"पिचड साहेब"..! "नगरसेवकांची तोंडे आवरा"; "मक्तेदारीतून सुप्त लाट" वाढते आहे.
अकोले (प्रतिनीधी) :-
सरकारने "ग्रामपंचायतीचे" रुपांतर "नगरपंचायतीत" केले आणि विकासाऐवजी शहराला खऱ्या अर्थाने "उतरत्या कळा लागल्या". हे रुपांतर शहराच्या विकासासाठी केले जाते हे नव्याने निवडून दिलेल्या नगरसेवक नावाच्या काही "बुजगावण्यांना" समजलेच नाही. त्यामुळे "शहरे विकसित नाही, तर भकास" झाल्याचे चित्र दिसत आहे. आरोग्य, शिक्षण, शुद्ध पाणी, सार्वजानिक ठिकाणे, गटारी, स्वच्छता हे सर्व मुद्दे वारंवार ऐरणीवर येत राहिले. मात्र, आलेला निधी निवडणुक खर्चातून लुटायचा कसा. यावरच अनेकांनी डोळा ठेवला आणि जनतेची लुट सुरू केली. मात्र, एखाद्या प्रश्नावर जाब विचारला. तर, सत्तेचा माज असल्यासारखी उत्तरे द्यायची, आम्ही तुम्हाला उत्तरे द्यायला "तुम्ही काय न्यायधिश आहेत काय"? असे "शब्दप्रयोग" फेकून मारायचे. त्यामुळे खरी "मक्तेदारी" ही स्थानिक आमदारांपासून उभी राहते. ती, मोडीत काढली पाहिजे. तेव्हाच असले लोकप्रतिनिधी "शासन दरबारी" निवडून जाणार नाहीत. जेव्हा "गरिबी आणि सामान्य जनतेच्या मुलभूत गरजांची जाणिव" असणारा माणूस तेथे निर्वाचीत होऊन जाईल. तेव्हाच खरा विकास होईल. हेच "लोकशाहीचे तत्व आहे". नाहीतर "धनबलाढ्य आणि मुजोर" मानसाला जर निवडून दिले तर तो "उपकार आणि हुकूमशाहीची" भाषा करताना दिसून येईल. म्हणून प्रत्येक ठिकाणी "लोकमान्य प्रतिनिधी" असला पाहिजे. अन्यथा ही "मुजोरी स्थानिक सत्ताकेंद्राला मारक ठरते", असेच काहीसे "अकोल्यातील नगरपंचायतीत" दिसून येत आहे. उद्या "विधानसभेच्या निवडणुका" तोंडावर आल्याअसून "काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या मुजोरीपणावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे". ही नाराजी पिचड साहेब आमदार होण्यासाठी तारक नाही तर मारक ठरेल. हे त्यांना समजले तर बरे !, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
अकोले नगरपंचायतीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची सोय राहिली नाही. "हम करे सो कायदा" असेच काहीसे प्रकार पुढे येऊ लागले आहे. जर एखाद्या प्रभागात घोटाळा आढळला तर त्यावर आवाज उठविण्याची हिम्मत कोणी करायला नको असली हुकूमशाही सुरू आहे. त्यामुळे आपण अकोल्यात राहतो की, "हिटलरच्या जर्मनीत" हेच कळायला तयार नाही. "नागरिकांना शुद्ध पाणी का मिळत नाही" ? असे विचारले असता "तू कोण न्यायधिश आहे का" ? पाणी शुद्धच आहे. असली "मुजोरी उत्तरे" समोर येतात. त्यामुळे खरच पाणी शुद्ध आहे का ? तेथे जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वीत आहे का ?, टाक्या किती दिवसांनी शुद्ध केल्या जातात, तेथे "सामान्य व्यक्तीस जाण्यास प्रशासनाने मज्जाव" का केला आहे. अशा अनेक प्रश्नांची पोलखोल करण्यात आली आहे. "खोटं बाेलावं पण रेटून", ही निती योग्य नाही. मात्र, पाणी शुद्ध असल्याचा दावा करणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखविले पाहिजे. तर नगरपंचायतीत कर्मचारी भरतीपासून तर एलएडी, पाईपलाईन, शिडी, टाॅयलेट असे अन्य घोटाळे झाल्याचे बोलले जाते. मात्र, प्रस्तापितांनी ते दाबले आहेत. त्यामुळे यावर प्रकाश पडला तर ना आमदार उभे राहतील ना नगरसेवक निवडून येतील. म्हणून पिचड साहेबांनी नगरसेवकांना तोंड आवरायला सांगितले पाहिजे. नाहीतर आपल्या विरोधात व्हिडिओवर पुरावे दाखविणारा "लावा रे तो व्हिडिओ" असे म्हणणारा राज ठाकरे अकोल्यात उदयास येऊ शकतो. हे विसरता कामा नये. किंवा "लहामटे आणि राष्ट्रवादीची सुप्त लाट" अधिक प्रबळ होऊन आपला पराभव व्हायला नकाे. या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. हेच नागरिकांचे म्हणणे आहे.
नगरपंचायतीला वैभव पिचड यांना जनतेने "मोदी लाटेसारखी, एकहाती सत्ता बहाल केली". राज्यात जसा काँग्रेसचा एक खासदार आला तसा अकोल्यात भाजपचा एकच नगरसेवक निवडून आणता आला. मात्र, शिवसेना व भाजप वगळता १७ नगरसेवक जनतेने आपल्या पदरात टाकले. पण, त्यांच्याकडून काय कामे झाली हे उकरायला लागले ते गौणखनिजासारखे बाहेर येईल. विकास कामे सोडून "सावकारकी" केल्यासारखा यांचा थाट आहे. "राष्ट्रवादी सत्तेत नाही म्हणून अकोल्याचा विकास झाला नाही". असे, तुम्ही जनतेसमोर सादर करून मोकळे झालात. पण, विकास नाही झाला म्हणून कोणी नाराज असल्याचे तुरळक मानसे तुम्हाला पहावयास मिळेल. मात्र तुमच्या "मुजोरी नेत्यांच्या तोंडाला लगाम घातला तरी पुरे" झाले. कारण, अकोले तालुक्यात जनतेने व्यक्तीनिष्ठ प्रेम तुमच्यावर केले आहे. पक्षावर नाही. म्हणून यापुर्वी देखील "ठराविक तरुणांची "मक्तेदारी" तुम्हाला "तारक" नाही तर "मारक" ठरेल" या मथळ्याखाली आम्ही लेख लिहीला होता. त्याचे "सकारात्मक पडसाद" आम्ही पाहिले. आता तुमच्या ठराविक "नगरसेवकांच्या मुसक्या आवळा" नाहीतर ही जनता उद्याच्या विधानसभेला योग्य तो मार्ग निवडेल. कालचे "प्रबळ काँग्रेस" आज "भुईसपाट झाले". त्यामुळे "संयम मोठा बलवान असतो" याचे प्रशिक्षण नेत्यांना दिले पाहिजे. असे आम जनतेला वाटते आहे.
शहर हे तालुक्याचा चेहरा असतो. तो विद्रुप करण्यासाठी कोण-कोणी कसे काम केले आहे. याचा उहापोह जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न या मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे.वाचा "रोखठोक सार्वभाैम"
(क्रमश: भाग १) साहेबांच्या आशिर्वादाने २० हजार जनता पीते "बेशुद्ध नगरपंचायतचे, अशुद्ध पाणी"
------------------------------------
जाहिर आभार
------------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने १५ दिवसात 36 बातम्यांच्या जोरावर २ लाख 32 हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश आहे. नकळत निर्भिड पणातून कोणाचे मन दुखविले तर क्षमा असावी.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------