12 वी च्या पेपरला मागच्या बेंचवर आला आणि थेट म्हणाला आय लव यू, सेल्फी फोटो काढून ब्लॅकमेल करु लागला, ठोकला गुन्हा टाकला आत.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                      इयत्ता 12 वीत शिकणाऱ्या मुलीची पेपरला पाठीमागे बसणाऱ्या मुला सोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मंग काय, हाय, हॅलो गुलुगुलु बोलणे सुरू झाले. सोबत सेल्फी काढले आणि नंतर माझ्याशी लग्न कर अशी मागणी केली. जेव्हा मुलगी नाही म्हणाली तेव्हा सोबत काढलेले फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करील, गावभर पोस्टर लावील असे धमकी देऊन मुलीचा हात ओढुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची धक्कादायक घटना दि.16 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता बसस्टँड परिसरात घडली. जेव्हा ही घटना घडली तेव्हा पिडीत मुलगी ही घाबरली. त्यानंतर वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर, वडिलांनी थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून काल पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आरोपी विशाल गोरख मुसळे (रा. मुसळे वस्ती,कौठेकमळेश्वर,ता. संगमनेर) याच्यावर पोक्सोसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, 17 वर्षीय पिडीत मुलीचे आई वडील हे तळेगाव भागातील परिसरात शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. पिडीत मुलगी ही संगमनेर शहरातील नामांकित कॉलेज मध्ये एफ. वाय. बीए चे शिक्षण घेते. पिडीत मुलगी कॉलेजला येण्या जाण्यासाठी बसने प्रवास करते. पिडीत मुलीचा इयत्ता 12 विचा पेपर असताना आपल्या पाठीमागे बसणाऱ्या आरोपी विशाल मुसळे या मुलाशी ओळख होते. त्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. दोघे ही एकमेकाला कॅन्टीग मध्ये भेटत असतात. एक चांगला मित्र म्हणुन पिडीत मुलगी विशाल मुसळेशी बोलत. त्यावेळी सोबत दोघांनी चहा पिताना सेल्फी देखील काढले. 

              दरम्यान, पिडीत मुलीला विशाल मुसळे याने लग्नाची मागणी केली. तेव्हा पिडीत मुलीने नकार दिला. परंतु, दि.16 जानेवारी 2025 रोजी कॉलेज सुटल्यावर पिडीत मुलगी ही कॉलेजवरू घरी जात असताना बसस्टँड परिसरात येते. बसला जाण्यासाठी वेळ असल्याने पिडीत मुलगी व तिची मैत्रीण ही कॅन्टीन मध्ये जेवणासाठी बसतात. ते जेवण करत असताना आरोपी विशाल मुसळे हा तेथे येतो. व पिडीत मुलीला म्हणतो की, मला तुझ्या सोबत बोलायचे आहे. तेव्हा मित्र म्हणुन पिडीत मुलगी ही बोलण्यासाठी जाते. तेव्हा विशाल मुसळे बोलतो की, तु माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तु माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही. तेव्हा पिडीत मुलगी बोली की, तुला नाही म्हणाले आहे. माझे तुझ्यावर प्रेम नाही तु का विनाकारण त्रास देतो. पिडीत मुलगी ही पुन्हा बस स्टँडच्या दिशेने जात असताना विशाल मुसळे याने पिडीत मुलीचा हात धरून ओढला. तु माझ्याशी लग्न केले नाही तर तुझा आणि माझा फोटोचे पोस्टर गावात लावतो. इन्स्टाग्रामवर अपलोड करतो मंग बघतो तु कसे लग्न करत नाही.        

दरम्यान,आरोपी विशाल मुसळे याने पिडीत तरूणीसोबत अश्लील चाळे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पिडीत तरुणीला दमदाटी केल्याने ती घाबरून गेली होती. तिने घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही. मात्र, आरोपी विशाल मुसळे हा पाठलाग करून पिडीत मुलीला मानसिक त्रास देत होता. तिने वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळुन आपल्या वडिलांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांचा राग अनावर झाला. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी काल थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले व सर्व कैफियत सांगितली. त्यानंतर पिडीत मुलीच्या फिर्यादी वरून आरोपी विशाल गोरख मुसळे (रा. मुसळेवस्ती,कौठेकमळेश्वर,ता. संगमनेर) याच्यावर पोक्सोसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.