आत्महत्येपुर्वी आरोपीने लिहीली धक्कादायक चिठ्ठी.! मी मुलाचे अपहरण केले नाही, आमचे प्रेम होते, सोबत रहात होतो, मुलास कोणी आणायला लावले होेते याची चौकशी करा.!!

 

सार्वभौम (संगमनेर) :-

                        पुणे येथुन बारा वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज मंगळवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास  ढोलेवाडी परिसरात घडली. यात  राजेश रोहिदास जंबुकर (रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना व नागरिकांना दरवाजा उघडण्यासाठी वेळ लागला. तोपर्यंत राजेश जंबुकर याने अखेरचा श्वास घेतला होता. तर या तरुणाच्या खिशात एक चिट्ठी लिहली असुन ती पोलिसांच्या हाती लागली आहे. यामधून धक्कादयक उलगडा झाला आहे. त्यात जंबुकर याने लिहिले आहे. की, माझा विश्वासघात झाला आहे. पीडित मुलाची आई आणि माझे प्रेम होते, आम्ही एकत्र रहात होतो, घरातील भांडी देखील माझे आहेत. पीडित मुलगा हा त्याच्या आईकडे नव्हे तर वडिलांकडे रहात होता, तो वडिलाचे एकतो म्हणून मला मुलास घेऊन येण्याचे कोणी सांगितले होते याची चौकशी करा. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची चौकशी व्हावी अशा प्रकराची चिठ्ठी मयत आरोपीने लिहिली आहे. तर, या व्यतिरिक्त चिठ्ठीत अन्य व्यक्तींची नावे लिहिली असून या घटनेला आता अनैतिक संबंधाचा किनार लागला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बारा वर्षीय विद्यार्थ्याचे एका विद्यालयातुन आरोपी राजेश जंबुकर या तरुणाने 11 डिसेंबर 2024 रोजी अपहरण केले अशा प्रकरचा गुन्हा पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस राजेश जंबुकर या आरोपीचा शोध घेत होते. पारगाव पोलिसांनी संगमनेरात तळ ठोकले पण राजेश जंबुकरचा शोध पोलिसांना लागला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी फोटो व नाव टाकुन त्याची माहिती सोशल मीडियावर टाकली. तरी देखील तो मिळुन आला नाही. घटनेतील वास्तव काय हे अद्याप फारसे समोर आले नव्हते. मात्र, आरोपीचे पीडित मुलाच्या जवळच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते, तसेच काही कौटुंबिक कलह देखील होता. त्यातून हा प्रकार घडला असावा असे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मत होेते. त्यानुसार तपास सुरु असताना आता घटनेला वेगळेच वळण लागले आहे. राजेश याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि चिठ्ठीच्या माध्यमातून आपले मन हलके करण्याचा प्रयत्न केला आहे. तो फारसा सुशिक्षित नसल्याने त्याने सविस्तर मांडणी केली नाही. मात्र, तो पोलीसांचा तपास, त्याची प्रेयसी, तिचा पती आणि अन्य व्यक्तींना प्रचंड वैतागलेला दिसला असे मत त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.

             दरम्यान, काही झाले तरी शालेय विद्यार्थ्यांना अशा प्रकारे घेऊन जाणे अयोग्य आहे. त्यामुळे, त्याच्या विरुद्ध काही सबळ आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, राजेश याने चिठ्ठीत लिहिले आहे. की, पीडित मुलाची आई आणि त्याचे प्रेम प्रकरण होते. ही दोघे गेल्या काही दिवसांपासून एकत्र रहात होते. या कारणामुळे त्याची प्रेयसी आणि तिचा नवरा यांच्यात वारंवार वाद झाले होते त्यातून राजेश देखील केंद्रबिंदू ठरला होता. दोघांचे वाद झाल्यानंतर पीडित मुलगा हा वडिलांकडे रहात होता. त्यामुळे, आईची देखील घुसमट होते होती. त्यामुळे, मुलाच्या आईने राजेशला सांगितले होते. की, माझ्या मुलास घेऊन ये. तिच्या दबावापोटी किंवा मातृत्वापोटी मुलास आणायला गेलो अशा प्रकारचा संदेश त्याच्या चिठ्ठीतून पुढे येताना दिसतो आहे. मात्र, पोलीस अद्याप त्याची चौकशी करत आहेत. मात्र, या प्रकरणात माझा विश्वासघात झाला असल्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. हे असे असले. तरी, राजेश हा गुन्हेगारी पार्श्वभुमीचा होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याचा प्रेयसिवर देखील जीवघेणा हल्ला केल्याचे प्रकरण फार जूने नाही. त्यामुळे, त्याचा म्हणण्यात किती तत्थ्य आहे हे पोलीस तपासून पहात आहेत.

         दरम्यान, आज सकाळी राजेश जंबुकर हा आपल्या घरी आला. तो कोणाशी फारसे न बोलता दुसऱ्या मजल्यावर गेला. आणि घराचे दोन्ही दरवाजे बंद करून त्याने स्वत:ला कोंडून घेतले. तो त्याच्यावर दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याबाबत प्रचंड अस्वस्थ होता. त्याने एक कागद घेतला आणि आपल्या तोडक्या मोडक्या भावना शब्दरुपात मांडल्या, त्यानंतर एक साडी घेतली. पायाखाली आधार घेऊन तो सिलिंगला असणाऱ्या फॅनला त्याने साडी घट्ट बांधली आणि स्वतःच्या आयुष्यला कंटाळुन तसेच अनेक जणांच्या जाचाला त्रासून त्याने गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली. त्यानंतर घराचे दरवाजे तो उघडत नसल्याने घरच्यांना संशय येऊ लागला. तेव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले. पोलिसांना तात्काळ कळवले असता ते घटनास्थळी आले. मात्र, दरवाजे उघडे पर्यंत त्याने आपला श्वास बंद केला होता. त्याला खाली घेतले असता त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी लिहलेली असुन त्यात अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. त्यातून त्याने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

             दरम्यान, पुणे जिल्ह्यातील निरगुडसर या गावातुन बारा वर्षीय बालकाचे मयत राजेश जंबुकर याने अपहरण का केले? जंबुकर आणि पीडित मुलाचे कुटुंब यातील वैर समोर आले आहे. मात्र, भर शाळेतून 11 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान विद्यार्थ्याचे अपहरण होते. त्यानंतर राजेश फरार होतो. घरी येऊन आत्महत्या करतो. तरी देखील मुलाचा कुठलाही तपास लागत नाही. तो कुठे आहे, कसा आहे याचा ठावठिकाणा नाही. त्यामुळे, अनेक संशयीत पोलीस ठाण्यात घेऊन येत पोलीस कसुन चौकशी करत आहे. मात्र, बारावर्षीय मुलाचा तपास लावण्यात पोलीस देखील अपयशी झाले आहे.