शेअर मार्केटच्या नावे 6 कोटी 65 लाखांची फसवणूक, संगमनेरच्या चौघा प्रतिष्ठीत व्यक्तींवर गुन्हा दाखल.!
सार्वभौम सह्याद्री (संगमनेर) :-
संगमनेर शहरात चौघांनी मिळवून अदमास डेप्ट कन्सल्टन्सी प्रा. लि. व प्रथमेश वेल्थ मॅनेजमेंट शेअर मार्केटची कंपनी तयार केली. या कंपनीच्या नावाखाली शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करा आणि दरमहिन्याला 10% परतावा अधिक मिळेल असे सांगुन तब्बल 62 जणांनी तब्बल 6 कोटी 65 लाख 39 हजार 837 रुपयांना पैसे गुंतवले नंतर ही कंपनी बंद करून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार डिसेंबर 2024 पासून सुरु होता. जेव्हा आपली फसवणूक झाले हे कळल्यानंतर सर्वांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर महेश विश्वास मोरे (रा. माळेगाव पठार, ता. संगमनेर), वैभव विठ्ठल काकड (रा. डोळासने, ता. संगमनेर), राहुल शिंदे (रा. आश्वि, ता. संगमनेर), विजय तबाजी काळे (रा. मालदाड रोड, ता. संगमनेर) या चौघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आणखी कोण कोण आहेत याचा तपास पोलीस करत असुन अशी फसवणूक झाली असेल तर समोर या तक्रार दाखल करा असे आव्हान पोलिसांनी केले आहे.
याबाबत योगेश जऱ्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डिसेंबर 2024 मध्ये आश्वि गावातील मित्र राहुल शिंदे व विजय काळे यांनी शेअर मार्केटचे पैसे गुंतवा तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे सांगितले. त्यानंतर या दोघांनी अदमास डेप्ट कन्सल्टन्सी प्रा. लि. व प्रथमेश वेल्थ मॅनेजमेंट या कंपनीच्या ऑफिस मध्ये बोलावून घेतले. तेथे आरोपी महेश मोरे व वैभव काकड हे दोघे बसत होते. त्यांनी तुम्ही फक्त शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवा तुम्हाला चांगला परतावा करून देतो. असे सांगितले परंतु, एवढी मोठी रक्कम फिर्यादीकडे नव्हती आणि घरचे देखील तयार नव्हते. तरी आरोपी राहुल शिंदे यांनी वारंवार फोन करून सांगितले की, पैसे भरा तुम्हाला जास्त पैसे भेटतील असे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी योगेश जऱ्हाड यांनी आरोपी महेश मोरे व वैभव काकड यांच्या प्रथम वेल्थ मॅनेजमेंट सर्विसेस यामध्ये शेअर मार्केटिंग करता दि. 16 डिसेंबर 2024 रोजी आरटीजीएस करून आरोपी महेश मोरे याच्या एच. डी. एफ. सी. बँकेत पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर दि. 18 डिसेंबर 2024 रोजी पुन्हा प्रथमेश वेल्थ मॅनेजमेंट शेअर मार्केटिंग करीता पैसे ट्रान्स्फर केले. असे वेळोवेळी आरोपी वैभव काकड व महेश मोरे याना पैसे देण्यात आले.
दरम्यान, हे सर्व पैसे दिल्यानंतर संगमनेर कोर्ट परिसरातील जिजामाता प्राईड या बिल्डिंग मध्ये सर्व साक्षीदारांसमोर अधिकृत नोटरी करण्यात आली. त्यानंतर चेक देखील घेण्यात आले. सदर रकमेचा परतावा दरमहिन्याला 10 % अधिक मिळेल या भावनेतून पैसे गुंतवण्यात आले. दर महिन्याच्या 5 किंवा 6 तारखेला ही रक्कम तुम्हाला देण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यानंतर दोन महिने सुरवातीला 11% ने पैसे देखील मिळाले. परंतु, दोन महिन्यांनंतर पैसे मिळण्यास टाळाटाळ सुरू झाली. त्यानंतर ऑफीसवर गेले असता ऑफिसला टाळा दिसला. त्यामुळे, मित्र राहुल शिंदे याच्याशी संपर्क केला असता त्यांनी आरोपी वैभव काकड याच्याशी संपर्क करायला सांगितले. जेव्हा गुंतवणूक पैश्याची विचारपूस केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. त्यावेळी लक्षात आले की, आपली फार मोठी फसवणुक झाली आहे. तसेच वारंवार ऑफिसवर येणाऱ्यांची संख्या वाढल्याने माझ्यासारखे 60 ते 62 जण असल्याची माहिती मिळाली. त्या सर्वांची एकुण 6 कोटी 65 लाख 39 हजार 837 रुपयांना चुना लावून हे चौघे फरार झाल्याची समोर आली. त्यानंतर सर्वांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर महेश विश्वास मोरे (रा. माळेगाव पठार, ता. संगमनेर), वैभव विठ्ठल काकड (रा. डोळासने, ता. संगमनेर), राहुल शिंदे (रा. आश्वि, ता. संगमनेर), विजय तबाजी काळे (रा. मालदाड रोड, ता. संगमनेर) या चौघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शेअर मार्केट मध्ये अनेक युवकांनी लक्झरी ऑफिस टाकले. तेथे पैसे कसे मिळवली जातात याचे अमिश दाखवले. अनेक लोकांनी, शेतकऱ्यांनी कष्टाने कमावलेले पैसे तिथे लावले. यात व्यापारी, नोकरवर्ग देखील मागे राहिला नाही त्यांनी शेअर मार्केटमध्ये या तरुणांकडे पैसे दिला. परंतु, झाले काय सुरवातीला एक-दोन महिने पैसे दिले नंतर सर्व वर्षभर चाले नाहीतेच लाखो रुपयांचा ऑफिसला टाळे दिसले. कोट्यवधी रुपयांना गंडा घालुन हे आरोपी दुबईला पळून गेल्याची माहिती समोर येते. तेथुन व्हाट्सएपकॉल फोनवर बोलणे, एकदाच मेसेज दिसेल असा मेसेज करणे असा संपर्क करून लोकांची दिशाभुल केली. खरंतर, अनेक लोक नाव जाहीर होतील या भीतीपोटी तक्रार दाखल करत नाही. परंतु, आता एक एक जण समोर येऊन या फसवणुकीच्या विरोधात तक्रार दाखल करत आहे. त्यामुळे, अजुन कोणी फसवणूक केली असेल तर पुढे येऊन तक्रार दाखल करा असे आव्हान पोलीस प्रशासनाने केले आहे.
