इयत्ता 9 वी च्या विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून अत्याचार, मुलगी राहिली गरोदर, चावटाळ मास्तरला ठोकल्या बेड्या.!


सार्वभौम (संगमनेर) :-

                 संगमनेर तालुक्यातील मांडवे परिसरात अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. इयत्ता 9 वी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अवघ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यात पिडीत अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आले असुन आरोपी हा शिक्षक असल्याने या नराधम शिक्षकास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. ही सर्व घटना ऑक्टोबर 2024 ते 16 जानेवारी 2026 दरम्यान वेळोवेळी अल्पवयीन पिडीत मुलीवर राहत्या घरी अत्याचार केला. अल्पवयीन 15 वर्षीय विद्यार्थीनीचे जेव्हा पोट दुखू लागले तेव्हा शिक्षकाचे सर्व पितळ उघडे पडले. तिला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर 15 वर्षीय विद्यार्थीने दिलेल्या जबाबावरून नराधम शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (रा. वरवंडी, ता. संगमनेर) याच्यावर बलात्कारासह पोक्सो व गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपी नराधम शिक्षकास बेड्या ठोकल्या आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत 15 वर्षीय मुलगी ही पठारभागावरील साकुर परिसरात राहते. घरापासून काही अंतरावर कपड्याचे दुकान असल्याने वडील सकाळीच दुकानावर जाऊन ते रात्री उशिरा घरी येतात. आई देखील घरचे काम आवरून दुकानावर मदत करण्यासाठी जात असते. याच परिसरात काही अंतरावर मांडवे परिसरात एक नामांकीत शाळा आहे. तेथे ही 15 वर्षीय पिडीत मुलगी शिक्षण घेत असते. इयत्ता 7 वी मध्ये असताना पिडीत मुलगी ही शाळेत एकटी-एकटी राहत होती. कारण पिडीत मुलीच्या भावाचा आई वडील हे जास्त लाड करतात. त्याच्यावरच जास्त प्रेम करतात यावर पिडीत मुलगी विचार करून  एकटी राहत असे. ती एकटी-एकटी राहत असल्याचा फायदा शिक्षकाणे घेण्याचे ठरवले. आरोपी शिक्षक अमोल भोसले हा पिडीत मुलीच्या जवळ गेला आणि विचारले तु एकटी- एकटी का राहत आहे. तेव्हा पिडीत मुलगी म्हणाली की, आई वडील माझ्यावर प्रेम करत नाही माझ्या भावावरच प्रेम करतात. त्यानंतर नराधम शिक्षक पिडीत मुलीची समजुत काढुन म्हणाला की, आई वडिलांना दोन्ही मुले सारखेच असतात. ते दोघांना सारखेच प्रेम करतात. अशी समजुत काढून पिडीत 15 वर्षीय मुलीवर प्रेमाचे जाळे टाकू लागला.

         दरम्यान, हळूहळू पिडीत 15 वर्षीय विद्यार्थीनीची समजूत काढून  नराधम शिक्षक हा मैत्री वाढू लागला. दोघांचे बोलणे सुरू झाले तेव्हा नराधम शिक्षक अमोल भोसले याने पिडीत मुलीच्या आईच्या नंबरवर फोन केला. तेव्हा मुलीला" आय लव य" म्हणुन प्रेमाचं जाळ टाकलं. त्यानंतर दोघांचे प्रेम संबंध जुळले. नराधम शिक्षक अमोल भोसले हा पिडीत मुलीवर वाईट नजर ठेवत होता. पिडीत मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा नराधम शिक्षक घेऊ लागला. तो  डिसेंबर 2024 मध्ये पिडीत मुलगी हे अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील त्याने पिडीत मुलीवर अत्याचार केला.  पिडीत मुलगी ही आठवीचे शिक्षण घेत असताना देखील त्याची राक्षसी वृत्ती होती. त्याने पुन्हा चार ते पाच वेळा पिडीत विद्यार्थीनीवर अत्याचार केले. त्यानंतर पुन्हा 16 जानेवारी 2026 रोजी विद्यार्थीनी बरोबर नाजूक संबंध केले. त्यानंतर पिडीत विद्यार्थीनीचे मागील तीन चार दिवसांपासून पोट दुखू लागले.

         दरम्यान, विद्यार्थीनीचे पोट दुखत असल्याने तिला आई वडिलांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर शिक्षकाने केलेल्या करामतीचे बिंग फुटले. जेव्हा विद्यार्थीनी ही गरोदर आहे हे मुलीच्या आई वडिलांना समजले तेव्हा त्यांनी शिक्षकाला पाठीशी न घालता पोलिसांकडे तक्रार केली. पिडीत 15 वर्षीय विद्यार्थीने दिलेल्या जबाबावरून नराधम शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (रा. वरवंडी, ता. संगमनेर) याच्यावर अत्याचार व पोक्सोसह गंभीर कलमान्वये घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि नराधम शिक्षकास बेड्या ठोकल्या आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे. विद्यार्थी व शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना असल्याने नराधम शिक्षकास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.