तू खुप छान दिसते, आय लव यू म्हणत त्याने कॅफेत पाजला प्रेमाचा गुलकंद.! मिठीत घेताच तिने गुन्हा ठोकला, प्रियकर अटक.!
![]() |
फोटो प्रतिकात्मक आहे |
संगमनेर शहरा लगत असणाऱ्या घुलेवाडी परिसरातील वीस वर्षीय तरुणीची ओळख एका तरुणाशी झाली. मंग काय, फोनवर बोलणे सुरू झाले. एक दिवस कॅफेमध्ये भेटण्यासाठी बोलावून तु खुप छान दिसते, मला तू खुप आवडते.असे बोलुन हातात हात धरून मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवार दि. 11 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. यामध्ये आरोपी हुजेब आदम शेख (रा. संगमनेर शहर, ता.संगमनेर) याच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी हुजेब शेख याच्या मुसक्या आवळल्या असुन त्याला उद्या न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. याचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोवळ करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत वीस वर्षीय तरुणी ही मावळ येथील रहिवासी आहे. तिचे आई वडील शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. पिडीत वीस वर्षीय तरुणी ही पुढील शिक्षणासाठी मावळ मधुन संगमनेरात मामाकडे शिक्षणासाठी येते. येथे येऊन नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश घेते. ती नेहमी घुलेवाडी परिसरातून कॉलेजला ये जा करत होती. पिडीत वीस वर्षीय तरुणीच्या मामाकडे एक टपरी होती. ती टपरी भाडेतत्त्वावर आरोपी हुजेब शेख याना दिली.
दरम्यान, आरोपी हुजेब शेख याचे पिडीत तरुणीच्या मामाच्या घरी येणे जाणे सुरू झाले. तेथुन पिडीत तरुणीची तोंड ओळख ही आरोपी हुजेब शेख याच्या सोबत झाली. मात्र, एक व्यक्ती म्हणुन आरोपी हुजेब शेख याची वाईट नजर या तरुणीवर होती. आज मंगळवार दि.11 मार्च 2025 रोजी 11:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी हुजेब शेख याने पिडीत तरुणीला फोन केला व पिडीत तरुणीला म्हणाला की, रिलायन्स मॉल शेजारी असणाऱ्या कॅफे मध्ये भेटायला ये. तेव्हा पिडीत वीस वर्षीय तरुणी कॉलेज सुटल्यानंतर कॅफे मध्ये भेटण्यासाठी गेली. पिडीत तरुणीला कॅफे मध्ये येताच आरोपी हुजेब शेख हा म्हणाला की, तु खुप छान दिसतेस मला तु खुप आवडते.
दरम्यान, पिडीत तरुणी ही आरोपी हुजेब शेखला समजून सांगत होती. 1 वर्षांपूर्वी माझे लग्न झाले आहे. तुम्ही असे काही बोलु नका असे म्हणाले असता पिडीत तरुणीचा हात हातात घेतला. व पिडीत वीस वर्षीय तरुणीला म्हणाला की,तु प्लिज माझ्याशी बोलत जा, मला तु खुप आवडते. असे म्हणुन आरोपी हुजेब शेख हा मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने पिडीत तरुणीची तळपायाची आग मस्तकात गेली. पिडीत वीस वर्षीय तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठून घडलेली घटना पोलीस ठाण्यात सांगितली. त्यावरून आरोपी हुजेब आदम शेख (रा. संगमनेर शहर, ता. संगमनेर) याच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या मुसक्या आवळल्या असुन उद्या कोर्टा समोर हजर करण्यात येणार आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोवळ करत आहे.