मेसवाल्या महिलेशी मैत्री करुन बलात्कार केला, ब्लॅकमेल करुन सोनं लुटलं, गाडी याने घेतली, हाप्ते बाईने भरले.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                         32 वर्षीय महिलेची एका तरुणा सोबत तोंड ओळख झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. मंग काय फोनवर हाय, हॅलो गुटरगु सुरू झाली. हा तरुण पिडीत महिलेशी गोड बोलू लागला. त्याने घरी कोणी नसताना फायदा उचलत 32 वर्षीय पिडीत महिलेशी जबरी संभोग करून वारंवार ब्लॅकमेल करून पैसे उकळू लागला. 5 लाख 748 रुपयांना गंडा घालुन नांदूर शिंगोटे येथे लॉजवर व आरोपीच्या राहत्या घरी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना 16 मे 2022 ते 12 जानेवारी 2025 पर्यंत वेळोवेळी घडली. याप्रकरणी 32 वर्षीय पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कारासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यात आरोपी ओमकार नामदेव सोनवणे (रा.राहणेमळा, ता. संगमनेर) याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहे.

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरालगत असणाऱ्या उपनगरात 32 वर्षीय पिडीत महिलेचा हॉटेल व मेसचा छोटासा व्यवसाय होता. पिडीत महिला व तिचे पती हॉटेलवर आपला उदरनिर्वाह करत. 32 वर्षीय पिडीत महिलेच्या घरा समोरच आरोपीचे चुलते राहत असल्याने आरोपी ओमकार सोनवणे हा नेहमी तेथे येत होता. त्यामुळे, 32 वर्षीय पिडीत महिलेची तोंड ओळख ओंकार सोनवणेशी झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. मंग काय फोनवर गुलूगुलू बोलू लागले. त्यांची घट्टमैत्री झाल्याने जवळीकता वाढू लागली. दि.16 मे 2022 रोजी आरोपी ओमकार सोनवणे याने पिडीत महिलेला घरी बोलवले. पिडीत 32 वर्षीय महिला ओमकार सोनवणे यांच्या घरी गेली. घरी कोणीच नसल्याने त्याची वाईट नजर 32 वर्षीय पिडीत महिलेवर पडली. त्याने पिडीत महिलेसोबत लगट सुरू केला. पिडीत महिलेने विरोध केला असता पिडीत महिलेच्या मुलीवरून धमकी देऊन जबरदस्तीने 32 वर्षीय पिडीत महिलेवर जबरी संभोग केला.

            दरम्यान, आरोपी ओमकार सोनवणे हा 32 वर्षीय पिडीत महिलेला ब्लॅकमेल करू लागला. पिडीत महिलेच्या मुलीच्या नावाने तर कधी प्रेमसंबंधा बाबत तुझ्या नवऱ्याला सांगेल आशा धमक्या देऊन नांदूर शिंगोटे येथील लॉजवर कधी तर  आरोपी ओमकार सोनवणे याच्या राहत्या घरी वारंवार बलात्कार करण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये ओमकार सोनवणे हा पिडीत महिलेला भेटून मला स्विफ्ट कार घ्यायची आहे. मला पैसे दे नाही दिले तर तुझ्या नवऱ्याला  आपले प्रेमसंबंध आहे असे सांगेन. तेव्हा 32 वर्षीय पिडीत महिलेच्या पतीला समजल्यावर काय होईल या भीतीपोटी पिडीत महिलेने आरोपी ओमकार सोनवणे याला स्विफ्ट कार घेण्यासाठी 4 लाख 898 रुपये ऑनलाइन पाठविले. त्यानंतर पुन्हा डिसेंबर 2023 मध्ये मला गाडीचा इन्शुरन्स भरायचा आहे. मला पैसे दे नाही दिले तर पिडीत महिलेच्या मुलीवरून धमकी देऊन पुन्हा पैश्याना गळ टाकला. पिडीत महिलेने 8 ग्रॅमचे मंगळसुत्र बँकेत गहाण ठेऊन पैसे दिले. 

                  दरम्यान, आरोपी ओमकार सोनवणे याला पैसे लागले की, तो 32 वर्षीय पिडीत महिलेला ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता. त्याने पुन्हा गाडीचा हप्ता भरण्यासाठी 32 वर्षीय पिडीत महिलेकडून मार्च 2024 मध्ये तीन तोळ्यांची पोत बँकेत गहाण ठेऊन 59 हजार 850 रुपये घेतले. आरोपी ओमकार हा याना त्या कारणाने पिडीत महिलेच्या घरी जाऊन लगट करत असे. दि. 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता पिडीत महिलेच्या घरी कोणी नसताना फायदा उचलत पुन्हा जबरदस्तीने संभोग केला. आरोपी ओमकार याने माझ्या भावाचे लग्न आहे. म्हणुन पुन्हा पिडीत महिलेला ब्लॅकमेल करून 40 हजार रुपये ऑनलाइन पैसे घेतले. त्यामुळे, 32 वर्षीय पिडीत महिला वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून गेली होती. पिडीत महिलेला राग अनावर झाला. तिने थेट पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत पोलीस ठाण्यात सांगितली. त्यावरून ओमकार नामदेव सोनवणे (रा. राहणेमळा, ता. संगमनेर) याच्यावर बलात्कारासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहे.