'पंढरीत' अवतरले "गाडगे बाबांचे हात", 'चंद्रभागेने' नेसला "स्वच्छतेचा शालू"

    अहमदनगर (प्रतिनिधी) :-
           काल गाडगेबाबांची प्रखरतेने आठवण झाली. आयुष्यभर पंढरपुरात जाणारा हा वारकरी कधीच विठोबाच्या चरणी लीन झाला नाही.  त्यांना सहज कोणीतरी विचारले, बाबा तुम्ही मंदीरात का जात नाही, तेव्हा ते म्हणाले, तोह्या देव त्या दगडाच्या मंदीरात बसलाय, माझा पांडूरंग या पंढरीच्या सफाईत आहे. लोक आषाढी एकादशीला यायचे अन नको तशी घान करून जायचे. बाबा आख्खी पंढरी साफ करून विठोबाचे निरोप घ्यायचे. लेकाहो, देव कर्मात शोधा, जे लोक देवाची मायभूमी घान करतात त्यांची मने तरी कशी निर्मळ असणार. !  या लाखो वारकर्यांच्या मनावरचा मैला दुर करण्याचे काम माझ्या गाडगेबाबांनी केले.
         आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून  नगरच्या तरुणांनी पंढरपुरध्ये जाऊन चंद्रभागेची व मंदिर परिसराची स्वच्छता केली. लोक म्हणतात एकादस झाल्यावर काय उपयोग दर्शनाचा.  आणि पंढरीला जायचा. पण, मित्रांनो आमच्या मनावर आंधळ्या भक्तीचा मैला नाही. आज स्वच्छता करताना हजारो तरुणांमध्ये कर्मरुपी विठ्ठल अवतरला होता. वस्रहरण झालेल्या चंद्रभागाला आम्ही साैंदर्याचा शालु चढविला, तेव्हा मन आनंदून गेले होते. आयुष्यातली खरी वारी घडली आणि बा विठ्ठलही भेटला. देवा उभ्या आयुष्यात या तरुणाईने तुझ्याकडे काही मागितलं नाही. पण, एक दान जरूर दे! या देशातला शेतकरी, मजूर, गरीब व स्रीया यांच्या सगळ्या मागण्या पुर्ण कर. इतकीच मापक अपेक्षा. या सेवेची ही संधी उपलब्ध करून देणारे अमरजी कळमकर यांचे आम्ही आभार मानतो.
    काल १३ जुलै २०१९ सकाळी ८ वाजता ही मोहीम सुरु झाली होती. त्यात वेगवेगळे गृप तयार करुन व प्रत्येक वेगवेगळ्या भागात गृप सोडण्यात आले. त्यामध्ये 65 एकराचे वारीतळ, गोपाळपूर, वाळवंट परीसर, मंदिर परीसर, श्रीकृष्ण मंदिर, भक्ती मार्ग, प्रदिक्षिणा मार्ग, नवी पेठ, रामबाग स्वच्छ करण्यात आले. यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा खच, द्रोन, ग्लास, केळीच्या साली, कुजलेले अन्न, तुटक्या चपला, पिशव्या, चंद्राभागेतील कपडे स्वच्छ करण्यात आले.
            अमर कळमकर म्हणाले की, स्वच्छतेच्या माध्यमातून आम्ही तरुणांवर स्वच्छता संस्कार करत आहोत. आज युवकामध्ये स्वच्छ संस्काराची गरज आहे. म्हणून आम्ही स्वच्छतेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारताचा विडा आम्ही उचलेला आहे. या मोहिमेत सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांमध्ये सामाजिक भान निर्मान करून भरकटलेल्या तरुणाला देशभक्तीकडे वाटचाल करण्यासाठी या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन करतो. डॉ.अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहून हा कार्यक्रम ५ वर्षापूर्वी आम्ही सुरु केला होता. पुढील वर्षी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधून 1 हजार तरुण आणण्याचा निर्धार या वेळी केला आहे. असे अमर कळमकर यांनी सांगितले.
      यावेळी अमर कळमकर, घनश्याम झंवर, सुनिल गडाख, विलास हारदे, ठकसेन गायके, योगेश काकडे, गणेश दळे, स्वाती अशोक शेटे, अंजली वराडे, राणी कळमकर, ज्योती भोरडे, अंजली सरोज,राहुल झिरपे, योगेश संजयराव काकडे, भानुदास गुंड, दिग्विजय परदेशी, भारत गडदे, कैलास देशमाने, कुमार खामकर, मिनिनाथ कवाद, सुनिता थोरात, प्रविण सरोदे, यांसह शेकडो स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी पंढरपूरचे प्रांत. सचिन ढोले यांनी स्वयंसेवकांचे स्वागत व कौतुक केले.
--------------------------
 - योगेश काकडे