ब्रेकिंग.! टॅन्सिल तपासताना डॉ. इंगळेंचा हात घसरला, महिलेशी अश्लील चाळे करत एक टक पाहून विनयभंग केला, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेरमधील कुरण येथे एका फॅमिली डॉक्टरकडे एक महिला तपासणीसाठी गेली होती. मात्र, मद्यपान केलेल्या डॉक्टरने पीडित महिलेस बेडवर झोपवून तिच्याशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. बेडवर झोपलेल्या महिलेकडे एकटक पाहून जेथे दुखते येथे न तपासता भलतीकडेच तपासू लागला. डॉक्टरच्या तोंडाचा वास येऊ लागल्याने पीडित महिलेच्या लक्षात आले की, याची नियत फिरली आहे. त्यामुळे ती माऊली झटपट उठली आणि स्वतःला सावरत बाहेर पळाली. तेव्हा तिच्या मुलाने डॉक्टरला जाब विचारला. पण, निर्लज्ज होऊन तो अनुत्तरीत राहिला. ही घटना काल मंगळवार दि. 22 जुलै 2025 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिलेने काल शहर पोलीस ठाण्यात जाऊन आपली कैफियत मांडली, त्यानुसार आरोपी डॉ. राहुल विश्वनाथ इंगळे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल मंगळवार दि. 22 जुलै 2025 रोजी कुराण येथील एका 34 वर्षीय महिलेला टॅन्सिल दुखापतीचा प्राॅब्लेम होता. त्यामुळे, कोणाकडे उपचार घ्यायचा? म्हणून त्यांनी तातडीने आपला नेहमीचा फॅमिली डॉक्टर गाठला. सोबत मुलास घेतले आणि त्या कुरण येथील डॉ. इंगळे क्लिनिक मध्ये गेल्या. तेथे मुलगा बाहेर उभा राहिला आणि त्या आत जाऊन डॉक्टरांशी आपले दु:ख शेअर करु लागल्या. पण, पहिल्याच नजरेत त्याची दृष्टी पीडितेला वाईट वाटली होती. पण, तो कायमचा फॅमिली डॉक्टर असल्याने त्यांना वाटले आपला काहीतरी गैरसमज होेत आहे. त्यानंतर, आरोपी डॉक्टर याने महिलेला बेडवर झोपण्यास सांगितले. त्या विश्वासाने संबंधित महिला बेडवर झोपली.
दरम्यान, आरोपी डॉक्टरने विचारले काय झाले, त्यावर महिला म्हणाली माझे टॉन्सिल दुखत आहे. तेव्हा डॉक्टरने गळ्याभोवती हात लावला आणि टॉन्सिल चेक करु लागला. मात्र, त्याचा स्पर्श वाईट प्रकारे होतोय असे पीडित महिलेला वाटत होते, त्यामुळे ती सावध झाली, याने दुखणे एकीकडे आणि दाबतोय भलतीकडे हे असले अश्लील चाळे महिलेच्या लक्षात आले. डॉक्टर तुम्ही असे घाणेरडे काय करत आहात असा प्रश्न केला असता त्याने पीडित महिलेकडे एक टक पहायला सुरुवात केली. मी टॅन्सिल चेक करतोय असे म्हणत डॉक्टर म्हणाला तुमचे टॉन्सिल पिकले आहे, ते काढावे लागेल, या दरम्यान त्याचे हात नको तेथे जाऊ लागले होते. याची नियत फिरली, याच्या तोंडाचा वास सुटला आहे. हा डॉक्टर कोणत्याही थराला जाऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर महिला तातडीने उठली आणि स्वतःला सावरत बाहेर पळाली.
त्या दरम्यान देव माणसासारखा डॉक्टर पुर्ण घाबरुन गेला. दारुच्या नशेत आपल्याकडून हे काय झाले या भुमिकेमुळे तो घाबरला. तुम्ही घाबरु नका, काही झाले नाही, काही होणार नाही असे म्हणत तो याचना करु लागला. पण, तोवर फार उशिर झाला होता. पीडित महिलेच्या मुलाने देखील काय झाले असे विचारले, पण एका मजबूर आईने त्याला फारसे काही कथन केले नाही. नंतर हा प्रकार जेव्हा घरी गेल्यानंतर पीडित महिलेने तिच्या पतिला सांगितला. तेव्हा पतीने आणि पीडिताच्या नातेवाईकांनी डॉक्टरला चांगलाच धडा शिकविला. डॉ. इंगळे क्लिनिक पुर्णत: भोंगळे करुन त्याच्या कृत्याचा निषेध नोंदविला.
त्यानंतर याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉ. राहुल विश्वनाथ इंगळे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहोत.