संगमनेरात पुन्हा लव जिहाद.! आय लव यू मेसेज केला, तू हाफ कपडे म्हणत बळजबरी कॅटबरी तोंडात कोंबली, विनयभंगाचा गुन्हा दाखल.


सार्वभौम (संगमनेर) :- 

                      राज्यात लव जिहाद सारखे प्रकारण प्रचंड तापलेले असताना पुन्हा-पुन्हा तरुणांकडून चुका होताना दिसत आहेे. जळगाव जामनेर येथील घटना ताजी असताना संगमनेरात पुन्हा एकदा लव जिहादचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातील नर्सिंग करणारा तरुण आजीची ड्रेसिंग करायला घरी येतो. त्याची ओळख आजीच्या नाती सोबत होती मंग काय इन्स्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठून चॅटिंग सुरू होती. फोनवर" आय लव यु" चे मसेज टाकुन आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतो. हात धरून कॅटबरी खाण्यासाठी देणे, फिरण्यासाठी शॉर्ट कपडे घाल आशा वारंवार त्रासाला कंटाळून पिडीत तरुणीने नातेवाईकांना कळवले. त्यानंतर नातेवाईकांनी थेट पोलीस ठाणे गाठून शनिवार दि.16 ऑगस्ट 2025 रोजी रात्री गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी शोएब फिरोज आत्तार (रा. निमोण,ता. संगमनेर) याच्यावर विनयभंगासह पोक्सो असे गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याचा पुढील तपास पोलीस करत आहे. 

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत 17 वर्षीय तरुणी ही मुंबई येथे राहते. तीचे मामा निमोण परिसरात राहण्यासाठी असल्याने पिडीत तरुणीचे नेहमी येणे जाणे होते. काही दिवसांपूर्वी 17 वर्षीय पिडीत तरुणीच्या आजीचे दवाखान्यात उपचार सुरू होते. पिडीत तरुणी ही आजी जवळ राहत होती. आजीच्या पायाची ड्रेसिंग करण्यासाठी शोएब आत्तार हा तरुण येऊन पायाची ड्रेसिंग करत होता. तिथे 17 वर्षीय पिडीत तरुणीची व आरोपी शोएब आत्तारची ओळख झाली. त्यानंतर पिडीत तरुणी ही आपल्या गावाकडे गेली. त्यावेळी आरोपी शोएब आत्तार याने इन्स्टाग्रामवर पिडीत तरुणीला रिक्वेस्ट पाठवली. मंग काय! हाय, बाय, हॅलो अशी चॅटिंग सुरू झाली.

           दरम्यान,  आरोपी शोएबने पिडीत तरुणीला इन्स्टाग्रामवर नातेवाईकांना ब्लॉक करण्यास सांगीतले होते. मी तुझ्याशी बोलतो हे कोणाला ही सांगु नको असे पिडीत तरुणीला सांगीतले. काही दिवसांनी पिडीत तरुणी ही रक्षाबंधनाच्या सणाला मामाच्या घरी येते. तेथे काही दिवस थांबते. दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8 वाजता पिडीत तरुणी व बहीण एका दुकानात गेले. तेथे दुकान बंद असल्याने ते आपल्या आजोबाच्या दुकानावर गेले. तेथे आरोपी शोएब हा आला. व पिडीत तरुणीचा हात पकडुन सांगितले की, तुझ्यासाठी कॅटबरी दुकानाबाहेरील कॅरेटवर ठेवलेली आहे. ती घे असे सांगुन शोएब हा निघुन गेला. त्यानंतर पिडीत तरुणीने आईला सांगितले. तेव्हा शोएब हा नेहमी फोनकरून तु मला खुप आवडतेस, आय लव यु, आपण पळुन जाऊन लग्न करू, असे वेगवेगळे मेसेज करत होता.

दरम्यान, वारंवार फोनकरून, मेसेज करून शोएब हा त्रास देत होता. जेव्हा पिडीत तरुणीला फिरण्यासाठी शॉर्ट कपडे घालण्यास सांगितल्यावर तिने नकार दिला. शोएब याने पिडीत तरुणीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पिडीत तरुणीने आपल्या आईला सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने नातेवाईकांना बोलवुन कळविले.  नातेवाईकांनी थेट संगमनेर तालुका पोलीस ठाणे गाठवले. पिडीत तरुणीने घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून शोएब फिरोज आत्तार (रा.निमोण,ता. संगमनेर) याच्यावर विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.