पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे आरोपीने प्रेयसिच्या मुलाची हत्या करुन स्वत: आत्महत्या केली, अखेर विद्यार्थ्याचा कुजलेला मृतदेह राजापुरमध्ये सापडला.!

 

सार्वभौम (संगमनेर) :-

               आंबेगाव तालुक्यातील एका विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतून उचलून आणले. आपल्या प्रेयसिला आणि तिच्या नवऱ्याला धडा शिकविण्याच्या नादात माथेफिरु विकृत प्रेमीने प्रेयसिच्या मुलाची निघृणपणे हत्या केली. ही धक्कादायक घटना दि. 11 ते 24 डिसेंबर 2024 रोजी या दरम्यानच्या काळात घडली. आज 24 डिसेंबर रोजी मयत विद्यार्थी आर्यन विक्रम चव्हाण याचा मृतदेह संगमनेर जवळील राजापूर परिसरात एका कोरड्या विहिरीत मिळून आला आहे. त्यामुळे, 13 दिवस अपहरण करुन आणलेला मुलगा ना संगमनेर पोलिसांना मिळून आला नाही. ना पारगाव पोलिसांनी मुलाच्या जिवाची काळजी केली. इतकेच काय.! या गुन्ह्यातील आरोपी देखील पोलिसांना सापडला नाही. तो राजरोस बाहेर फिरत होता, अनेक ठिकाणी वायफाय घेऊन त्याचे धेय्य साध्य करत होता. पण, पोलिसांना 13 दिवसात दोघांची लाश सोडून हाती काहीच आले नाही. त्यामुळे, एक सराईत आरोपी गेल्याचे दु:ख नाही. पण, एक 12 वर्षाचा निरापराध जीव केवळ पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गेला हे त्रिवार सत्य आहे. बालकाच्या पालकांच्या चुका ह्या अक्षम्य आहेतच पण, यात त्या निष्पाप जीवाची निघृणपणे हत्या करण्यात आली. याला जबाबदार हे दोन्ही व्यक्ती असल्याची टिका आता होऊ लागली आहे.



याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजेश रोहिदास जंबुकर याने बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील आर्यन चव्हाण या पाचवीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचे अपहरण केले होते. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी पारगाव कारखाना (ता.आंबेगाव) पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रारही दाखल केली होती. यानंतर आरोपी राजेश जंबुकर हा आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याला घेऊन फरार होता. पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला. परंतु आरोपी राजेंद्र जंबुकर हा कुठेही मिळुन आला नाही. मात्र, काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र जंबुकर याने राहत्या घरात ढोलेवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. आरोपी राजेश जंबुकर याने जीवनयात्रा संपवली. परंतु, आर्यन चव्हाण कुठे आहे असा प्रश्न सर्वांना पडत होता. आंबेगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह त्यांना काल रात्री उशिरा तालुक्यातील राजापूर शिवारात आढळला ‌. पोलिसांच्या तपासामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये विद्यार्थी आर्यन चव्हाण व आरोपी राजेश जंबुकर हा एका हॉटेलमध्ये 11 डिसेंबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास नाष्टा करत असल्याचे  पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे चित्र आज रोजी दिसुन आले. त्यानंतर पोलिसांनी राजापूर परिसरात वेगाने तपास सुरू केला. आरोपी राजेश जंबुकर याला वायफाय देणारे मदत करणारे याना खाकी दाखवली. त्यानंतर, घटनेतील काही बारकावे व सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन काल रात्री या मुलाचा मृतदेह राजापूर शिवारात एका पडक्या विहिरीत आढळून आला. आर्यन चव्हाण यांचे अपहरण करणाऱ्या आरोपी  राजेश जंबूकर यानेच या मुलाचा खून केला असावा असे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये स्पष्ट झाले.

शाळा दोषी असेल तर आरोपी करा

एक विद्यार्थी शाळा असो किंवा होस्टेल चालु असताना एक अनोळखी व्यक्ती येतो आणि विद्यार्थ्याला घेऊन जातो. जरी तो व्यक्ती मुलाच्या ओळखीचा असला तरी शाळेचे शिक्षक किंवा रेक्टर आणि मुख्याध्यापक यांनी आर्यन चव्हाण याला आरोपी राजेश जंबुकर याच्यासोबत पाठविले कसे? त्यांनी पालकांशी चर्चा केली होती का? फोनहून संपर्क केला होता का? आर्यनच्या मृत्यूस हे व्यवस्थापन देखील जबाबदार आहे. याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यात जर कोणी दोषी आढळले तर यात संबंधितांना सहआरोपी करावे किंवा स्वतंत्र गुन्हा नोंदविला पाहिजे. कारण, एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला आहे. आज म्हातारी मेल्याचे दु:ख नाही. पण, काळ सोकावता कामा नये. समाजात इतकी अनैतिकता वाढली आहे. प्रचंड व्याभिचार आणि लफडी वाढली त्यामुळे कुटुंब व्यवस्था कोलमडली असून मुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे. केवळ पती पत्नीचे जमत नाही म्हणून मुलांना वस्तीगृहात टाकले जाते. यांच्या लफड्यांमुळे मुलांच्या जीवापर्यंत खेळ येतो याचे उत्तम उदा. म्हणजे आर्यनची घटना आहे. त्यामुळे, विकृत आरोपी तेथे जातो आणि मी मुलाचा पालक आहे असे सांगून त्याला घेऊन येतो व निघृणपणे हत्या करतो हे किती हॉरर वाटते आहे. म्हणून पोलिसांनी यात कोणताही अर्थपुर्ण तडजोड न करता चौकशी करुन दोषी असल्यास कठोर करावाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

प्रेयसि संशयाच्या भोवऱ्यात.!

खरंतर, मयत आरोपी राजेश जंबुकर या विकृत प्रियकराने निरपराध बाळाचा बळी घेतला आहे. पण, त्याच्या बळीचे मुळ ही आर्यनची आई आहे. लग्न होऊन देखील एक विकृत मानसिकता असणाऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध ठेवणे ही किती घातक बाब आहे. हा तिचा वैयक्तीक प्रश्न असला. तरी, मयत राजेश याने मृत्युपुर्व जी चिठ्ठी लिहीली आहे. त्यातील संकेत फार वेगळे आहेत. त्यामुळे, आर्यनच्या हत्येमध्ये या महिलेचा देखील हात आहे का? याचा देखील पुणे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आर्यनला संगमनेरमध्ये आणले त्यानंतर त्या आरोपीने आर्यनच्या आईला कॉल देखील केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, आरोपी राजेश याच्या चिठ्ठीचा अर्थ लावला तर अनेक शंकास्पद गोष्टी निर्माण होतात. आरोपी मुलास आणण्यासाठी गेला तेव्हा त्याने कोणाची ओळख सांगितली, त्याने कोणाला फोन लावून दिला होता का? मी मुलाचा पालक आहे ही ओळख केवळ आर्यनच्या आईमुळे पडली होती. त्यामुळे आता पुणे पोलिस या घटनेचा सखोल तपास करणार आहेत. हे असे असले. तरी, कोवळ्या लेकराला वाचविण्यात अपयशी ठरलेल पोलिस आता गेंड्याची कातडी असणाऱ्यांना तरी ताब्यात घेते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संगमनेर व पुणे पोलिसांची अकार्यक्षमत.!

पुणे आणि संगमनेर पोलिसांचे हे फार मोठे अपयश आहे. खरंतर 11 डिसंबर 2024 रोजी दुपारी आर्यन चव्हानला आरोपी राजेश जंबुकर याने संगमनेरमध्ये आणले होते. त्यानंतर पारगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा देखील दाखल झाला होता. पण, 13 दिवस उलटून देखील राजेश त्यांच्या हाती लागला नाही. आरोपी तर सोडाच, आर्यनचा सुद्धा तपास घेता आला नाही. स्थानिक पीआय अगदी दिलखुलासपणे म्हणतात. की, मुलगा सुखरुप आहे, तो येऊन जाईल, भेटून जाईल. म्हणजे एखाद्या ज्योतिष्याकडे पाहून यांनी भाष्य करावे इतके बेजबाबदार वक्तव्य पारगाव पोलिसांचे होते. पुणे पोलिस म्हटलं की दरार वाटायचा, पण यांच्या डोळ्यादेखत लेकरु उचलुन नेलं पण यांना त्याची काहीच खंत वाटली नाही. म्हणून या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे एक बालकाचा जीव गेला. बॉडी सडून पडली पण यांनी ती वेळीच भेटली नाही. त्यामुळे, यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आता जनता करु लागली आहे. इतकेच का.! संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 13 दिवस मुलगा होता. पण, त्यांना देखील मुलाचा शोध घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. किती मोठं दुर्दैव आहे. की, एक आरोपी आणि एक निष्पाप बालक असे दोन मृतदेह आपल्या हाद्दीत सापडतात तरी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना घम नाही अन पस्तावा नाही. कदाचित संगमनेेर शहर किंवा ग्रामीण पोलिसांनी थोडंफार मनावर घेतले असते तर कदाचित आरोपी मेला तर मरुद्या, पण बाळ तरी वाचलं असतं. पण, दुर्दैवाने ते भाग्य यांना लाभले नाही. यात अकार्यक्षम अधिकारी कोणी का असेना. यांच्या चौकशा लावून जर दोषी आढळले तर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी होऊ लागली आहे.