संगमनेर (प्रतिनिधी) :-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेत्रुत्व काैशल्याची "किव करावी की कौतुक" काहीच कळत नाही. काल काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी ज्यांचे नाव चर्चेत होेते. ते व्यक्तीमत्व आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शिला दिक्षित यांचे दिल्लीत नुकतेच निधन झाल्याचे समजूनही संगमनेरमध्ये राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या निवडीचे सेलिब्रेशन करतात. आणि दुसरीकडे भाजप सारखा कट्टर विरोधीपक्ष दिल्लीतील सर्व कार्यक्रम रद्द करून दोन दिवसांचा दुखवटा जाहिर करताे. सांगा अशी विचारसारणी असेल तर अशा नेत्रुत्वाखाली राज्यात काँग्रेस पुन्हा पुढील पंन्नास वर्षे तरी सत्तेत येईल का ? हा जनतेचा थेट सवाल आहे.
|
आनंद व्यक्त करताना |
दिल्लीत १९९८ ते २०१३ आशा १५ वर्षाच्या काळात "शिला दिक्षित" या काँग्रेसच्या "मुख्यमंत्री" होत्या. त्यांचे आज शनिवार दि. 20 जुलै २०१९ रोजी निधन झाले. खरंतर काँग्रेसच्या पडत्या काळात अशा ज्येष्ठ व्यक्तींचे जाणे म्हणजे काळजाला चटका लावून जाणे आहे. असे गांधी परिवार म्हणतात. तर सगळी काँग्रेस हा "दुखवटा" पाळून नि:शब्द आहे. अशातच आमचे संगमनेरचे आमदार मोहदय थोरात साहेब "स्नेहसंमलन" आयोजित करून आपल्या निवडीचा आनंद साजरा करीत आहेत. हे तेच साहेब आहेत. ज्यावेळी राहुल गांधी यांनी लोकसभेचा पराभव स्विकारुन काँग्रेस अध्यक्षपदाचा राजिनामा दिला होता. पक्ष नको म्हणत असतानाही त्यानी नैतिक जबाबदारी स्विकारली. अशावेळी पक्षाध्यक्षच्या शोधात असताना महाराष्ट्रातून सुशिलकुमार शिंदे आणि आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव चर्चेत होेते. ते मिळाले नाही हा भाग वेगळा. पण, त्यांच्याकडे पक्षश्रेष्ठी किती "आदराने व जबाबदारी" तसेच "सर्वसमावेशक" व्यक्तीमत्व म्हणून पाहतात. त्यामुळे राहुल गांधी संगमनेरात सभा घेतात अन् "मुक्काम" करतात. मात्र, त्याच्या विचारांचा हा "भ्रमनिराश" होणारा हा उपक्रम पाहुन तुम्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल.
|
स्वागतोत्सुक समुदाय |
थोरात साहेब CWC काँग्रेसचे (काँग्रेस वर्कींग कमिटी) चे कायमस्वरूपी राष्ट्रीय सदस्य आहेत, तसेच
अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीचे कायम निमंत्रित सदस्य असून त्याच बरोबर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आणि विधी मंडळात गटनेते पदी विराजमान आहेत. या निवडींचे सेलिब्रेशन तर झालेच पाहिजे. कारण, संगमनेरकरांसाठी ती एक अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, घरात एक ज्येष्ठ कर्ता व्यक्ती मयत झाला असताना तुम्ही "बोहल्यावर चढायची घाई, करूच कशी शकता". हे नैतिकतेला धरून नाहीच. उलटपक्षी ज्या भाजपनं काँग्रेस नामशेष करायची स्वप्न पाहिली आहे. त्यांनी नैतिकता बाळगली. मानुसकीच्या नात्याने त्यांनी दिल्लीतील सर्व कार्यक्रम रद्द केेले व "दोन दिवसांचा दुखवटा" जाहिर केला आहे. "कोण आपलं आणि कोण परकं" हेच कळायला तयार नाही. "भाजपच्या या निर्णयाला सलाम ठोकावा लागेल".
|
सार्वभाैमचे विनम्र अभिवादन |
"मेल्यानंतर वैर संपतं हे जिवंत उदाहरण आहे". मात्र, काँग्रेसमध्ये जर अशीच विचारसारणी राहिली तर आम्हाला तरी वाटत नाही, महाराष्ट्रात अजून तरी "पंन्नास वर्षे काँग्रेसची सत्ता येईल". कारण, सगळ्या गोष्टींत बळ, पैसा, दडपशाही चालत नसते. तर काही भावनिक मुद्द्यांवर देखील राजकारण चालते. हे काँग्रेस नेत्यांना कधी कळणार. मोदीजींनी "पुलवामा" मुद्दा चालवून पुन्हा देशावर राज्य केलं. तर, अॅड. प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव पुढे करून वंचितच्या माध्यमातून सगळी काँग्रेस संपविली. हे भावनिकता जपायचे व भांडवल करायचे धडे घेणार तरी केव्हा ? विशेष म्हणजे हा लेख कोणाला विरोध नाही. तर "वास्तवाची जाणिव" करून देणारा असून "सामान्य जनतेला काय वाटते हा आवाज आहे". बाकी कोणी काय बोध घ्यायचा हे ज्याच्यात्याच्या वैचारिक पातळीवर अवलंबून आहे.
---------------------------
सुशांत पावसे
सागर शिंदे