"निंदकाचे घर, असावे शेजारी" आ.थोरात अन् खा. विखेंची विमान वारी
संगमनेर (प्रतिनिधी) :-
दोन कट्टर राजकीय विरोधक कधीच अंतर्गत दुष्मण नसतात, भिडतो तो फक्त कार्यकर्ता हा राजकारणाला लागलेला वसा आहे. कितीही कट्टर विरोधक असले तरी ते कोणत्या ना कोणत्या कारणातून एक होतातच. हे आज दि.१५ जुलै २०१९ रोजी शिर्डी विमानतळावर पहावयास मिळाले. कालवर राजकीय आखाड्यात एकमेकांसमोर मांडी थोपटणारे आज दिल्लीला जाताना मांडिली मांडी लावून बसल्याचे सर्व जनतेने पाहिले. अपघाती का होईना. पण, "निंदकाचे घर, असावे शेजारी" अशीच म्हण तोंडातून नकळत बाहेर पडते.
लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखेंना नगर दक्षिण जागेची उमेदवारी मिळावी यासाठी ना. विखेंनी प्रचंड ताकद पणाला लावली, त्यात आ. बाळासाहेब थोरात यशस्वी झाले. शेवटी बंड करीत डॉक्टर थेट भाजपात गेले आणि आ. थोरातांच्या नाकावर टिचून दिल्ली दरबारी जायला त्यांच्या शेजारीच विमानाचे शिट प्राप्त केले. ही राजकीय उलथापालथ आता कोणाला नवी नाही. उद्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरातांना सर्वात मोठे आव्हान विखे कुटुंबियांचे असणार आहे. त्यावर मात करायची कशी असा विचार थोरातांना पडत असावा. एकीकडे मोदी लाट, त्यात लोकसभेला सहा हजार मतांची पिछाडी, स्थानिक नेत्यांंची बंडखोरी आणि विखेंचे संगमनेरमध्ये वाढते प्रस्त त्यामुळे येणारी आमदारकी वाटते तितकी सोपी नाही. थोरातांना काँग्रेसने साफसुथरा चेहरा म्हणून पुढे केले खरे, पण ते टिकविताना नाकिनव येणार आहे. नाहीतर अपराजित थोरात उद्या अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांच्याच रांगेत येऊन बसतील.
हॅप्पी जर्णी |
अर्थात हा अपघातीत प्रवास आहे. अनियोजित भेट आहे. त्यांनी एकमेकांच्या कितीही गळ्यात गळा घातला तरी मन कुलूपित झाले आहे. त्याचा कितीही अभिषेख घातला तरी ते शुद्ध होईल असे वाटत नाही. पण, या विमान वारीनंतर अनेक तर्क वितर्क माध्यमांमध्ये लावली जातील. कदाचित आ. थोरात भाजपात जातील का ? त्यांना भाजपकडून काही आॅफर आली आहे का ? अशा अनेक बावड्या उठतील. पण, शांत, संयमी व एकनिष्ठ व्यक्तीमत्व म्हणून थोरात यांची देशाला ओळख आहे. मंत्रीपद किंवा कोणत्याही हव्यासापोटी ते राहुल गांधींचा "हात" कधी सोडणार नाही. असे मत कार्यकर्त्यांचे आहे. आता उद्या प्रतिक्षा राहिल ती फक्त दोघांच्या येण्याची. मग दुसऱ्याच राजकीय चर्चेला उधान असेल. यात शंका नाही. करूया वेटींग विमान लँण्ड होण्याची...
-------------------
सुशांत पावसे
s.s. shinde