"ना. विखे" व "आ. थोरातांकडून "नात्यांचे केंद्रीकरण व "कार्यकर्त्यांचे विकेद्रीकरण"..
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
देशाच्या राजकारणाला पुर्वापार "घराणेशाहीचा काळींबा" लागलेला आहे. तोच "फंडा" महाराष्ट्रात अगदी "पिढीजात कटाक्षाने" पाळला जातो. अर्थात त्याचे "उगमस्थान काँग्रेस" आहे. त्याचा "वारसा" घेऊनच आ. "बाळासाहेब थोरात आणि ना. विखे पाटील या काँग्रेसी नेत्यांनी" चालविल्याचे दिसून येते. स्पष्टच सांगायचे झाले तर डॉ. विखे "खासदार", ना. विखे "ग्रुहनिर्माण मंत्री" तर साै विखे "मिनी मुख्यमंत्री" (झेडपी अध्यक्षा) त्यामुळे "नेते व कार्यकर्त्यांचे विकेंद्रीकरण" व "कुटुंबाचे केंद्रीकरण" करुन हे कुटूंब "सत्तेचे बादशाह" झाले आहे. तर दुसरीकडे "आ. थोरात" साहेब महाराष्ट्र "काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, "डॉ. सुधिर तांबे आमदार " तर "सत्यजित तांबे काँग्रेसचे युवकाध्यक्ष" तर "दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष" वरून काही दिवसांपुर्वी "डॉ. तांबे यांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष" करायचा विचार सुरू होता. मात्र, "घराणेशाहीवर" काही "विश्लेषकांनी" ताशेरे आढल्यानंतर त्यावर पडदा पडला. आता "थोरातांना विरोधक म्हणून, शालिनताई विखे" तर "ना. विखेंना विरोधक, सत्यजित" असे बोलले जाते. त्यामुळे दोन्ही बड्या नेत्यांनी "नात्यांचे केंद्रीकरण" करून नेते व कार्यकर्त्यांचे विकेंद्रीकरण केल्याचा आरोप जनतेकडून होऊ लागला आहे.
नगरला पडलो होतो, आता तिकडे..! |
"बड्या बड्या" नेत्यांकडून आता "हावरेपणाचे राजकारण" सुरू आहे. गावातील "ग्रामपंचात" ते "संसदेची खासदारकी"पर्यंत जे "हवे ते आपल्याच कुटुंबात" आले पाहिजे अशी "टेंडन्सी" प्रस्तापित नेत्यांची झाली आहे. त्यामुळे "बहुजन समाजास, "शासनकर्ती जमात" व्हायला "संधीच" मिळेनासी झाली आहे. ही परंपरा कोठेतरी बदलली पाहिजे. नाहीतर "इंग्रज आणि पेशवाई" काळासारखी "गुलामी" बहुजनांना पिढ्यान् पिढ्या सहन करावी लागणार आहे. जशी आजवर गांधी घराण्याची आपण पहात आला आहे. म्हणून तर ना. विखे साहेबांना शह देण्यासाठी थोरात घराण्याचे सत्यजित तांबे यांचे नाव पुढे आले.
तर बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी शालीनीताई विखेंचे नाव पुढे आले. ही घराणेशाहीची मक्तेदारी खूप दिवस चालत नाही. याचा धडा काँग्रेसने घेतला आहे. अखेर सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधींना अध्यक्षपदाचा राजिनामा द्यावा लागला. त्यामुळे हा अतिरेक चांगला नाही. तुम्ही रगेल आणि दंडेलशाहीने राजकारण करू शकता. खिशातील पैसा, संस्था, सहकार आणि प्रशासनाच्या जोरावर पण या हुकूमशाहीत नैतिकतेचा वलय निर्माण होत नाही. लोक तोडावर तुम्हाला मुजरा करून गोड बोलतील आणि मागेपुढे निंदा नालस्ती करतील. म्हणून असल्या राजकारणाचा अंत कधीच चांगला नसतो. राजकारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजकारण म्हणजे यशवंतराव चव्हाण, राजकारण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी अशी कित्तेक नावे घ्यावीत. !

हॅलो..!कोणाला द्यायचं मग तिकीट ? |
तांबे साहेब आक्रमक होतात तेव्हा... |
------------------------------------
जाहिर आभार
------------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने १५ दिवसात ४० बातम्यांच्या जोरावर २ लाख ३७ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे. नकळत निर्भिड पणातून कोणाचे मन दुखविले तर क्षमा असावी.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------