त्या भाषणांनी बळी घेतला.!
पोलिसांनी तपासाला दिशा दिली.!
अशरफ हा अल्पवयीन असला तरी तो मोबाईल वापरत होता. तो गायब झाल्यानंतर त्याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी रात्रीच काढले होते. मात्र, गर्दनी एक डोंगराळ प्रदेश आहे. त्यामुळे, रेंज केली किंवा मोबाईल बंद झाल्यानंतर केवळ टॉॅवरचे लोकेशन आले. परंतु, तो कोणत्या दिशेने गेला याची निच्छिती मिळाली. त्यानुसार सीसीटीव्ही तापसण्यात आले. जेव्हा एका ठिकाणी साहिल मोहिते हा त्याला घेऊन जाताना दिसला तेव्हा पोलिसांना आणि नातेवाईकांना शोधाशोध करु लागेल्या साहिला पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या. स्वत:ला हुशार समजणार्या आरोपीस कळले देखील नाही. की, आपल्याला ताब्यात का घेतले आहे. मात्र, जेव्हा त्यास सीसीटीव्ही फुटेज दाखविले तेव्हा त्याची बोलती बंद झाली. मात्र, तरी देखील तो खोटीनाटी नावे सांगून पोलिसांची दिशाभुल करीत होता.
गेल्या पंधरा दिवसापुर्वी अगस्ति मंदीर परिसरात एक मुस्लिम तरुण आणि आदिवासी तरुणी मिळून आले होते. त्यास लव जिहादचे नाव देत तरुणास बेदम मारहाण करण्यात आली होती. मात्र, याप्रकरणी तरुणीने सांगितले माझी चुक झाली आहे. आमची ही पाहिलीच भेट होती. मी अल्पवयीन असले तरी मला माझे आयुष्य या गुन्ह्यात आणि कोण्या जाती धर्मात आडकवून ठेवायचे नाही. माझी चुक झाली ती सुधारते आणि मला आयपीएस किंवा डॉक्टर व्हायचे आहे. त्यामुळे, मी गुन्हा दाखल करणार नाही. अर्थात मुलगी हुशार होती. ती निघुन गेली. त्यानंतर मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली काही तरुण पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाले. त्यांनी प्रचंड प्रक्षोभीत भाषणे केली. आम्ही आमचा न्याय आता पोलीस ठाण्याच्या बाहेरच देऊ असे म्हणत अनेकांना गुन्हे करण्यास प्रवृत्त केले. बिन्धास्त तंगडे तोडा, हत्या करा असे म्हणत जबाबदार व्यक्ती चिथावलेल्या समुदायापुढे बोलल्या. तोच आदर्श घेऊन अशरफची हत्या झाली आहे. त्यांच्यावर देखील कारवाई करा अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता.