"पोलीस निरीक्षकांची कामगिरी; दारुड्या झाला माळकरी"
नाशिक (प्रतिनिधी)
जरावेळ झाला. तो व्यक्ती थांबूनच होता. साहेबांनी त्याला आपल्या जवळ घेतले. गळ्यात हात टाकून त्याची समज काढली. रोज घाम गाळायचा, त्याचा मोबदला घ्यायचा आणि त्या बदल्यात पाण्यासारखी दारू विकत घ्यायची जी आपला संसार उध्वस्त करते. सांग माऊली कितपत योग्य वाटतं हे. ! असे एक ना अनेक शब्दांचे वार करून त्याच्या मनाला वारकरी बनविण्याचा प्रयत्न केला. पण, दारुड्याला समजून सांगणे म्हणजे, "नळी फुकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे" अशीच गत होते. पण तरी साहेबांनी हार मानली नाही. दारु आरोग्यास कशी हनिकारक आहे हे त्यांनी पटवून दिले. पैशाचा अपव्यय कसा होतो याचा हिशोब मांडला, उभे आयुष्य कसे खर्ची पडते याची गोळाबेरीज समोर ठेवली आणि त्यांचे समुपदेशन केले.
चक्क आज तो व्यक्ती दारुपासून अलिप्त आहे. त्याच्या घरात होणारा वाद कायमचा बंद झाला आहे. दोन रुपयांचा कामधंदा छान चालू आहे. आणि आनंदाची बातमी अशी की, त्या व्यक्तीने एकादशीच्या दिवशी व्यसन न करण्याचा निर्णय घेतला. इतकेच काय तर त्यांनी मटन, मासे व अन्य मांसाहार बंद केला आहे. आणि एकादशीच्या मुहुर्तावर पोलीस अधिकारी साहेबांच्या हातून तुळशीची माळ गळ्यात परिधान केली आहे.
"वाल्याचा वाल्मिकी" झाल्याचे तुम्ही रामायनात एकले असेल. पण, जर एखादा व्यक्ती उच्च पदावर असेल आणि लोक त्यांना आदर्श मानत असेल त्यांनी या मोठेपणाचा फायदा असे "समाज प्रबोधन, समाज प्रेरणा" यासाठी केला पाहिजे. जसे विश्वास नागरे पाटील करतात. खरेतर या जगाला खरच युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे. शासन नको, प्रशासनाने माणूस होऊन जगलं तर मानसं खरच माणूस म्हणून जगतील.
आज एक कुटुंब आपण उभे केले साहेब आपले मनस्वि आभार. लोक दगडात देव शोधतात आणि आम्ही असे कर्तव्यदक्ष अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बजरंग चाैघुले साहेब (नांदगाव पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण) यांच्यात देव शोधतो.
ज्या व्यक्तीने खाणकाम करून दगडी फोडून शिक्षण पुर्ण केले. ज्यानी कारगिल आणि श्रीलंके विरुद्ध झालेल्य युद्धात सहभाग घेतला, रिटायर होऊन पुन्हा पीएसआय झाले अशा संघर्षमय देशभक्ताला मनस्वी सलाम...
--------------------------
एस. एस. शिंदे