लग्नात ओळख झाली अन प्रपोज करुन प्रेम जुळले, लग्न करतो म्हणाले अन उपभोग घेऊन सोडून दिले, दोघांवर गुन्हे.!
सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :-
36 वर्षीय महिलेची ओळख एका व्यक्ती सोबत लग्नात होते.दोघे एकमेकांना फोन नंबर देतात. मंग, काय हाय, हॅलो फोनवर गुटरगु बोलणे सुरू झाले. हा व्यक्ती महिलेशी गोड गोड बोलू लागला. माझा घटस्फोट झाला आहे मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे. असे आमिष दाखवुन त्याने पिडीत महिलेशी हिवरगाव पठार येथे आरोपीच्या घरी व पिडीत महिलेच्या राहत्या घरी वेळोवेळी जबरी संभोग केल्याची धक्कादायक घटना 2024 ते 23 मार्च 2026 रोजी वेळोवेळी घडली. जेव्हा 36 वर्षीय पिडीत महिलेने लग्नाचे साकडे घातले तेव्हा मित्राने व त्याने हाताने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे,आपला प्रेमात धोका झाला आहे असे समजते तेव्हा पिडीत महिलेची तळपायाची आग मस्तकात जाते. तिने थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले व आपली कैफियत पोलिसांना सांगितली. त्यावरून मुख्य आरोपी जहीर इसाक शेख (रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर) याच्यावर बलात्कार व त्याचा मित्र शिवनाथ मिसाळ (रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर) यांच्यावर गंभीर कलमान्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 36 वर्षीय पिडीत महिलेचे 2008 साली खळीपिंप्री परिसरातील तरुणाशी लग्न झाले होते. त्यांना एक दहा वर्षांची मुलगी देखील आहे. त्यांच्या पतीचे 2017 साली एका अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर 36 वर्षीय पिडीत महिला सहा महिन्यांनी मुलीसह माहेरी जाते. पिडीत महिलेचा भाऊ देखील शहरात काम करत असल्याने तो शहरात राहतो. त्यामुळे, पिडीत महिला व तिची मुलगी दोघेचं माहेरी राहते. काही कालावधीनंतर 2024 साली एका कामानिमित्त मैत्रीणीसोबत पिडीत महिला राहता येथे लग्नाला जाते. तेथे कामाला आलेले जहीर शेख याच्यासोबत तोंड ओळख होती. ओळखीचे रूपांतर घट्ट मैत्रीत होऊ लागले. त्यामुळे, दोघांनी ही एकमेकांना फोन नंबर दिला. मंग काय फोनवर एकमेकांसोबत हाय, बाय, हॅलो असे बोलणे सुरू झाले. जाहीर शेख हा गोड गोड बोलू लागला. माझे घटस्फोट झालेला आहे असे सांगुन पिडीत महिलेवर प्रेमाचे जाळे टाकू लागला. पिडीत महिलेला लग्नाची हमी देऊन तो लग्नाचे अमिश दाखवत होता.
दरम्यान, ऑक्टोबर 2024 मध्ये आरोपी जहीर शेख याने पिडीत महिलेला हिवरगाव पठार येथील घरी नेऊन शरीर संबंधाची मागणी करू लागला. त्याने बळजबरी पिडीत महिलेशी अत्याचार केला. त्यानंतर आरोपी जहीर हा गाडी ड्रायव्हींग करत असल्याने तो पिडीत महिला राहत असलेल्या घरी व हिवरगाव पठार येथील त्याच्या घरी वेळोवेळी पिडीत महिलेशी शरीर संबंध केले. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये पिडीत महिला राहत असलेल्या घरी तो दोन दिवस मुकामी होता. त्यावेळी 36 वर्षीय पिडीत महिलेने रजिस्टर लग्नाला आग्रह केला असता आरोपी जहीर म्हणाला की, रजिस्टर लग्न करायचे नाही. रजिस्टर लग्न करायला पैसे कुठून आणायचे. माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणुन पिडीत महिलेला लग्नाला नकार दिला. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये पिडीत महिलेला राहत्या घरावरून घेऊन हिवरगाव पठार येथे नेले. तेथे पिडीत महिलेवर जबरी संभोग केला. पिडीत महिलेने लग्नाचे विचारले तर पुन्हा मारहाण करून पिडीत महिलेला घरी सोडवले.
दरम्यान, पिडीत महिला आपल्या बहिणीच्या घरी घुलेवाडी येथे आली. ही आरोपी जहीरला समजले त्यानंतर तो दि. 23 मार्च 2026 रोजी घुलेवाडी येथे आरोपी जहीर व त्याचा मित्र शिवनाथ मिसाळ हा आला. तेथे पिडीत महिलेशी शरीर संबंधाची मागणी करू लागला तेथे पिडीत महिलेने आधी लग्न कर अशी अट टाकली असता आरोपी जहीरला राग आला. आरोपी जहीर व त्याच्या मित्राने पिडीत महिलेला मारहाण केली. जेव्हा प्रेमात आपला धोखा झाला आहे. असे पिडीत महिलेला समजले तेव्हा तिची तळपायाची आग मस्तकात जाते. पिडीत 36 वर्षीय महिला थेट घारगाव पोलीस ठाणे गाठते व घडलेला सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगते. त्यावरून मुख्य आरोपी जहीर इसाक शेख व त्याचा साथीदार शिवनाथ मिसाळ यांच्यावर बलात्कारसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
