काॅलेजला जाताना स्टॅण्डवर प्रेम झाले, तुझ्या शिवाय जगू शकत नाही म्हणत त्याने घरी जाऊन अत्याचार केला, आता म्हणतो मला फोन करु नको नाहीतर आत्महत्या करेल, गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :-

               16 वर्षीय मुलीसोबत एका तरुणाची तोंड ओळख झाली. मंग काय हाय, हॅलो, गुलुगुलु बोलणे सुरू झाले. एकेदिवशी कॉलेजच्या नावाखाली आले व बसस्टॉपवरून तरुणाच्या राहत्या घरी गेले. व लग्नाचे आमिष दाखवून मुलीच्या इच्छेविरुद्ध वारंवार बलात्कार केला. ही धक्कादायक घटना 5 डिसेंबर 2024 ते 15 एप्रिल 2025 पर्यंत वेळोवेळी घडली. याप्रकरणी 16 वर्षीय पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कार, पोक्सोसहअन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यात आरोपी आदित्य अर्जुन शेटे (रा. निमज, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे करत आहे.

              याबाबत सविस्तर माहिती अशी की, 16 वर्षीय पिडीत तरुणी निमज परिसरात राहते. ती संगमनेर शहरातील एका नामांकीत कॉलेज मध्ये शिक्षण घेते. गेल्या काही दिवसांपूर्वी नव्याने राहण्यासाठी आलेला गावातील तरुण आदित्य शेटे याच्यासोबत बसस्टँडवर 16 वर्षीय पिडीत तरुणीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मंग काय! हाय, हॅलो, बाय सुरू झाले. त्यांची घट्ट मैत्री झाल्याने जवळीकता वाढु लागली. दि. 5 डिसेंबर 2024 रोजी पिडीत तरुणी ही गावातुन कॉलेजला जाण्यासाठी संगमनेर बसस्टँडवर येते. तेथे आरोपी आदित्य शेटे हा 16 वर्षीय पिडीत तरुणीला भेटतो. घरी कोणी नसल्याचा फायदा उचलत तो मोटारसायकलवर पिडीत तरुणीला घरी घेऊन येतो. तेथे गोड गोड बोलतो व लग्नाचे अमिश दाखवुन 16 वर्षीय पिडीत तरुणीच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करतो.

         दरम्यान, पिडीत 16 वर्षीय तरुणी व आदित्य शेटे हे वेळ मिळेल तसे भेटतात व फोनवर बोलतात. दि.15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता पिडीत तरुणी ही कॉलेजला जाण्यासाठी संगमनेर बसस्टँडवर येते. तेथे आरोपी आदित्य शेटे येतो व पिडीत तरुणीला मोटारसायकलवर बसवतो व घरी कोणी नसल्याचा फायदा उचलत आपल्या घरी घेऊन जातो . पुन्हा लग्नाचे अमिश दाखवुन गोड गोड बोलुन पिडीत तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करतो. आपण भेटत आहे हे कोणाला सांगु नको. मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे सांगुन आदित्य शेटे हा पिडीत तरुणीला फसवत होता. एकेदिवशी पिडीत तरुणीचे व आदित्य शेटेच्या प्रेम संबंधाबाबत पिडीत तरुणीच्या आई वडिलांना समजते. तेव्हा पिडीत तरुणी ही सांगते की आम्ही लग्न करणार आहोत.   

दरम्यान, दि. 3 जुन 2025 रोजी सकाळी आरोपी आदित्य शेटे याने पिडीत तरुणीच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केला. तुला समक्ष बोलायचे आहे. तू मला जास्त फोर्स करू नको. आता लगेच बोलू नको नाहीतर मी माझे जीवाचे बरे वाईट करून घेईल. असे बोलुन आरोपी आदित्य शेटे याने पिडीत तरूणी सोबत बोलण्यास टाळाटाळ सुरू केली. त्याने मोबाईल बंद करून ठेवला. जेव्हा पिडीत तरुणीला आपल्या विश्वासाला तडा गेला हे समजले असता तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने थेट तालुका पोलीस ठाणे गाठले व घडलेली कैफियत पोलिसांपुढे मांडली. त्यानंतर 16 वर्षीय पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी आदित्य अर्जुन शेटे (रा. निमज, ता. संगमनेर) याच्यावर बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.