प्रेम कर मग लग्न करतो असे म्हणत महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल, तरुणाच्या हातात प्रेमाची बेडी.!


सार्वभौम (संगमनेर): - 
                      संगमनेर शहरातील एका 30 वर्षीय महिलेची  एका तरुणासोबत ओळख झाली. मंग काय हाय, हॅलो,बाय फोनवर गुलुगुलु बोलणे सुरू झाले. ओळखीचे रूपांतर प्रेमात करून त्याने लग्नाचे आमिष दाखवीले. आणि पीडिताच्या राहत्या घरी, घुलेवाडी परिसरात व साईनगर परिसरातील एका खोलीत वेळोवेळी अत्याचार केला. ही सर्व धक्कादायक घटना ऑक्टोबर 2018 ते 2 ऑगस्ट 2025 पर्यंत वेळोवेळी घडली. मात्र, लग्न करण्याची वेळ आली तेव्हा पीडित तीस वर्षीय महिलेला तरुणाने व त्याच्या आईने बेदम मारहाण केली. तिला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जेव्हा बरे वाटले तेव्हा थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. मंगळवार दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी पिडीत तीस वर्षीय महिलेने आपली तक्रार दाखल केली. त्यानंतर ऋषीकेश नामदेव सोनवणे (रा. राहणेमळा, ता. संगमनेर) व व्हि. एन. सोनवणे (रा. राहणेमळा, ता. संगमनेर) यांच्याविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.      
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत तीस वर्षीय महिलेचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. काही कारणास्तव ही महिला नवऱ्यापासुन विभक्त राहते. पिडीत महिला साईंनगर परिसरात एकटीच राहण्यासाठी आली होती. ऑक्टोबर 2018 मध्ये पिडीत तीस वर्षीय महिलेची ओळख आरोपी ऋषीकेश सोनवणे याच्याशी झाली. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. दोघांनी एकमेकांना फोननंबर दिला. फोनवर गोड-गोड बोलणे सुरू झाले. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळू लागले. ऋषीकेश याने एक पाऊल पुढे टाकत लग्नाची साद घातली. आरोपी ऋषीकेश याने प्रेमाचे जाळ्यात अडकुन पिडीत महिलेला घुलेवाडी येथील एका खोलीत नेऊन इच्छेविरुद्ध अत्याचार केला.
            दरम्यान, पिडीत तीस वर्षीय महिला 2022 मध्ये साईनगर परिसरात रहाण्यासाठी आली. तेथे देखील ऋषीकेश हा येऊ लागला. पिडीत महिला एकटीच असल्याचा फायदा उचलत तो तिथे घिरट्या घालू लागला. लग्नाचे अमिश दाखवुन तो वेळोवेळी अत्याचार करीत राहिला. जेव्हा पिडीत महिलेने लग्नाचा विषय काढला. की, तो उडवाउडवीची उत्तरे देऊन काहीना काही कारणे सांगुन टाळाटाळ करीत होता. जेव्हा पिडीत तीस वर्षीय महिलेला लक्षात येऊ लागले. तेव्हा ऋषीकेश हा दम देऊ लागला. तु मला शरीर संबंध करू दे नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकी देऊ लागला. पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध त्याने राहत्या घरी जबरी अत्याचार केला.
         दरम्यान, दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता पिडीत महिलेने ऋषीकेशला विचारले आपण लग्न कधी करत आहोत. तेव्हा ऋषीकेशने शिवीगाळ सुरू केली. तुला आज कोणी गिऱ्हाईक भेटले नाही का? असे अरेरावी करून केस ओढले. तेथे त्याची आई व ऋषीकेशने देखील मारहाण करू लागले. तेव्हा पिडीत महिला घाबरली. तिने खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. जेव्हा पिडीत महिलेला आपल्या विश्वासाला तडा गेला. हे समजले असता तिची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने थेट शहर पोलीस ठाणे गाठले व घडलेली कैफियत पोलिसांपुढे मांडली. त्यानंतर तीस वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून त्यानंतर ऋषीकेश नामदेव सोवनवणे (रा. राहणेमळा, ता. संगमनेर) व त्याच्या आईच्याविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.