याच्या बाजार तळावर "जागतीक आदिवासी दिन" साजरा झाला. तेथे अशाकाही भाषणांच्या तोफा कडाडल्या की, वाटले पिचडांचा पराभव शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर यांच्याकडून लिहुन घ्यावा. मात्र, ९ तारीख उलटून दोन दिवस झाले नाही. तोच भांगरे यांनी मोर्चेबांधनी सुरू केली. आणि पक्षाने विचार केला नाही. तर, आम्ही वेगळा विचार करू, असे भाकीत केले. त्यामुळे आता नवे काय सांगायचे. त्या अपक्ष राहिल्या काय अन भांगरे साहेब राहिले काय ! एकच. त्यामुळे वैभव पिचड आजच आमदार झाले हे जगजाहीर. अर्थात व्यासपिठावर मारुती मेंगाळ यांच्यासारखा नवखा तरुण आत्मियतेने वक्तव्य करतो. तळमळीचे व एकीचे बोल समाज्यापर्यंत पोहचविण्याचे काम करतो. मात्र, या मुरब्बी धरणांचे पाणी कधीच खळखळत नाही. तर, फक्त आतून पाझरत असतं. किती घसा फाडला मेंगाळ यांनी, आणि किती आटोपते घेतले भांगरे साहेबांनी. हे गणित ज्यांना तेथेच उलगडले नाही. त्यांनी राजकारण सोडून द्यावे. अशी चर्चा जाणकार राजकारण्यांची सुरूच होती. तोच "एकास एक" चा नारा देणारे आज वेगळेपणाच्या भुमिका मांडू लागले आहेत. हेच काय, जर राष्ट्रवादीने डॉ. लहामटे यांना टाळलेच तर ते देखील सर्व वचने झुगारून मैदानात उतरतील. त्यामुळे एकी वैगरे म्हणजे "बोलाचा भात आणि बोलाचीच कढी" हेच वास्तव आहे.आता सतिष भांगरे यांनी तिकीटासाठी शिवसेना सोडून राष्ट्रवादीची मशाल घेणे पसंत केले होते. त्यासाठी त्यांनी पवारांची भेटही घेतल्याचे माध्यमांतून जगजाहिर झाले. तो चान्स हुकल्याने ते सद्या मातोश्रीवरुन युतीचा काय निर्णय होतोय याकडे लक्ष ठेऊन आहे. त्यांच्या पाठोपाठ तळपाडे व मेंगाळ यांचीही गोची झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे युती झाली तर अपक्ष म्हणून सौ. भांगरे यांचा अर्ज प्रामुख्याने पुढे राहिल. तो ही ना. विखे यांच्याकडून काही अश्वासन मिळत नाही तोवर उमेदवारी मैदानात राहिल. असे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे अकोले विधानसभा ही चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. बाजारतळावरील एकीचे बळ कुठवर टिकते आहे. हेच पाहणे मतदारांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
-------------------------------
-- सागर शिंदे
------------------------ --------जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने २५ दिवसात ५२ बातम्यांच्या जोरावर ३ लाख ५४ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------