...अखेर "फडणवीसांकडून" पिचडांना "सज्जनतेचे शुद्धीपत्र", मुंबईत "भाजप प्रवेश"; "मंत्रीपदाचा मार्ग" मोकळा...

अकोले (प्रतिनिधी) :-
                  अकोले तालुक्याचा विकास करण्याच्या मुद्द्यावर वैभव पिचड आणि मधुकर पिचड यांनी भाजपची मशाल हाती घेतली. पिचड म्हणजे सज्जन व्यक्तीमत्व, असे शब्द बाहेर पडले आणि त्यांच्यावर असणाऱ्या सगळ्या आरोपांवर शुद्धीपत्र शिंपडले गेले. असे बोल विरोधकांकडून येऊ लागले आहे. काही झाले तरी या प्रवेशाने भाजपला नवे अदिवासी मंत्री मिळाले असे म्हटल्यास वावघे ठरणार नाही.
                    प्रवेशानंतर वैभव पिचड म्हणाले की;  अकोल्याचा विकास करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. अकोल्याचे प्रश्न मांडताना विरोधी पक्षात राहुन खूप अडचणींना सामोरे जावे लागले. अकोल्याच्या विकासासाठी मला पर्याय नव्हता. मी केवळ आमदार होणे अपेक्षीत नाही, तर जनतेची कामे महत्वाची आहे. जर जनतेला न्याय मिळत नसेल तर मी आमदार असून तरी उपयोग काय ?. मला मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला तेव्हा माझे पहिले साकडे होते की; मुख्यमंत्री महोदय मी भाजपात येतो. मात्र, माझ्या अकोल्याच्या जनतेचे सर्व प्रश्न सोडवत असाल तरच मी आपल्या पक्षात येतो. त्यांनी शब्द दिल्यानंतर मी भाजपत जाण्याचा निर्णय घेतल. पर्यटण, पाणी, बंधारे, रोजगार, शिक्षण, वीज, एमआयडीसी असे अनेक प्रश्न सोडविण्याचे अश्वासन फडणविस साहेब, गिरीश महाजन, ना. विखे पाटील यांनी दिले आहे.

मंत्रीपदाचे लक्षात राहुद्या; कानपिचक्या..!

        या सरकारने मराठा समाज्यास आरक्षण दिले. एकंदरीत भाजपने जनतेचा काैल पाहून आणि त्यांच्या कार्याची पद्धत पाहता आपण भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, ना. राधाक्रुष्ण विखे, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, गिरीश महाजन अशा अनेकांचे मी आभार.
       दरम्यान भाजपचे अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे यानी कालच पिचड यांच्यावर अनेक आरोप करीत अकोले तहसिलवर मोर्चा काढला होता. त्याचा सरकारवर काही एक फरक झाला नाही. हेच यातून सिद्ध झाले असूून पिचड साहेब सज्जन असल्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिले आहे. त्यामुळे डॉ. लहामटे, भांगरे व तळपाडे साहेब यांनी जे जात प्रमाणपत्र बाहेर काढले ते खरे की खोटे हे "आॅन द रेकॉर्ड" नव्याने सांगायला नको.
 यावेळी भाजपात  संदिप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर, वैभव पिचड, चित्रा वाघ यांनी पक्षप्रवेश केला. हा कार्यक्रम मुंबईतील "गरवारे क्लब" येथे पार पडला. यावेळी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनंगटीवार, ना. राधाकृष्ण विखे, विनोद तावडे यांच्यासह भाजपाचे अन्य नेते उपस्थित होते.
------------------------------------
         जाहिर आभार
------------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने १५ दिवसात  ४१ बातम्यांच्या जोरावर २ लाख ३८ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे. नकळत निर्भिड पणातून कोणाचे मन दुखविले तर क्षमा असावी.  
                          ---धन्यवाद ---
                              आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

             

            - सागर शिंदे